ADVERTISEMENT
home / Recipes
ओट्स पासून तयार करा सकाळच्या नाश्त्यासाठी ‘या’ स्वादिष्ट रेसिपीज

ओट्स पासून तयार करा सकाळच्या नाश्त्यासाठी ‘या’ स्वादिष्ट रेसिपीज

दररोज नाश्त्यासाठी काय नवीन करावं हा प्रश्न आजकाल सर्वांनाच पडत आहे. कारण लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सर्वच मंडळी घरात आहेत. सकाळच्या नाश्त्याप्रमाणेच आता संध्याकाळच्या ‘चाय टाईम स्नॅक्स’ची मागणीही वाढली आहे.  शिवाय बाजारात जीवनावश्यक वस्तू नेहमीपेक्षा कमीच मिळत आहेत. त्यामुळे बिस्कीट, इंन्स्टंट स्नॅक्सचा तुटवडा भासतोय. घरातील लहानमुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आवडेल असं काहीतरी घरातच करणं आता गृहिणींना भाग आहे. याचबरोबर लॉकडाऊनमुळे आता घरातील सर्वजण शेफ होण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाला या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी काही तरी नवनवीन रेसिपीज शिकायच्या आहेत. त्यामुळे आज काय नवीन ? हा प्रश्न व्हॉट्सअॅप फॅमिली ग्रूपवरदेखील सतत विचारला जातोय. घरात असलेल्या पदार्थांपासूनच काहीतरी युनिक आणि पौष्टिक करण्यासाठी स्वयंपाकात कौशल्य असावंच लागतं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत ओट्सपासून तयार होणाऱ्या या पाच स्वादिष्ट रेसिपीज शेअर करत आहोत. ज्यामुळे आज तुम्हाला घरीच काहीतरी नवीन नक्कीच करता येईल. शिवाय या रेसिपीज पौष्टिक असल्यामुळे तुमचं आणि कुटुंबियांचं यामुळे योग्य पोषणही होईल. 

Shutterstock

ओट्स आहे नाश्त्याचा बेस्ट पर्याय

ओटस् खाण्याचे तुमच्या शरीरावर अनेक चांगले फायदे  होतात. कारण ओट्स हे पूर्ण अन्न आहे. शिवाय त्यामध्ये फॅट्सचे प्रमाण खूप कमी आहे. घरातील वृद्ध मंडळी ज्यांना कोलेस्ट्रॉल, मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ओट्स अतिशय फायदेशीर आहेत. ओट्समध्ये फायबर्स, मॅग्शेशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असल्यामुळे घरातील लहान मुलं, महिला, पुरूष अशा सर्वांनाच त्याचा फायदा होऊ शकतो.  सकाळी नाश्त्यात ओट्स खाण्यामुळे दिवसभर पोट भरलेलं राहतं आणि घरात राहील्यामुळे विनाकारण लागणारी भुक कमी होते. ज्यामुळे तुमचं वजन नक्कीच नियंत्रणात राहू शकतं. असे अनेक फायदे ओट्समध्ये आहेत म्हणून आठवड्यातून एक ते दोनवेळा नाश्त्याला ओटसचे पदार्थ करणं फार गरजेचं आहे. 

ADVERTISEMENT

ओट्स इडली –

साहित्य –

दोन कप रवा, एक कप ओट्स, एक कप दही, तेल आणि इनो

 

कृती –

ADVERTISEMENT

ओट्स तव्यावर थोडे गरम करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. रवा आणि ओट्सची पावडर एकत्र करा आणि त्यामध्ये दही टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.  एक तासानंतर या मिश्रणात इनो टाकून चांगले मिक्स करा. इडलीच्या भांड्याला तेल लावून बॅटर त्यात चमच्याने टाका, वीस मिनीटे इडलीचे भांडे वाफवून घ्या. गरमागरम इडली तयार होईल. ओट्सच्या इडली तुम्ही खोबऱ्याची चटणी, सांबर अथवा अगदी टोमॅटो सॉससोबतदेखील खाऊ शकता. 

ओट्सचे लाडू –

साहित्य –

दोन वाट्या ओट्स, वाटीभर गुळ, खजूर, बदाम, काजू, पिस्ता, वेलची पावडर, चवीपुरतं मीठ,  तूप

कृती –

ADVERTISEMENT

ओट्स तव्यावर गरम करून ते वाटून घ्या, सुकामेवादेखील तूपावर भाजून वाटून घ्या. सुकामेवा आणि खजूर मिक्सरमध्ये वाटून घ्या. या सर्व मिश्रणात गूळ टाका. वेलची पावडर चवीपुरतं मीठ टाकून तुपाचा हात लावून मस्तपैकी लाडू वळा.

Instagram

ओट्स डोसा अथवा उतप्पा

साहित्य –

ADVERTISEMENT

ओटमील, दही, आवडीनुसार रवा, बेसन अथवा गव्हाचे पीठ, आवडीप्रमाणे भाज्या, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, नॉनस्टीक तवा

 

कृती – 

ओट्सपासून इंन्संट उत्तपा अथवा डोसा करण्यासाठी ओटस तव्यावर थोडे गरम करा आणि मिक्सरमध्ये वाटून त्याची जाडसर पावडर तयार करा.ओट्स पावडरमध्ये तुमच्या आवडीनुसार थोडेसे रवा, बेसन अथवा गव्हाचे पीठ मिसळा.  चवीपुरतं मीठ टाका आणि सर्व मिश्रण एकत्र करा.एका भांड्यांत दही आणि पाणी घुसळून त्याचं ताक करून घ्या. कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या आणि मिश्रणामध्ये मिसळून ते व्यवस्थित एकजीव करा.तिखट आवडत असल्यास एखादी हिरवी मिरची बारीक चिरून त्यात टाका. तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या बारीक चिरून त्यापासून उत्तपा तयार करू शकता. मिश्रणाला सरसरीत करण्यासाठी गरजेनुसार पाणी मिसळा.लगेच उत्तपा करायचे असतील तर एक चिमुट सोडा त्यामध्ये टाका. मात्र जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल आणि त्यात सोड्याचा वापर तुम्हाला टाळायचा असेल तर अर्धा तास हे मिश्रण बाजूला ठेवून द्या.नॉनस्टीक तव्याला थोडंसं तेल लावा आणि त्यावर तुमच्या सोयीनुसार आकाराचे उत्तपा तयार करून घ्या. तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करा.मध्यम आचेवर उत्तपा तव्यावर शेकवा. उतप्पा कुरकुरीत करण्यासाठी त्याच्या बाजून चमचाभर तेल सोडा.उत्तपा पलटून घ्या आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकवा.सोनेरी रंगाचा झाल्यावर गरमागरम सर्व्ह करा.नारळाची चटणी, टोमॅटो सॉससोबत हा उत्तपा अगदी स्वादिष्ट लागतो. 

ADVERTISEMENT

Instagram

ओट्स उपमा –

साहित्य –

ओट्स, चिरलेला कांदा, मटारचे दाणे, तेल, कडीपत्ता, जिरे, हिरवी मिरची, हळद, मीठ, कोथिंबीर, लिबू आणि खोबरं

ADVERTISEMENT

 कृती –

कढईत तेल गरम करा आणि त्यात कांदा परतून घ्या. हिरवी मिरची, कडीपत्ता, जिरे टाका. मटारचे दाणे टाकून ते वाफवून घ्या. सर्वात शेवटी त्यात ओटस् टाका आणि वरून आवश्यक्तेनुसार गरम पाणी टाका. ओटस शिजल्यावर त्याला वरून कोथिंबीर, खोबरं आणि लिंबाने सजवा. 

Instagram

ADVERTISEMENT

ओट्सचे दही वडे –

साहित्य –

ओटस, मुगडाळ, उदीड डाळ, चणाडाळ, आले, हिरवी मिरची, हिंग, लाल तिखट, कोथिंबीर, मीठ. चिंचेची चटणी, तेल

कृती –

एक कप मुगडाळ आणि एक कप उडीद डाळ रात्री भिजत घाला. सकाळी या मिश्रणात चार कप ओट्स, आलं आणि हिरवी मिरची टाकून वाटून घ्या. हे मिश्रण तळून अथवा उकडून तुम्ही दही वडे तयार करू शकता. तुमच्या गरजेनुसार दहिवडे तयार करा. दहिवडे पाच मिनीटे थंड पाण्यात ठेवा. पाण्यातील वडे घट्ट दाबून घ्या ज्यामुळे त्यातील पाणी निघून जाईल. एका प्लेटमध्ये दहीवडे ठेवा ज्यावर थंडगार दही, लाल तिखट, मीठ, गोड चटणी, कोथिंबीर टाकून सजवून सर्व्ह करा. 

ADVERTISEMENT

Instagram

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

नाचणीपासून तयार केलेल्या ‘या’ सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज

झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास (Easy Breakfast Recipes In Marathi)

तुमचा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी बनवा ‘ह्या’ रेसिपीजने (Healthy Breakfast)

ADVERTISEMENT
16 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT