महाभारत मालिकेबाबतच्या या गोष्टी वाचून व्हाल अवाक

महाभारत मालिकेबाबतच्या या गोष्टी वाचून व्हाल अवाक

मैं समय हू....महाभारत....हा आवाज आता पुन्हा घराघरातून दुमदुमत आहे. कारण मनोरंजन ही मानवाच्या आयुष्यातली गरज बनली आहे. थँक्स टू 21 दिवसांच्या लॉकडाऊनला ज्यामुळे टीव्हीवर पुन्हा एकदा जुन्या मालिकांचं टेलीकास्ट सुरू झालं आहे. ज्यामध्ये दूरदर्शनवर महाभारत आणि रामायणसारख्या लेजंडरी मालिका दाखवण्यात येत आहेत. हो...महाभारत ही मालिका तुम्हाला दूरदर्शनवर रोज दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता डीडी भारतीवर पाहता येणार आहे. महाभारत ही मालिका रवी चोप्रा यांच्या दिग्दर्शनात बनवण्यात आली होती आणि बी आर चोप्रांनी यांची निर्मिती केली होती. त्याकाळात एवढ्या ग्रँड स्केलवरची मालिका बनवणं सोपं नव्हतं. या मालिकेच्या बाबतचे काही रंजक किस्से आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मग लगेच वाचा.

Instagram

 • महाभारत मालिकेचा पहिला भाग हा दूरदर्शनवर 2 ऑक्टोबर 1988 साली म्हणजे तब्बल 32 वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता. या मालिकेचे त्या काळी तब्बल 94 भाग टेलीकास्ट करण्यात आले होते. 
 • IMDB रेटिंगनुसार ही मालिका भारतीय मालिकांमधील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. 
 • भारतीय ऋषी वेद व्यास यांनी लिहीलेल्या महाभारत या हिंदू ग्रंथावर ही मालिका आधारित आहे. या मालिकेच्या निर्मितीआधी सतीश भटनागर आणि त्यांच्या टीमने भरपूर रिसर्च केलं आणि महाभारतावरील विविध भाषांमधील पुस्तकंही वाचली होती. 
 • या मालिकेच्या त्या काळचं बजेट होतं 9 करोड. 
 • बी आर चोप्रा यांना महाभारताचा निवेदक म्हणून एका चांगल्या आवाजाची गरज होती. यासाठी त्यांनी दिलीप कुमार आणि एनटी रामा राव यांना विचारणा केली होती. 
 • प्रसिद्ध उर्दू कवी राही मासूम रझा यांनी या मालिकेची स्क्रीप्ट लिहीली होती. ज्यांनी मैं तुलसी तेरी आंगन की, मिली आणि लम्हे यासारखे चित्रपटही लिहीले होते. 
 • तब्बल 15,000 लोकांनी या मालिकेतील विविध भूमिका करण्यात रस दाखवला होता. ज्यापैकी 1500 चं स्क्रिनिंग करून त्यांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं आणि मग व्हिडिओ स्क्रीन टेस्टसाठी बोलावण्यात आलं. ज्याला तब्बल 8 महिने लागले. गुफी पेंटल हे मालिकेचे कास्टिंग डिरेक्टर होते. ज्यांना मालिकेत शकुनी मामाचा रोलही केला होता.  
 • या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारलेल्या नीतीश भारद्वाज यांना लोकांनी खऱ्या आयुष्यातही तसंच प्रेम दिलं. काही लोकं तर कृष्णदेव म्हणून त्यांच्या पायाही पडले होते. 
 • जुही चावला द्रौपदीच्या रोलसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. मात्र कयामत से कयामत तक मिळाल्यावर तिने माघार घेतली आणि ही भूमिका रूपा गांगुलीला मिळाली. 
 • या मालिकेत सर्वात जास्त आव्हानात्मक होतं ते युद्धाचा भाग चित्रित करणं. या चित्रिकरणासाठी जून महिन्यात जयपूरमध्ये तब्बल 40 किलोमीटरचा परिसर वापरण्यात आला होता.  
 • लहानग्यांच्या आवडत्या शक्तीमानला आधी दुर्योधनाची भूमिका विचारण्यात आली होती मात्र ती नकारात्मक असल्याने त्यांनी भीष्माची भूमिका साकारली. 
 • माया महलच्या सिक्वेन्ससाठी त्या काळी क्रोमा टेक्निकचा वापर करण्यात आला होता. तर द्रौपदी वस्त्रहरणच्या सिक्वेन्ससाठी तब्बल 250 मीटर साडीचा वापर करण्यात आला.

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवरक्लिक करा.