फक्त आरोग्यासाठीच नाहीतर विड्याच्या पानाचे आहेत इतरही फायदे

फक्त आरोग्यासाठीच नाहीतर विड्याच्या पानाचे आहेत इतरही फायदे

हिंदू मान्यतेनुसार विड्याच्या पानांना शुभ मानलं जातं. कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा पूजेसाठी विड्यांची पान मांडून त्यावर देवतेची स्थापना केली जाते. स्कंद पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी देवतांनी विड्याच्या पानांचा वापर केला होता. याच कारणामुळे पूजेच्या विधीमध्ये विड्याच्या पानांना खास महत्त्व असतं. या पानांशी निगडीत अनेक असे उपाय आहेत जे तुमच्या आरोग्यातील अनेक समस्या दूर करण्यास मदत करू शकतात आणि तुम्हाला देवाचा आशिर्वादही प्राप्त होईल.

Shutterstock

हनुमानाला वाहा विड्याचं पान मंगळवारी, शनिवारी किंवा हनुमान जयंतीच्या चांगल्या दिवशी एक चांगला विडा तयार करा आणि तो हनुमानाला वाहा. तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होईल, असं म्हटलं जातं. देवाला विडा वाहण्याचा अर्थ आहे की, तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात आणि देव त्याचा विडा अर्थात जबाबदारी उचलत आहे. मारूतीला विडा वाहताना त्यात गुलकंद, बडीशोप इ. वापरून विडा तयार करा आणि तो हनुमानाला अर्पित करा. 


विड्याचं दान करा विड्याचं दान केल्यास तुम्हाला पापांपासून मुक्ती मिळते आणि विड्याचं पान खाल्ल्यास तुमची पापं वाढतात, असं म्हटलं जातं. मग तुम्हाला तुमच्या पापांपासून सुटका हवी असल्यास करा पानाचं दान. 


रखडलेली काम होतील पूर्ण जर तुमचं एखादं काम खूप काळापासून रखडलं असेल आणि अनेक प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर ते पूर्ण करण्यासाठी रविवारचा दिवस निवडा. घरातून बाहेर पडा. बाहेर पडताना खिशात विड्याचं पान ठेवा. असं करणं शुभ मानलं जातं आणि रखडलेलं कामही पूर्ण होतं. 


नजरदोष होईल दूर असं मानलं जातं की, विड्याचं पान हे नकारात्मक उर्जेला दूर करतं आणि सोबत सकारात्मक उर्जैचा संचार करतं. जर एखाद्या व्यक्तीला नजरदोष लागला असेल तर विड्याच्या पानासोबत सात गुलाबाच्या पाकळ्या त्या व्यक्तीला खाऊ घालाव्या. 


शंकरासाठी खास विड्याचं पान शंकर भगवानालाही विड्याचं पान अर्पित केलं जातं. जर श्रावण महिन्यात शंकाराला विड्याचं खास पान अर्पित केल्यास मनातील इच्छा पूर्ण होईल. हे खास पान तयार करण्यासाठी काथ, गुलकंद, सुमन कतरी आणि बडीशोपचा वापर करा. शंकर देवाची पूजा करा आणि मग नैवेद्य म्हणून हे पान देवाला वाहा. 


लग्नाला उशीर होत असल्यास जर तुम्हाला आवडत्या व्यक्तीला जीवनसाथी म्हणून स्वतःकडे आकर्षित करायचं असल्यास विड्याच्या पानाचा उपाय करा. हा उपाय म्हणजे विड्याच्या पानाचं देठ घासा आणि त्याचा टिळा लावा. विवाहासाठी जी व्यक्ती पाहायला येईल ती तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमचं लग्न ठरेल, असा विड्याचा पानाचा उपाय सांगितला जातो. 

Shutterstock

मग तुम्हीही तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी विड्याच्या पानांचे वास्तूशास्त्रानुसार सांगितलेले हे उपाय नक्की करून पाहा.