केस कसे धुवावे आणि कसं करावं कंडिशन, जाणून घ्या डॉ.अप्रतिम गोयल यांच्याकडून

केस कसे धुवावे आणि कसं करावं कंडिशन, जाणून घ्या डॉ.अप्रतिम गोयल यांच्याकडून

लॉकडाऊनच्या काळात सगळेच तणावाखाली आहेत. त्यामुळे साहजिकच याचा परिणाम आपल्या केसांवरही होत आहे. ज्यामुळे केसगळती आणि केसात कोंडा होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मग या काळात जेव्हा आपण पार्लरलाही जाऊ शकत नाही तेव्हा केसांची निगा कशी राखावी. मुख्य म्हणजे जेव्हा आपण रोजच घरात आहोत तेव्हा केस किती वेळा धुवावे हा प्रश्न आहे. केसांबाबतच्या महत्त्वपूर्ण टिप्स या लेखात दिल्या आहेत क्युटीज क्लिनिकच्या सीईओ डॉ. अप्रतिम गोयल यांनी. ज्या स्वतः डर्मेटोलॉजिस्ट आहेत.

तुमच्या केसांचा प्रकार कोणता आहे?

प्रत्येकाच्या केसांचा प्रकार हा वेगळा असतो. तसंच लॉकडाऊनसारख्या काळात काहींचे केस तणावामुळे लवकर तेलकट होऊ शकतात. तर काहींचे नाही. त्यामुळे सगळ्यांना केसांच्या काळजीबाबत समान नियम लागू होतीलच असं नाही. तुमच्या केसांचा प्रकार ओळखून त्याप्रमाणे केस धुवा. कारण केस वेळेवर न धुतल्यास खाज येणे, कोंडा आणि केसगळतीही होऊ शकते. तसंच सतत धुतल्यानेही केसांतील नैसर्गिक तेल कमी झाल्याने केस राठ होऊ शकतात आणि स्कॅल्पची जळजळही होऊ शकते. 

नॉर्मल केसांची काळजी

या प्रकारचे केसही बरेचदा चिकट होतात. त्यामुळे अशा प्रकारचे केस तुम्ही रोज धुतल्यास कधीही फायदेशीर ठरेल. 

तेलकट केसांची काळजी

केसांतील अतिरिक्त तेल हा केसांचा सर्वात मोठा शत्रू असतं. तुमच्या स्कॅल्पमधून रोज किती प्रमाणात तेल बाहेर पडतं त्यावर तुम्ही केस आठवड्यातून किती वेळा धुवावे हे ठरवू शकता. जर तुमचे केस तणावामुळे जास्त तेलकट होत असल्यास ते रोज धुवू शकता. 

कुरळे किंवा वेव्ही केसांची काळजी 

अशा केसांचा व्हॉल्यूम कायम राहण्यासाठी तुम्ही ते दर दोन दिवसांनंतर धुवू शकता. असे केस धुण्यासाठी सल्फेट फ्री क्लिंजर ज्यात मॉईश्चरायजिंग गुण असतील त्याचा वापर करा. 

डॅमेज किंवा कलर्ड केसांची काळजी 

डॅमेज क्युटिकल्समुळे केसांचा लुक हा कोरडा आणि राठ होतो. तर सतत कलरच्या वापरामुळे केस कोरडे होतात. त्यामुळे असे केस धुण्यासाठी सल्फेट फ्री शँपूचा नियमितपणे वापर करा किंवा कलर-सेफ शँपूने आठवड्यातून दोन-तीन वेळा केस धुवा. 

 

Shutterstock

लक्षात घ्या या काळात कोणत्याही स्टायलिंग प्रोडक्ट्सचा वापर कमीतकमी करा. कारण आधीच तणावात्मक परिस्थिती असल्याने तुमच्या केसांचं जास्त नुकसान होऊ शकतं. त्यामुळे केसांची नीट काळजी घ्या.

केस कसे धुवावे?

Shutterstock

  • कधीही केस धुताना ते हळूवारपणे धुवा. लक्षात ठेवा की, शँपू हा केसांतील घाण आणि स्कॅल्पवरील तेल कमी करण्यासाठी वापरायचा आहे. शँपू लावल्यानंतर केस स्वच्छ धुवा. केसांसाठी कंडिशनरचा वापर करा. कंडिशनर कधीही स्कॅल्पला लावू नका.  
  • कधीही कंडिशनर केसांना लावताना ते केसांच्या टोकापासून वरपर्यंत असं लावा. कंडिशनर कधीही स्कॅल्पला लावून नये. खासकरून जेव्हा तुमचे स्कॅल्प तेलकट असेल. तसंच कधीही जास्त प्रमाणात कंडिशनर स्कॅल्पला लावता कामा नये. यामुळे केस चिकट दिसू शकतात.