वेणी बांधणे केसांच्या आरोग्यासाठी असते फायदेशीर, जाणून घ्या कसे

वेणी बांधणे  केसांच्या आरोग्यासाठी असते फायदेशीर, जाणून घ्या कसे

कितीही नव्या हेअरस्टाईल आल्या तरी केसांची वेणी बांधणे ही कधीही Outdated होऊ शकत नाही. आता अगदी टिपिकल वेण्या आपण हल्ली बांधत नाही. त्यातही कितीतरी वेगळे प्रकार आता आहेत. एकूणच काय तर वेणी अजूनही तशी स्टाईलमध्ये आहे. शाळेत असताना केस लांब असतील तर तुम्ही केसांच्या दोन वेण्या नक्कीच बांधल्या असतील. आता वेणी बांधण्याचे फार प्रसंग येतही नसतील. कारण हल्ली केस मोकळे सोडायलाच अनेकांना आवडतात. पण तेल लावल्यानंतर चापूनचोपून वेणी घालणे हे आजही अगदी आवर्जून केले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? वेणी घालण्याचे काही फायदेही आहेत. हो, केसांची वेणी घालणे हे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कसे ते आता जाणून घेऊया

बर्फाच्या तुकड्यांचा वापर करा सौंदर्य मिळवा

केसांचा गुंता होत नाही

Instsgram

तुम्ही अनेकदा आजी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींना रात्री झोपताना वेणी घालताना पाहिले असेल. वेणीचा पहिला फायदा म्हणजे केसांचा गुंता कमी करणे. जर तुम्ही केस मोकळे ठेवून झोपत असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल ती अशी की, मानेवरील तुमच्या केसांचा लगेच गुंता होतो. हा गुंता सोडवण्यामध्ये मग फारच वेळ जातो. हा वाया जाणारा वेळ टाळायचा असेल तर तुम्ही तुमच्या केसांची वेणी घालायला हवी.तीन पेढ्यांची सैलसर वेणी तुमच्या केसांचा गुंता होऊ देत नाही आणि तुम्ही अगदी पटकन तयार होऊ शकता. 

घरच्या घरी कोणत्याही मशीनशिवाय केस असे करा सरळ

केसांच्या वाढीला देते प्रेरणा

Instagram

केस चांगले वाढायला हवे असतील तर तुम्ही तुमच्या केसांची वेणी अगदी हमखास घालायला हवी. रात्री झोपताना केसांची वेणी घातल्यामुळे तुमच्या केसांचे स्ट्रक्चर अगदी व्यवस्थित राहते. त्यामुळे केसांच्या वाढीला प्रेरणा मिळते असे म्हटले जाते. रात्री झोपताना केसांची वेणी बांधण्यामागे हे एक कारण अगदी हमखास असते. आता तुम्हाला वाटेल की, असे शक्य आहे का? पण केसांच्या वेणीमुळे केसांची वाढ होते हे अभ्यासाअंती सिद्धही झाले आहे.

केसांचे मॉईश्चर ठेवते राखून

धूळ, प्रदूषण यामुळे केस डॅमेज होणे आपल्याला नवे नाही. उन्हात, प्रदूषणात प्रवास करताना केस कोरडे होऊ लागतात. केस कोरडे झाल्यानंतर केसांना फाटे फुटणे, केस रुक्ष दिसणे, केस सतत गळणे अशा तक्रारी जाणवू लागतात. जर प्रवासाला बाहेर निघताना किंवा बाईकवरुन प्रवास करताना केस वर बांधण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या केसांची वेणी घातली तर तुम्हाला त्याचा फायदा अधिक मिळेल. कारण तुमच्या केसांचे मॉईश्चर राखून ठेवण्यास वेणी मदत करते. शिवाय प्रवासात केस चिकट आणि तेलकट करत नाही.

प्रवासादरम्यान तुमचेही केस होतात खराब,मग अशी घ्या काळजी

अशी बांधा रात्री वेणी

Instagram

रात्री झोपताना केसांवर एकदा तरी हेअर ब्रश किंवा कंगवा हा फिरवायलाच हवा. केसांचा गुंता सोडून मस्त केसांची तीन पेढ्याची सैलसर वेणी बांधा. सगळयात शेवटी केसांना रबर लावा. खूप घट्ट असा रबरही लावू नका. कारण तुम्हाला वेणी बांधण्यामुळे झोपताना त्रास व्हायला नको. 


आता केसांची उत्तम वाढ हवी असेल आणि तुमचेही केस छान चमकदार, मजबूत दिसायला हवे असतील तर केसांची वेणी घालायला विसरु नका.