ऑरगॅनिकच्या काळात हल्ली अनेकांना सगळ्याच गोष्टी ऑरगॅनिक हव्या असतात. ऑरगॅनिक भाज्या, ऑरगॅनिक फळ मिळवण्यासाठी अगदी दुप्पट किंमतीही दिल्या जातात. आता सगळीचं झाडं तुम्हाला बाल्कनीमध्ये लावता येणार नाहीत. पण काही भाज्या तुम्ही अगदी सहजच तुमच्या घरात उगवू शकता. आता कोथिंबीरच घ्या ना. आपण सगळेच जेवणात कोंथिंबीरचा वापर करतो. तुम्ही घरीच तुमच्यापुरती कोथिंबीर अगदी सहजच उगवू शकता. पण कोथिंबीर उगवण्याचीही एक पद्धत आहे. तुम्ही घरातील धण्याचे दाणे पेरल्यानंतर त्यातून कोथिंबीर येईलच असे नाही. कारण त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात. जाणून घेऊया घरच्या घरी बाल्कनीमध्ये कशी उगवायची कोथिंबीर
आता तुम्हाला कोणतीही भाजी घरी करायची असेल तर तुम्हाला काही पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी तुम्हाला 40% गार्डन सॉईल (माती) 20% कोकोपीठ किंवा रेती, 40% कंपोस्ट खत हे साहित्य तुम्हाला लागेल. जर तुमच्याकडे हे साहित्य असेल तर भाजी अगदी उत्तम पद्धतीने रुजून येते. त्यामुळे तुम्ही आधी या गोष्टी घरी आणा. हल्ली कोकोपीठ, कंपोस्ट खत या गोष्टी विकत मिळतात. त्यामुळे तुम्हाला फार टेन्शन घेण्याचे कारण नाही.
कचऱ्यापासून तयार करा असे केमिकल फ्री औषध ... पळवा पाली आणि चिलटं
आता आज आपण कोथिंबीर लावणार आहोत याचाच अर्थ आज आपण धणे पेरणार आहोत. पण धण्याचे दाणेही यासाठी चांगले असणे गरजेचे असते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे धण्याचे दाणे घ्या. जुणे आणि खराब झालेल्या धण्यांच्या दाण्यांमधून कोथिंबीर उगवेल असे अजिबात सांगता येत नाही. म्हणून तुम्ही बाजारातून ताजे धण्याचे दाणे आणल्यास फारच उत्तम
कचऱ्यापासून तयार करा असे केमिकल फ्री औषध ... पळवा पाली आणि चिलटं
मग आता विचार कसला करताय आजच तुमच्या बाल्कनीतील कुंडीमध्ये रुजत घाला धणे आणि मिळवा कोथिंबीर