ADVERTISEMENT
home / Fitness
आश्चर्यकारक! डान्स वर्कआऊट करुन तुमचे वजन होऊ शकते कमी (Dance Workout For Weight Loss)

आश्चर्यकारक! डान्स वर्कआऊट करुन तुमचे वजन होऊ शकते कमी (Dance Workout For Weight Loss)

वजन कमी करणे हा 100 पैकी 95 जणांच्या मनात तरी नक्कीच असेल. तुम्हालाही वजन कमी करण्याची इच्छा आहे. पण तुमच्याकडून वर्कआऊट होत नसेल आणि डाएट होत नसेल तर तुम्हाला काहीतरी वेगळे ट्राय करायला हवे नाही का? जर तुम्हाला घरीच राहून आणि अगदी मजेशीर पद्धतीने असा व्यायाम करायचा असेल तर तुमच्यासाठी डान्स वर्कआऊट हा उत्तम आहे. जर तुम्ही डान्स वर्कआऊटविषयी ऐकले असेल तर हा डान्स वर्कआऊट तुमचे वजन कमी कसे करेल याची माहितीही तुम्हाला माहीत हवी. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला डान्स वर्कआऊटबद्दल सांगणार आहोत.मग जाणून घेऊया वजन कमी करणारा हा डान्स वर्कआऊट.

वजन कमी करण्यासाठी हे आहेत डान्स वर्कआऊट (Dance Workout For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी काही डान्सप्रकार अगदी आवर्जून करायला सांगतात. त्यापैकीच काही महत्वाचे प्रकार आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. हे प्रकार सांगण्यासोबतच आम्ही तुम्हाला या डान्स वर्कआऊटचे फायदे आणि त्यासाठी लागणारा वेळ, सोबतच एक व्हिडिओदेखील शेअर करणार आहोत.

पोहण्याचे फायदे (Benefits Of Swimming In Marathi)

ADVERTISEMENT

1. झुंबा (Zumba)

डान्स वर्कआऊटमधील सर्वश्रूत असा प्रकार म्हणजे ‘झुंबा’ तुम्ही या डान्सप्रकाराबद्दल नक्कीच ऐकले असेल. झुंबा हा प्रकार पाश्चिमात्य वर्कआऊटचा प्रकार आहे. पण हल्ली यावर बॉलीवूडची गाणीदेखील लावली जातात आणि डान्स केला जातो. या वर्कआऊटमध्ये तुमच्या हात, पाय आणि कंबर यांची योग्यपद्धतीने हालचाल केली जाते. त्यामुळे हा डान्स केल्यानंतर अगदी 5 मिनिटात तुम्हाला घाम येऊ लागतो. आता या डान्स वर्कआऊटची तयारी कशी करायची ते आपण पाहुया.

कसा कराल?:

  • सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या घरातील एक असा कोपरा निवडा. जिथे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही.
  • थोडासा वॉर्मअप करुन तुम्ही हालचाल करायला सुरुवात करा. या वॉर्मअपमध्ये तुम्हाला हात, पाय, कंबर सैल करुन घ्यायचे आहे. 
  • डान्स करताना तसे कोणतेही कपडे घातले तरी चालतात. पण तरीसुद्धा तुम्ही असा वर्कआऊट करताना थोडे सुटसुटीत कपडे घालायला हवे. 
  • हळुहळू व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अगदी तसेच झुंबा करायचा प्रयत्न करायचा आहे.


फायदे – झुंबा हा डान्स प्रकार फारच थकवणारा आहे. जर तुम्ही अगदी व्यवस्थित एक एक स्टेप्स फॉलो करुन हा डान्स केला तर तुम्हाला जाणवेल की, तुमचे शरीर आता एकदम मोकळे आणि लवचिक झाले आहे. पहिले काही दिवस तुम्हाला तुमचे शरीर मोकळे वाटेल. पण जर तुम्ही सातत्य ठेवले तर तुम्हाला तुमच्या शरीरात झालेला बदलही नक्की जाणवेल.

कॅलरीज – साधारण अर्धा तास ते एक तास झुंबा केल्यानंतर तुम्ही साधारणपणे 250 ते 650 कॅलरीज बर्न करु शकता.

ADVERTISEMENT

लागणारा वेळ – आता तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही हा झुंबा करु शकता. सुरुवातीला 15 मिनिटांपासून सुरु करा आणि मग तुम्ही वेळ वाढवा. 

म्हणून व्यायाम करताना तुम्ही घालायला हवी स्पोर्ट्स ब्रा… नाहीतर

2. एरोबिक झुंबा (Aerobic Zumba)

झुंबाचे एक अॅडव्हान्स व्हर्जन म्हणजे एरोबिक झुंबा. एरोबिक झुंबा थोडा शिस्तबद्ध असतो. म्हणजे काही व्यायामाचे प्रकार डान्समध्ये गुंफण्यात आलेले असतात.तुम्ही वर्कआऊटमध्ये ज्या प्रमाणे रेपिटेशन करता अगदी तसेच सेट तुम्हाला यामध्ये करायचे असतात. आता यामध्येही विविधता आली. तुमच्या कंबर, पोटाकडील फॅट कमी करण्यासाठी एरोबिक झुंबा मदत करते. 

कसा कराल?: 

ADVERTISEMENT
  • एरोबिक झुंबा करताना तुम्हाला सगळ्यात आधी थोडे वॉर्मअप करणे गरजेचे असते. 
  • पण या एरोबिक झुंबाची सुरुवातच तुम्हाला अशा रिलॅक्सिंग एक्सरसाईजने होते.
  •  एरोबिक झुंबा करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स दिल्या जातात. त्या तुम्हाला नीट पाहून करायच्या असतात. 
  • यामध्ये गाणे फार महत्वाचे नसते तर तुम्ही स्टेप्स फॉलो करणे फार गरजेचे असते. 
  • एरोबिक्स या व्यायामप्रकाराचे हे डान्स व्हर्जन आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.

फायदे – तुमच्या शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करुन तुमच्या शरीराला छान शेप देण्यासाठी एरोबिक झुंबा केला जातो. पोट, कंबर, मांड्या आणि हातांचा थुलथुलीतपणा त्यामुळे कमी होण्यास मदत मिळते. 

कॅलरीज – तासभर असा पद्धतीचा डान्स वर्कआऊट करुन तुम्ही साधारण 250 ते 600 कॅलरीज बर्न करु शकता. 

लागणारा वेळ – तुम्हाला अगदी बेसिक सुरुवात करायची असेल तर तुम्ही 20 मिनिटांपासून करा. 

चेहऱ्याचा व्यायाम जो आणेल तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट

ADVERTISEMENT

3. पोल डान्सिंग (Pole Dancing)

ऐकायला वेगळा आणि करायला फारच सोपा असा हा डान्सचा प्रकार वाटत असला तरी हा डान्स करण्यासाठी तुम्हावा फारच मेहनत करावी लागते. जर तुम्ही अशापद्धतीचा डान्स प्रकार केला नसेल आणि तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर हा डान्स प्रकार तुम्ही नक्की करुन पाहा. 

कसा कराल?:

  • पोलडान्सिंग हा प्रकार तुम्हाला मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली करणे फारच गरजेचे असते. 
  • पोल डान्सिंगची सुरुवात करताना तुम्हाला थोडा वॉर्मअप करावा लागतो. 
  • सुरुवातीला तुमची क्षमता लक्षात येईपर्यंत अगदी लाईट पोल डान्सिंगच्या स्टेप्स घेतल्या जातात. मग तुम्हाला हा डान्स इन्टेन्सपद्धतीने शिकवला जातो.

फायदे – पोल डान्सिंग हा प्रकार खूपच फायदेशीर असा आहे. तुमच्या हाडांना, स्नायूंना बळकटी आणण्याचे काम हा प्रकार करते. तुमचे अंग लवचिक करते. शिवाय तुमच्या शरीरातील फॅट कमी करुन तुमचे वजन कमी करण्यास तुम्हाला मदत करते.

कॅलरीज – पोल डान्सिंगमध्येही तुम्ही साधारण तासाला 250 ते 350  कॅलरीज बर्न करता. 

ADVERTISEMENT

लागणारा वेळ- तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल तर तुम्हाला अगदी काही बेसिक डान्स शिकवला जातो. त्यानंतर तुम्हाला हा डान्स करता येईल. 

4. बॉलरुम डान्स (Ballroom Dance)

बॉलरुम डान्स हा डान्सचा एक प्रसिद्ध प्रकार आहे. हा प्रकार तुम्ही केवळ पार्टीसाठी केला असेल तर या डान्सचे फिटनेस महत्व आहे. त्यामुळे तुम्हाला फिटनेस आणि डान्स करायचा असेल तर तुम्ही हा डान्सप्रकार करु शकता. 

कसा कराल?:

  • वॉर्मअप करुन घ्या.तुमचे अंग सैल झाले की तुम्ही हा व्यायाम करायला तयार झाला आहात. 
  • हा व्यायाम थोडा लाईट असतो. यासाठी तुम्हाला पार्टनरची गरज लागत नाही. 
  • ट्रेनरच्या अध्यक्षतेखाली तुम्ही बॉलरुम डान्स करु शकता. आता याच्या स्टेप्स या अगदी साल्सा, चाचा डान्सप्रमाणे असतात.

फायदे – तुमच्या शरीराला लवचिक करण्याचे काम  हा डान्सप्रकार करतो. तुम्हाला अॅक्टिव्ह करण्याचे काम हा व्यायामप्रकार करतो. 

ADVERTISEMENT

कॅलरीज – तासाभरात तुम्ही साधारण 350 कॅलरीज बर्न करता. 

लागणारा वेळ – तुम्हाला या वर्कआऊटसाठी किमान तासभर तरी लागेल.

5. बुटी योगा (Buti Yoga)

कार्डिओमधला थोडा अधिक जास्त इंटेन्स असा बुटी योगा असतो. हा एक प्रकारचा ट्रायबल डान्सचा प्रकार आहे.  तुमचे वजन कमी करण्यासोबतच तुमच्या शरीराला सुडौल बनवण्याचे काम हा व्यायामप्रकार करतो. 

कसा कराल?:

ADVERTISEMENT
  • बुटी योगामध्ये अनेक व्यायामप्रकार एकाचवेळी तुम्हाला वेगवेगळे व्यायाम करायचे असतात.  हे व्यायाम तुमची चांगलीच दमछाक होते. 
  • यामध्ये तुमच्या संपूर्ण शरीराचा वर्कआऊट होतो. 
  • या वर्कआऊटची सुरुवात तुम्हाला अगदी लाईट वर्कआऊटने करायची असते.

फायदे – तुमचे शरीर टोन्ड करायला बुटी योगा मदत करते. या शिवाय तुमच्या स्नायूंना आणि हाडांना बळकटी आणण्याचे कामही हा योगा प्रकार करते.

कॅलरीज – हा हाय इन्टेसिटी वर्कआऊट असल्यामुळे तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करता येतात. साधारण तासाभरात तुम्ही 500 हून अधिक कॅलरीज बर्न होतात.

लागणारा वेळ – साधारण  30 मिनिटांपासून तुम्ही या वर्कआऊटला सुरुवात करा आणि जास्तीत जास्त वेळ तुम्ही कॅलरीज बर्न करण्यासाठी हा वर्कआऊट करा.

ADVERTISEMENT

नाचण्याचे आहेत हे अफलातून फायदे (Benefits Of Dancing In Marathi)

जाणून घ्या नाचण्याचे फायदे - Dance Workout For Weight Loss In Marathi

shutterstock

तुम्हाला नाचायला आवडत असेल तर अगदी बिनधास्त नाचा. कारण नाचण्याचे अफलातून फायदे आहेत. म्हणूनच जाणून घेऊया नाचण्याचे फायदे

लवचिकता वाढवते (Flexibility)

तुम्ही अगदी कोणत्याही प्रकारचा डान्स करत असाल तरी या डान्समुळे होणारा पहिला फायदा म्हणजे तुमच्या शरीराची लवचिकता वाढवणे. तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल केल्यामुळे हा फरक तुम्हाला जाणवू लागतो. काही जणांना शारिरीक हालचाल करायची अजिबात सवय नसते. त्यांच्यातील मरगळ झटकण्यासाठी आणि त्यांना थोडे अॅक्टिव्ह करण्यासाठी नाचणे हा उत्तम पर्याय आहे. दिवसातील अगदी 15 मिनिटांच्या नाचानेही तुमच्यामध्ये झालेला फरक तुम्हाला अगदी आठवडाभरात लक्षात येईल. 

ADVERTISEMENT

घरच्या घरी पायाचा थुलथुलीतपणा कमी करतील Ankle weights वाचा कसे

शरीर करते पिळदार (Toned Muscle)

बारीक होणे हा तुमचे उद्दिष्ट असेल तर तुम्हाला एक गोष्ट माहीत हवी ती अशी की, तुमच्या शरीरातील मसल चांगले असणे गरजेचे असते. म्हणजेच तुमचे शरीर पिळदार असणे फार आवश्यक असते. डान्स केल्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि त्यामुळे तुमचे शरीर पिळदार होण्यास मदत मिळते. त्यामुळे जर तुमच्या शरीराला थुलथुलीतपणा आला असेल तर तुम्ही मस्त नाचा.

वजन ठेवते नियंत्रणात (Weight Management)

नाचताना तुम्ही तुमच्या बऱ्याच कॅलरीज बर्न करता. साधारण अर्धा तास जर तुम्ही डान्स केला तर तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास डान्स मदत करते. डान्स हा एक प्रकारचा कार्डिओ वर्कआऊट आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातील फॅटही कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर मग तुम्ही डान्स करायला हवा.

हृदय आणि फुफ्फुसे ठेवतात निरोगी (Healthy Heart And Lungs)

तुम्ही आनंदी असाल तर तुमचे हृदय आणि फुफ्फुस निरोगी राहते. तुमच्या मनावरील ताण कमी करण्याचे काम डान्स करत असते. डान्स केल्यानंतर तुम्हाला घाम येतो. तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळेच तुम्हाला छान रिफ्रेश वाटते. त्यामुळे निरोगी फुफ्फुसे आणि निरोगी हृदयासाठी तरी तुम्ही जसा जमेल तसा डान्स करायला हवा.

ADVERTISEMENT

हाडांना आणताता बळकटी (Stronger Bones)

ज्याप्रमाणे नाचणे तुमच्या स्नायूंना म्हणजेच मसलला बळकटी आणण्यासाठी चांगले असते. जर तुम्हाला सांधेदुखी किंवा असे काही त्रास असतील तर तुम्ही डान्स करायला हवा. पण तुम्ही अगदी योग्य पद्धतीने डान्स करणे फार आवश्यक असते. तुमच्या हाडांची योग्य पद्धतीने हालचाल करण्यासाठी तरी तुम्ही डान्स करायला हवे.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQs)

1. डान्सचा तुमच्या शरीरावर काय परीणाम होतो? 
डान्स करण्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. उलट नाचण्याचे अधिकाधिक फायदेच आहेत. डान्स तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ करण्याचे काम करते. डान्स करताना तुम्ही छान तुमच्या आवडीचे गाणे लावता त्यामुळे तुमच्या मनावर आलेला ताण मोकळा होण्यास ही डान्स मदत करते. जर तुम्हालाही कधी थकवा किंवा फार कंटाळा आला असेल तर अशावेळी थोडं नाचून पाहा. तुम्हालाही थोडं बरं वाटेल.

2. डान्समध्ये तुम्ही नेमक्या किती कॅलरीज बर्न करता? 
कॅलरीज बर्न करण्यासाठी तुम्ही डान्स करत असाल तर तुम्हाला तेवढ्या ताकदीचा डान्स करणे फारच गरजेचे असते. म्हणजे जर तुम्ही डान्स वर्कआऊट पाहिले असतील तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल ती अशी की, तुमच्या कॅलरीज बर्न करण्यामध्ये फरक असतो. आता जर तुम्ही झुंबा किंवा एरोबिक झुंबा करत असाल तर तुम्ही हमखास 100 कॅलरीज बर्न करता पण तुम्ही किती वेळ आणि किती योग्य पद्धतीने झुंबा करता हे देखील जाणून घेणे फार गरजेचे आहे. 

3. डान्स केल्यामुळे तुमचे पोट कमी होऊ शकते का?
तुमच्या शरीरातील फॅट कमी करण्याचे काम कार्डिओ व्यायामप्रकार करत असतात. पोटाजवळ साचलेली चरबी कमी करण्यासाठी तुम्ही डान्स करणार असाल तर तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल. अगदी एक दोन डान्स करुन तुमचे पोट पटकन कमी होणार नाही. तुम्ही जर वरील डान्स वर्कआऊटप्रमाणे डान्स केला तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होऊ शकेल. 

ADVERTISEMENT

आता डान्स वर्कआऊटचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही आजपासूनच घरी सुरु करा डान्स वर्कआऊट आणि राहा फिट अॅण्ड फाईन.

21 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT