ताकाने मिळवा डागविरहीत त्वचा आणि चमकदार केस

ताकाने मिळवा डागविरहीत त्वचा आणि चमकदार केस

उन्हाळ्याच्या दिवसात ताक हमखास प्यायलं जातं. हे आपल्याला शरीराला थंडावा तर देतंच. पण यासोबतच ताकाचे त्वचा आणि केसांसासाठीही खूप फायदे आहेत. हो..ताक फक्त प्यायल्याने आरोग्याला उपयोगी ठरत असं नाहीतर डागविरहीत त्वचा आणि चमकदार केसांसाठीही तुम्ही ताकाचा वापर करू शकता. कसा ते जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

त्वचेसाठी ताक

ताकात उत्तम ब्लीचिंग तत्त्व असतात.. हे लॅक्टिक एसिडयुक्त असतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेशी निगडीत अनेक समस्या दूर होऊ शकतात. ताकाच्या वापराने तुम्ही चेहऱ्यावरील डाग आणि टॅनही दूर करू शकता. हे वाढत्या वयाच्या खुणा कमी करण्यात आणि त्वचा टोन करण्यातही उपयोगी ठरतं. 

उन्हामुळे भाजलेली त्वचा पुन्हा आधीसारखी करण्यासाठी तुम्ही ताकाचा वापर करू शकता. त्वचेला खोलवर स्वच्छ करून आणि ती कोमल बनवण्यात ताक हे फायदेशीर आहे. त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी तुम्ही ताकाचा वापर करू शकता.

Shutterstock

त्वचेसाठी कसा कराल ताकाचा वापर

ताक हे मसूर डाळ, बेसन, गुलाबपाणी आणि मुलतानी माती, संत्र्याच्या सालाची पावडर अशा घटकांसोबत मिक्स करून कोणत्याही प्रकारच्या त्वचा प्रकाराला उपयुक्त ठरू शकतं. 

खासकरून संत्र्याच्या सालासोबत ताक मिसळून ते चेहऱ्यावरील डागांवर लावल्यास डाग नक्कीच दूर होतील. 

पपई किंवा टोमॅटोसोबत ताक मिक्स करून लावा आणि ते सुकल्यावर धुवून टाका. चेहऱ्यावरील सनबर्न आणि सन डॅमेज कमी करण्याचा हा उत्तम उपाय आहे.

केसांसाठी ताक

ताक केसाची त्वचा स्वच्छ करते. यामुळे केसांतील डँड्रफ आणि कोरडेपणा दूर होतो. ताकातील प्रोटीन केसांना पोषण देते आणि सर्व आवश्यक पोषक तत्वांचीही पूर्तता करते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण ताक हे नैसर्गिक हेअर स्ट्रेटनर म्हणूनही काम करते. हे नारळाच्या दूधासोबत मिक्स करून लावल्यास केस नैसर्गिकरित्या सरळ होतात. 

  • नारळाचं दूध आणि ताक हे 2:1 प्रमाणात घ्या. हे मिश्रण कोरड्या केसांवर दोन तास लावून ठेवा आणि मग केस धुवा.
Shutterstock

केसांसाठी असा करा ताकाचा वापर

ताकापासून तुम्ही केसांसाठी अनेक उपयुक्त हेअरमास्क आणि पॅक बनवू शकता. एक अंड घ्या आणि ते फेटून त्यात तीन ते चार चमचे ताक, दोन चमचे ऑलिव्ह ऑईल, एक मॅश केलेलं केळं आणि दोन चमचे मध घाला. हे सर्व चांगलं मिक्स करा आणि केसांवर कमीत कमी 20 मिनिटं लावा. नंतर केस धुवून टाका. 

ताकात लिंबाचा रस मिक्स करून 15 मिनिटं मालीश करा आणि मग कोमट पाण्याने केस धुवून टाका. यामुळे केसांतील खाज आणि डँड्रफ दूर होईल. डँड्रफसाठी तुम्ही व्हिनेगर आणि लिंबाच्या रसाची वापरही करू शकता.

Shutterstock

ताक हे तुम्हाला घरच्याघरी बनवता येतं आणि ते केस व त्वचेच्या आरोग्यासाठी अगदी प्रभावी आणि सोपा उपाय आहे. ताकाच्या मदतीने तुम्ही घरीच फेस आणि हेअरमास्क बनवा आणि तुमच्या त्वचेला व केसांना भरपूर पोषण द्या.