कंटाळा होईल दूर, गुलकंद खा फ्रेश राहा

कंटाळा होईल दूर, गुलकंद खा फ्रेश राहा

गुलाबाच्या नाजूक पाकळांच्या फायद्यांबद्दल आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. ज्या तुमच्या सौंदर्यात भर टाकण्याचं काम करतात. पण याच पाकळ्यांपासून बनवला जातो आरोग्यदायी आणि उन्हाळ्यात आवर्जून खाल्ला पाहिजे असा गुलकंद. कारण हा गुलकंदही तितकाच उपयोगी आहे.

गुलकंद म्हणजे काय?

Shutterstock

गुलाबाच्या ताज्या पाकळ्या साखरेसोबत किंवा मधासोबत मिक्स करून एका निश्चित काळासाठी साठवल्या जातात. काही कालावधीनंतर मध किंवा साखरेत मिक्स केलेल्या गुलाबाच्या पाकळ्या रस सोडतात आणि पूर्णतः त्या गोड रसात एकजीव होतात. या तयार मिश्रणाला म्हणतात गुलकंद.

उत्तम औषधी गुणयुक्त गुलकंद

आयुर्वेदात गुलकंदाला औषध म्हणून मान्यता देण्यात आली आहे. काही औषधांमध्ये विशिष्ट आजारांवरील प्रभाव वाढवण्याकरिता त्यासोबत गुलकंद खाण्याचा सल्ला दिला जातो. चला जाणून घेऊया गुलकंद खाण्याचे शरीराला होणारे विविध फायदे.

Shutterstock

पोटाची जळजळ होईल कमी - बरेचदा काही उष्ण किंवा तिखट खाल्ल्यावर आपल्या पोटात जळजळ किंवा एसिडीटी होते. त्यावेळी एक ते दोन चमचे गुलकंद खावा. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. 

बद्धकोष्ठ होईल दूर - जर कोणाला बद्धकोष्ठाची समस्या असेल तर जेवल्यानंतर एक ते दोन चमचे गुलकंदाचं सेवन करावं. यामुळे पचन चांगल होतं आणि बद्धकोष्ठाची समस्याही दूर होते. कारण गुलकंद आपल्या आतड्यांतील उपयुक्त ठरणारा गट बॅक्टेरिया वाढवण्यात मदत करते. ज्यामुळे आपल्याला जेवण पचवणं सहज जातं. 

तोंड आल्यास - जर तुम्हाला तोंड आलं असेल आणि त्यामुळे काहीही खाणं जमत नसेल तर अशावेळी गुलकंद आवर्जून खा. गुलकंद खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि तोंडात आलेली उष्णताही कमी होते. 

पिंपल्सच्या समस्येवरही गुणकारी - फक्त गुलाबपाण्यानेच नाहीतर गुलकंद खाल्ल्यानेही पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत मिळते. खरंतर गुलाब आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. हा त्वरित आपल्या त्वचेतील विषारी घटक दूर करून परिणाम दाखवतं. 

अनिद्रेची समस्या - गुलकंद खाल्ल्याने झोप न येण्याची समस्याही दूर होते. रोज रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी दूधासोबत गुलकंद घ्यावा. यामुळे मन शांत राहील आणि चांगली झोपही येईल. खरंतर दूध आणि गुलकंदाच्या मदतीने मेंदूमध्ये मेलाटोनिन हार्मोन्सना चालना मिळते. या हार्मोन्समुळे आपली स्लीप क्लॉक मॅनेज करण्याचं काम होतं. 

वाढते सेक्स पॉवर - तुम्हाला या आधी कधी प्रश्न पडला होता का की, प्रत्येकवेळी प्रेमाची कबुली देताना गुलाबच का वापरतात. आता मिळेल या प्रश्नाचं उत्तर. ज्याप्रकारे आयुर्वेदात काही फळं आणि भाज्यांमध्ये एक खास गुण आढळतो. तसाच प्रत्येक फुलातही एक खास गुण आणि उपयुक्तता आहे. गुलाब मानसिक शांती आणि सेक्स हार्मोन वाढवणारं फूल मानलं जातं. कदाचित याच कारणामुळे वर्षानुवर्षे गुलाबाच फूल प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. गुलकंद खाल्ल्याने महिला आणि पुरूष दोघांचीही सेक्स लाईफ चांगली होते.

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी.