काजू-बदाम-पिस्ता- मनुका- अंजीर असे सुक्या मेव्याचे प्रकार आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात. पण त्या पलीकडे जाऊनही काही सुक्या मेव्याचे असे प्रकार आहेत ज्यांच्या किंमती खूप जास्त आहेत. पण त्यांच्या सेवनाचे फायदेच फायदे आहेत. आज आपण ज्या सुक्या मेव्याबाबत बोलणार आहोत तो आहे ‘हेजलनट’. साधारण बदामासारखे दिसणारे पण काबुली चण्याचा आकार असलेले हे हेजलनट खूपच पौष्टिक आहेत. अगदी त्वचेपासून ते तुमच्या आरोग्यापर्यंत त्याचे फायदेच फायदे आहेत. म्हणूनच आज या सुक्या मेव्याबाबत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
तुळशीच्या पानांनी खुलवा तुमचे सौदर्य, घरीच करा हा सोपा उपाय
हेजलनटचे उत्पादन
shutterstock
आता जर तुम्ही हेजलनटबद्दल अजिबात कधी वाचले नसेल तर तुमच्यासाठी हेजलनटची थोडी पार्श्वभूमी जाणून घेणे फारच गरजेचे आहे. आज हेजलनटची शेती अनेक देशांमध्ये होत असली तरी देखील त्याचे मूळ हे सिरिया आहे. सिरियाच्या दमासकस या भागामध्ये जंगलात याची झाडं आपोआप उगवली. तर दुसऱ्या एका दाखल्यानुसार साधारण 5हजार वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांना चायनामध्ये हे फळ असल्याचे दिसले आहे. आता याचा शोध कुठे लागला या वादात पडण्यापेक्षा हा सुकामेवा चवीला थोडा शेंगदाणा, काजू आणि बदाम यांचे मिश्रण लागतो आणि तो पौष्टिक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. जाणून घेऊया या हेजलनट्सचे फायदे
हे ‘लव्ह फूड्स’ बनवतील तुमचे सेक्स लाईफ अधिक स्पाईसी
त्वचा करते सुंदर
shutterstock
हेजलनटमध्ये व्हिटॅमिन E आणि आवश्यक असे फॅटी अॅसिड असते. याचा फायदा तुमच्या त्वचेसाठी होते. तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासोबतच तुमच्या त्वचेला मॉश्चरायईज करण्याचे काम हेजलनट करते. तुमच्या त्वचेची इलास्टीसिटी वाढवते. त्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली दिसते. तुमची त्वचा सैल पडत असेल तर तुमच्यासाठी हेजलनट फारच चांगले आहे. हेजलनटच्या सेवनामुळे तुमची त्वचा सैल पडत नाही. तुमचा त्वचेचा प्रकार कोणताही असला तरी देखील तुम्ही हेजलनटचे सेवन करु शकता.
केसांवर हेअर ट्रिटमेंट केल्यानंतर करु नका तेल मालिश
केसांचेही करते संरक्षण
हल्लीच्या प्रदूषणाचा परिणाम थेट तुमच्या केसांच्या आरोग्यावर होत असतो. जर तुम्हाला चांगले केस हवे असतील तर तुम्ही हेजलनट अगदी आवर्जून खायला हवे. तुमच्या रुक्ष केसांना चमक देण्याचे काम हेजलनट करते. सूर्याच्या अतिनील किरणांपासून ते तुमचे संरक्षण करते. तुमच्या केसांवर एक संरक्षक कवच तयार करते. त्यामुळे तुमचे केस खराब होत नाही.
आरोग्यासही चांगले
shutterstock
हेजलनटचे आरोग्यवर्धक फायदेही दुर्लक्ष करुन चालणार नाही. तुमच्या पोटाच्या आरोग्यापासून ते अगदी तुमच्या हृदयाच्या आरोग्यापर्यंत हेजलनट फारच उपयुक्त आहे. हृदयविकार, कॅन्सर,हाडाची बळकटी मिळवण्यासाठी तुम्हाला हेजलनट अगदी आवर्जून खायला हवे.
आता हेजलनटचे फायदे वाचल्यानंतर जर तुम्ही हेजलनट खाण्याचा विचार करत असाल तर हेजलनटची किंमत जास्त आहे. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी साधारण 10 ते 12 हेजलनट्स खाण्यास काहीच हरकत नाही.