लग्नाआधीच आई झाल्या या बॉलीवूड अभिनेत्री

लग्नाआधीच आई झाल्या या बॉलीवूड अभिनेत्री

बॉलीवूड म्हणजे गॉसिपचा भंडार.. लव्ह अफेअर्स आणि इतर कॉन्ट्राव्हर्सीज या कायम या क्षेत्रात सुरुच असतात. कधी कोणाच्या लिंकअपच्या बातम्या असतात तर कधी कोणाच्या ब्रेकअपच्या.. पूर्वीच्या काळी गॉसिप पसरायला थोडासा वेळ लागत होता. पण आता मात्र गॉसिप पसरायला आणि त्याची बातमी व्हायला फारसा वेळ लागत नाही. बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच आई झाल्या. जाणून घेऊया कोण आहेत या बॉलीवूड सेलिब्रिटी

ऐश्वर्याने 'या' कारणांमुळे केला होता सलमानशी ब्रेकअप

श्रीदेवी

Instagram

अभिनेत्रींच्या यादीत सगळ्यात आधी नाव घेतलं जातं ते म्हणजे श्रीदेवीचं. श्रीदेवीच्या सौंदर्याचे त्यावेळी अनेक चाहते होते. त्यांच्या कितीतरी चित्रपटांना पुरस्कार मिळाले होते. त्यांनी चित्रपट निर्माता बोनी कपूर यांच्यासोबत अचानक लग्न केले आणि अनेकांना धक्काच बसला. करिअरच्या हाय पीकवर असताना अफेअर्सच्या चर्चा असणे हे स्वाभाविक आहे. बोनी कपूर आधीच विवाहित होते. त्यांना मुलंही होती. पण श्रीदेवींच्या प्रेमात पडल्यावर ते त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवू लागले. श्रीदेवी त्यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे सगळ्यांना कळले होते. पण त्यांनी अचानक लग्न केल्यानंतर दाल मे कुछ काला है, असे लोकांना कळले कारण लग्नानंतर अगदी दोन महिन्यातच जान्हवीचा जन्म झाला. त्यानंतर श्रीदेवी यांनी एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितले की, बोनी कपूरने ज्यावेळी त्यांच्याशी लग्न केले. त्यावेळी त्या 7  महिन्यांच्या गरोदर होत्या. आता तुम्हाला कळलं असेलच की,श्रीदेवी यांचे नाव या यादीत का वर होते ते. 

अल्लादीन फेम अवनीत कौरने भावाला दिलं खास सरप्राईज

कोंकणा सेन

Instagram

आई  होण्याच्या आईमध्ये दुसरं नाव आहे ते म्हणजे कोंकणा सेन हीच. बिनधास्त स्वभावाच्या कोंकणा सेनने आपल्या उत्तम अभिनयाने एक दबदबा नक्कीच निर्माण केला आहे.  कोंकणा सेनचीही स्टोरी काहीतरी अशीच आहे. कोंकणा सेनने अचानक रणबीर शौर्यसोबत लग्न केल्याच्या बातम्या आल्या. या दोघांनी इतक्या तातडीने लग्न करण्याचे कारण कोंकणा सेनने स्वत:च मीडियाला सांगितले. त्यामुळे लग्नाच्या काहीच दिवसात ती आई झाली. तिने ही गोष्ट कोणत्याही प्रकारे लपून ठेवली नाही. तिने स्वत:च याचा उलगडा केला होता. कोंकणा सेन आणि रणवीर शौर्यचे नाते फार काही टिकले नाही. त्यांनी कालांतराने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला

अम्रिता अरोरा

Instagram

मलायकाची बहीण अमृता ही सुद्धा लग्नाआधीच गरोदर होती. अमृता अरोराने चित्रपटात फार काही चांगली कामगिरी केली नसली तरीसुद्धा तिच्य फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. 2009 साली तिने घाई घाईत शकील लडाखसोबत लग्न केले. त्यानंतर काहीच महिन्यात तिला मुलगा झाला. आता या सगळ्या प्रकरणानंतर अमृता अरोरा लग्नाआधीच गरोदर असल्याचे कळले. त्यामुळेच तिने हा निर्णय घाईत घेतला होता. 


या होत्या या यादीतील काही सेलिब्रिटी ज्यांनी कालांतरानी त्यांच्या लग्नाआधी आई होण्याच्या बातमीवर खुलासा केला.

सलमानच्या आयुष्यातील Unknown फॅक्टसचा सलमान करणार उलगडा