आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. आपल्या सौंदर्यासह आपल्या कपड्यांचीही काळजी प्रत्येक महिला घेत असते. विशेषतः आपल्या ब्रा आणि अंडरगारमेंट्सची. पण बऱ्याचदा आपले अंडरगारमेंट्स लवकर खराब होत असतात. त्यातही ब्रा लवकर खराब होते. पण तुम्हाला जर तुमची ब्रा जास्त काळ टिकवून ठेवायची असेल तर काही सोप्या टिप्स आम्ही या लेखातून तुम्हाला देणार आहोत. महिला खरं तर आपल्या आकारच्या ब्रा आणि अंडरगारमेंट्स तर विकत घेतात पण त्याची काळजी योग्यरित्या ठेऊ शकत नाहीत. त्यामुळे हे कपडे लवकर खराब होतात. पण तुम्ही ते योग्य तऱ्हेने हाताळलेत तर तुम्हाला सतत त्याची खरेदी करावी लागणार नाही. नव्या ट्रेंड्ससाठी नक्कीच खरेदी करा. पण त्याची काळजी कशी घ्यायची आणि ते जास्तीत जास्त कसे टिकवून ठेवायचे याचीही माहिती घ्या आणि या सोप्या टिप्स तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की फायदा मिळेल. ब्रा आणि अंडरगारमेंट्सचे कापड हे अतिशय मुलायम असते. त्यामुळे ते लवकर खराब होते. पण तुम्ही या सोप्या टिप्स वापरा.
स्वतःसाठी योग्य आकाराची ब्रा कशी निवडावी - (How To Choose A Bra In Marathi)
बऱ्याचदा ब्रा ची स्ट्रिप ही सैल होते त्यामुळे महिलांना त्रास होतो आणि मग ती ब्रा वापरणं सोडून द्यावं लागतं. ब्रा ची स्ट्रीप सैल झाली की ती खराब होते आणि त्यामुळे वेळेच्या आधीच तुम्हाला त्याचा वापर बंद करावा लागतो. पण त्यासाठी तुम्ही ब्रा खरेदी केल्यानंतर नेहमी तिसऱ्या हुकमध्ये न घालता ब्रा चा नेहमी पहिला हुक वापरावा. त्यामुळे स्ट्रीप लवकर खराब होत नाही. असं केल्याने तुम्हाला ब्रा चा जास्त काळ वापर करता येतो.
कम्फर्टेबल आणि सेक्सी 5 ब्रा, प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या
बऱ्याचदा महिलांना आपल्या ब्रेस्टची योग्य साईजच माहिती नसते. अर्थात आपल्या छातीसाठी नक्की कोणत्या आकाराची ब्रा वापरायची याचं योग्य ज्ञान बऱ्याच महिलांना नसते. त्यामुळे आकार चुकीचा निवडला जातो आणि मग कपडे खराब होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या योग्य आकाराची ब्रा आणि अंडरगारमेंट्स निवडणं योग्य ठरेल. सर्वात महत्त्वाचे तुम्ही ब्रा जास्त काळ वापरू शकता. पण तुमच्या अंडरगारमेंट्स या तुम्ही 6 महिन्यापेक्षा जास्त न वापरणे तुमच्या हायजिनसाठी चांगले ठरते. अन्यथा इन्फेक्शनचा धोका संभवतो.
बऱ्याचदा महिला डिझाईनर ब्रा घालतात. या ब्रा सिंंथेटिक कपड्यांनी तयार करण्यात आलेल्या असतात. सिंथेटिक कपडे हे दिसायला सुंदर दिसतात पण ते जास्त काळ टिकत नाहीत. तसंच सिंथेटिक कपडा सतत वापरणं तुमच्या त्वचेसाठीही योग्य नाही. त्यामुळे तुम्ही ब्रा निवडताना कॉटनची ब्रा निवडावी. जी जास्त काळ टिकते आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शनही होत नाही.
किती तऱ्हेच्या असतात ब्रा, जाणून घ्या कोणती ब्रा कधी वापरायची (Different Types Of Bra In Marathi)
बऱ्याच महिलांना वाटतं की, अंडरगारमेंट्स रोज धुतल्याने ते लवकर खराब होतात. काही महिला ब्रा दोन वेळा घालून धुतात. पण असं करू नका. तुमचे कपडे धुतल्याने खराब होत नाहीत. ब्रा तर कधीही धुतल्याने खराब होत नाही. न धुता घातल्यास, ब्रा ची स्ट्रीप सैल होते. तसंच तुमच्या त्वचेवर इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे असं कधीही करू नका. तुम्हाला येणारा घाम टिपला जाऊन तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे रोज तुमचे इनरवेअर्स धुवायलाच हवेत.