Beauty Tips : बर्फाच्या तुकड्यांचा वापर करा सौंदर्य मिळवा

Beauty Tips : बर्फाच्या तुकड्यांचा वापर करा सौंदर्य मिळवा

उन्हाळा आता जाणवू लागला आहे. त्यामुळे नकळत थंड पाणी, सरबत किंवा कैरीचं पन्ह पिण्याची तल्लफही लागतेच. आता थंड म्हटलं की, बर्फ आलाच. बर्फ घातल्याशिवाय या गोष्टींची मजाच येत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, बर्फ फक्त सरबतातील थंडाव्यासाठी नाहीतर तुमच्या सौंदर्यासाठीही उपयुक्त आहे. तुमच्या चेहऱ्यावरील सुंदरता कायम ठेवण्यासाठी बर्फाचा तुम्ही औषधाप्रमाणे वापर करू शकता. जाणून घ्या बर्फाचे सौंदर्यदायी फायदे.

shutterstock

तुकतुकीत चेहऱ्यासाठी : जर तुमच्याकडे मेकअप करण्यासाठी वेळ नसेल आणि त्वचा सैलसर झाली असेल तर बर्फाचा छोटा तुकडा कापडावर शक्यतो मखमलवर घेऊन तो चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा टाईट होईल आणि या बर्फाच्या तुकड्याने तुमच्या त्वचेवर ग्लोसुद्धा येईल. 


डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी : डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यासाठी काकडीचा रस आणि गुलाबपाणी मिक्स करून त्याचे आईसक्युब्स बनवा. या बर्फाने डोळ्यांखालील वर्तुळांवर मालीश केल्यास ही समस्या लवकर दूर होईल. जर जास्त वेळ मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरल्याने तुमचे डोळे दुखत असल्यास बर्फाचे तुकडे डोळ्यावर ठेवा. लवकर बरं वाटेल. 


आयब्रोज करताना : जर आयब्रोज करताना तुम्हाला दुखत असेल तर आयब्रोजवर बर्फ चोळा. यामुळे काही वेळासाठी तो भाग सुन्न होईल आणि दुखणारही नाही. 

 

Shutterstock

रक्त थांबवण्यासाठी बर्फ : प्लास्टिकमध्ये बर्फाचा तुकडा गुंडाळून डोक्यावर लावल्यास तुम्हाला डोकेदुखीपासून सुटका मिळू शकते. याशिवाय जर तुम्हाला कुठे जखम झाली आणि रक्त आल्यास त्या ठिकाणी बर्फ चोळा. लगेच रक्त येणं थांबेल. 

काटा काढण्यासाठी : काटा रूतल्यास त्या ठिकाणी बर्फ लावून तो भाग सुन्न करा. काटा लगेच निघेल आणि दुखणारही नाही. जर तुम्हाला मुकामार लागला असल्यास बर्फ लावा. असं केल्याने रक्त साकळणार नाही आणि वेदनाही कमी होतील. 

नाकातून येणारं रक्त आणि मळमळणं : नाकातून रक्त येत असल्यास बर्फाचा तुकडा कपड्यात गुंडाळून तो नाकावर लावा. थोड्याच वेळात रक्त येणं थांबेल. प्रवासादरम्यान तुम्हाला मळमळ किंवा उलटीसारखं वाटत असल्यास बर्फ चघळा. उलटी होणार नाही. 

टाचदुखी : पायाच्या टाचा जास्त दुखत असल्यास बर्फ चोळल्याने तुम्हाला लगेच आराम मिळेल. बर्फाचा तुकडा गळ्याजवळ हळूवार चोळल्यास घसा खवखवणंही कमी होतं

सूज कमी करण्यासाठी : जळल्यावर लगेच बर्फाचा तुकडा लावल्यास जळजळ होत नाही आणि खूणही पडत नाही. इंजेक्शन घेतल्यावर किंवा पाय मुरगळल्यास बर्फ चोळल्याने वेदना आणि सूज कमी होते तसंच खाजही येत नाही.

Shutterstock

मग तुम्हीही घरच्याघरी हा सोपा बर्फाच्या तुकड्यांचा वापर चेहऱ्यासाठी आणि वर सांगितलेल्या इतर उपायांसाठी नक्की करून पाहा.