ADVERTISEMENT
home / Care
मजबूत आणि चमकदार केसांसाठी करा कांद्याच्या रसाचा असा वापर

मजबूत आणि चमकदार केसांसाठी करा कांद्याच्या रसाचा असा वापर

आपण सर्वात जास्त काळजी करतो ती आपल्या त्वचा आणि केसांची.  केसांची काळजी घेण्यासाठी बरेचदा पार्लरला जाणंं, केसांना जपणं हे सर्वच केलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का? कांद्याचा वापर करून तुम्ही केस अधिक मजबूत आणि चमकदार करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत आणि त्या आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. सध्या केराटिन, स्टॅनिन अनेक पद्धती केसांना चमकदार ठेवण्यासाठी वापरल्या जातात.  पण स्टॅनिनमध्ये सर्वात जास्त वापर हा कांद्याचा केला जातो याची तुम्हाला कल्पना आहे का? पण आता पार्लरमध्ये अधिक खर्च न करता आणि सध्या कोरोना व्हायरसच्या काळात तुम्ही घरच्या घरी केसांची काळजी घेण्यासाठी हा उत्तम उपाय नक्कीच ट्राय करू शकता. यामुळे तुमचे केस अधिक मजूबत आणि चमकदार होतील याची आम्हाला खात्री आहे. पाहूया नक्की कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या की तुम्हाला अप्रतिम केस मिळतील. 

कसा वापरावा कांद्याचा रस

Shutterstock

स्टेप 1 – सर्वात पहिले कांदा घेऊन त्याचे बाहेरील साल काढून टाका आणि त्याचे तुकडे करून घ्या. अगदी बारीक तुकडे करायची गरज नाही

ADVERTISEMENT

स्टेप 2 – कापलेल्या कांद्याचे तुकडे ब्लेंडरमध्ये घाला आणि व्यवस्थित ब्लेंड करा, याची बारीक पेस्ट करून घ्या

स्टेप 3 – यानंतर ही पेस्ट एका स्वच्छ कपड्यावर काढा आणि यातील सर्व पाणी काढून घ्या. पेस्टमधून आलेलं सर्व पाणी एका बाऊलमध्ये काढून घ्या

स्टेप 4 – हे पाणी आपल्या  नियमित हेअर ऑईलमध्ये नीट मिक्स करून घ्या. तुम्ही जे हेअर ऑईल नेहमी वापरता त्यामध्येच हे पाणी मिक्स करा. इतर तेलाचा वापर करू नका. 

स्टेप 5 – यानंतर तेल आणि कांद्याच्या रसाचं हे मिश्रण तुम्ही केसांना आपल्या मुळांपासून लावायला सुरूवात करा. हळूहळू केसांची आणि स्काल्पचीही व्यवस्थित मालिश करून घ्या

ADVERTISEMENT

स्टेप 6 – हे मिश्रण केसांना नीट लावल्यानंतर साधारण 35-40 मिनिट्सने शँपू केसाला लावून केस धुवा. ही अशी संपूर्ण प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा करा. काही आठवड्यातच तुम्हाला याचा परिणाम दिसू लागेल. 

केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

कांद्याच्या रसाचा इतर वस्तूंबरोबर केसांसाठी वापर

कांद्याच्या  रसाचा इतर वस्तूंबरोबरही तुम्हाला केसांच्या मजबूतीसाठी उपयोग करता येतो. पाहूया कोणत्या इतर वस्तूंचा वापर करता येऊ शकतो.

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

ADVERTISEMENT

 

कांदा आणि बिअर

Shutterstock

बिअरदेखील केसांसाठी चांगली असते असं म्हटलं जातं. बिअरने केसांना नैसर्गिकरित्या चमक मिळते. कांद्याच्या रसामध्ये बिअर मिक्स करून केसांना लावल्यास, केसांना चांगले कंडिशनिंग मिळते आणि केस मऊ होतात. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता.

ADVERTISEMENT

कांदा आणि मध

Shuttestock

केसांची वाढ चांगली व्हावी आणि चमक चांगली राहावी यासाठी हा उत्तम उपाय आहे. कांद्याची पेस्ट घेऊन त्यात मध मिसळावा. ही पेस्ट तुम्ही केस कमी असलेल्या जागी लावल्यास, केस दाट होण्यास मदत मिळते.

कांदा आणि अंडं

ADVERTISEMENT

Shuttestock

अंडेही केसांसाठी खूपच चांगले मानले  जाते. अंड्याचा पांढरा भाग आणि कांद्याचा रस मिक्स करून घ्या.  हे मिश्रण केसांना अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर केस शँपूने धुवा. 

लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय (Home Remedies For Hair Growth In Marathi)

केसांना कांदा लावण्याचा फायदा

कांद्याचा रस हा केस लवकर वाढण्यासाठी अथवा केवळ केस मजबूत राहावे म्हणून होत नाही तर याचा अनेक तऱ्हेचा फायदा होतो. कांद्यामध्ये पोटॅशियम, विटामिन ए, सी आणि ई यांचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे केस पुन्हा येण्यासाठीही याचा फायदा होतो. तसंच केमिकलयुक्त उपचारांनी केसांना अधिक हानी पोहचते. कांदा हा नैसर्गिक ऑक्सिडंट आहे. त्यामुळे केसांना चमकदार ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्हीही कांद्याच्या रसाचा असा वापर करून मजबूत आणि चमकदार केस मिळवू शकता. तुम्हाला जास्त खर्च करण्याचीही गरज भासणार नाही आणि हा उपाय घरच्या घरीही करता येईल. 

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

31 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT