भन्नाट मराठी जोक्स ज्यांनी तुम्हाला खूप हसवले (Funny Jokes In Marathi)

भन्नाट मराठी जोक्स ज्यांनी तुम्हाला खूप हसवले (Funny Jokes In Marathi)

आज जागतिक हास्य दिन अर्थात World Laughter Day आहे. आपण रोजच्या आयुष्यात इतके धकाधकीचे आयुष्य जगत असतो आणि इतके तणावात असतो की आपल्याला रोजच्या जगण्यात थोडं हसू गरजेचे असते.  हसल्याशिवाय दिवस म्हणजे अगदी कंटाळवाणा. पण त्यासाठी हल्ली सोशल मीडियावर अनेक भन्नाट मराठी जोक्स अर्थात मीम्सही असतात जे आपल्याला हसवतात. जागतिक हास्य दिन असल्याने आपण असेच काही मराठी विनोदी जोक्स (jokes in marathi) या लेखातून बघणार आहोत. आपल्याकडे अनेक विनोदी जोक्स (Funny Marathi Jokes) असतात.  सर्फिंग करताना आपण नेहमी मराठी विनोदी जोक्स वाचत असतो. वेगवेगळ्या विषयावर हे विनोद असतात. जे आपल्या तणावग्रस्त आयुष्यात थोडा हलकेपणा घेऊन येतात. असेच काही मजेशीर आणि भन्नाट मराठी जोक्स आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. मराठी जोक्स विनोद काहीही म्हणा याचा परिणाम आपल्या मनावर इतका चांगला होतो की किमान काही वेळासाठी का असेना आपण तणावमुक्त नक्कीच होतो. चला बघूया असेच काही भन्नाट मराठी जोक्स. 

Table of Contents

  CID वरील मराठी जोक्स (CID Jokes In Marathi)

  1.  दया -  सर हा आलोकनाथ चप्पल काढत आहे
  एसीपी - याचा अर्थ कळतोय का दया?
  दया - नाही सर
  एसीपी - याचा अर्थ आता तो टेंपल रन खेळणार आहे

  2. सनी, मला काहीतरी आंबट खावंसं वाटत आहे
  एसीपी - याचा अर्थ कळतोय का दया?
  दया - हो सर, मला कळलं.  याचा अर्थ ही आई होणार आहे
  एसीपी - नाही दया याचा अर्थ सनी बाप होणार आहे

  3. अभिजीत - दया टाकीमध्ये पाणी नाहीये
  दया - काय टाकीमध्ये पाणी नाहीये?
  अभिजीत - हो दया टाकीमध्ये पाणी नाहीये
  एसीपी - याचा अर्थ टाकी रिकामी आहे

  4. दया - अरे देवा याचा मृत्यू झालाय
  एसीपी - याचा अर्थ याचा मृत्यू झाल्याने हा मेलाय
  साळुंखे - नाही बॉस याचा मृत्यू मरण्याने नाही तर जीव गेल्याने झालाय 

  5. दया - सर बॉडीजवळ हे पेन मिळालं
  एसीपी - दया बस झालं आपलं काम, आता फक्त या गोष्टीचा शोध लावायचा आहे की,  
  मुंबईमध्ये कोण कोण पेन वापरतं

  6. राहुल माझा भाऊ होता 
  अभिजित - काय राहुल तुझा भाऊ होता?
  हो माझा भाऊ होता 
  दया - काय खरंच राहुल तुझा भाऊ होता ?
  हा सर तो माझा भाऊ होता 
  एसीपी - माय गॉड! याचा अर्थ तू राहुलची बहीण आहेस

  7. एसीपी - दया शोध लाव हा खून कोणी केलाय?
  दया - हा खून खुन्याने केला आहे 
  एसीपी - मला पहिल्यांपासूनच संशय होता की, खून खुन्याने केलाय

  8. एसीपी - ललित, माल्या, निरव कुछ समझा दया?
  दया - येस सर, एल,  एम आणि एन नंतर आता नव्या स्कॅमस्टरचं नाव ओ पासून सुरू होणार आहे

  9. जेव्हा माझे मित्र म्हणतात आजची पार्टी माझ्याकडून 
  कुछ तो गडबड है दया!

  10. अभिजीत - उद्या गुरूवार आहे
  एसीपी - याचा अर्थ कळला का दया?
  दया - नाही सर
  एसीपी - याचा अर्थ उद्या शुक्रवार नाहीये

  वाचा - बेस्ट मराठी कॉमेडियन्स

  सासू आणि सुनेवरील भन्नाट मराठी जोक्स (Sasu Sun Jokes In Marathi)

  1. सून - सासूबाई काल रात्री माझं आणि यांचं भांडण झालं?
  सासू - ठीक आहे अगं नवरा बायकोमध्ये भांडणं तर होतच असतात
  सून - ते सगळं ठीक आहे तर मग सांगा की यांचे शव नक्की कुठे नेऊ?

  2. नवी नवरी सासूच्या पाया पडते
  सासू - सुखी राहा
  सून - तुम्ही राहू देणार का ?

  3. हे बघा सासूबाई
  तुमच्या  मुलाला त्याच्या आईच्या हातचंच खायला आवडतं
  तर मग रोज आता जेवण तुम्हीच बनवा 

  4. आपली प्रशंसा आपण स्वतःच करायला हवी
  वाईट बोलण्यासाठी  तर सासू आहेच

  5. साधारण 1990 मध्ये सुना घाबरत होत्या की सासू कशी मिळेल
  2020 मध्ये सासू घाबरते सून कशी मिळणार? किमान मुलगी तरी असेल ना?

  6. भावी सासू - मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवेन की तू माझी सून  होण्याच्या लायकीची आहेस की नाही? तुझं शिक्षण किती?
  मुलगी - नेत्र नेत्र चहा 
  भावी सासू - म्हणजे काय?
  मुलगी - आयआयटी
  सासू अजून कोमातच आहे 

  7. सासू - अगं सूनबाई उठा आता, सूर्य उगवला सुद्धा
  सून - तुम्हाला तेवढंच दिसणार. सूर्य माझ्या आधी झोपायला जातो ते पण बघत जा जरा 

  8. सासू - सुनबाई हात मोकळे चांगलं नाही वाटत
  सून - मोबाईल चार्जिंगला लावला आहे आई
  सासू - अगं भवाने, बांगड्यांबद्दल बोलते आहे मी 

  9. पुणेरी सून
  सून - सासुबाई तुमचे सगळे दागिने मला द्या
  सासू - मग मी काय घालू?
  सून - तुम्ही सूर्यनमस्कार घाला
  उत्तम आरोग्य हाच खरा दागिना 

  10. सासूबाई - हे तुझ्या आईचं घर नाही नीट राहायचं
  सून - हे तुमच्या तरी आईचं घर कुठे आहे तुम्ही पण नीट राहायचं 

  गौतम बुद्धांची शिकवण आणावी आचरणात, आयुष्य होते सुखकर

  मैत्रीवरील मीम्स आणि भन्नाट मराठी जोक्स (Funny Jokes In Marathi For Friends)

  1. एक मित्र दुसऱ्या मित्राला उद्देशून
  पहिला - अरे यार माझ्या तर डोक्याला ताप झालाय. माझी बायको माझ्याकडून एका किसचा 1 रूपया घेते
  दुसरा - अरे खूपच नशीबवाना आहेस की तू, इतरांकडून तर ती 5 रूपये घेते

  2. माझा एक मित्र आहे
  तो कधी कधी इतके दर्दभरे स्टेटस टाकतो की,  
  मी पण त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करतो

  3. खरे मित्र तेच असतात जे मदत करण्यापूर्वी जगातल्या सगळ्या शिव्या ऐकवतात

  4. कृष्णाला सोळा हजार बायका होत्या
  तरीही तो आपला मित्र सुदामाला विसरला नाही
  आणि इकडे आमचे मित्र
  एक पोरगी पटली तर साधा मित्राचा फोनही उचलत नाहीत

  5. भाऊ गाडीवरून पडलोय, लवकर हे शिवाजी पार्कात
  थँक यू आणि तुलासुद्धा मैत्रीदिनाच्या शुभेच्छा
  अरे ए माकडा, मेसेज तर नीट वाच
  अरे सॉरी सॉरी आलोच 

   

  6. दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात
  पहिला मित्र - जाऊ दे यार चल आत्महत्या करू
  दुसरा - येड्या झालास का तू
  पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून सुरूवात करावी लागेल…

  7. किती सुंदर होते ते लहानपणीचे दिवस 
  दोन बोटं जोडली की दोस्तीला पुन्हा सुरूवात व्हायची 
  आता क्वार्टर पाजल्याशिवाय परत दोस्ती होतच नाही 
  माजले साले 

  8. वर्षभरात 17 मित्र बनवणे खूप सोपे आहे 
  पण 17 वर्ष एकच मित्र टिकवून ठेवणं अत्यंत कठीण आहे 

  9. अरे या टीव्हीवाल्यांना कसं काय कळतं 
  दुसरा मित्र - काय 
  पहिला - की तुम्ही बघत आहात झी मराठी 

  10. आपल्या प्रत्येकाकडे एक मित्र अथवा मैत्रीण असतेच
  ज्यांना भरभरून प्रेमाचे प्रस्ताव येत असतात 
  आणि आपल्याला प्रश्न पडतो यांच्यात असं काय आहे 

  12. एक चांगला मित्र आयुष्याचा स्वर्ग बनवतो
  म्हणूनच सांगतोय साल्यांनो
  माझी कदर करा
  नाही तर ठिकठिकाणी सांगत फिराल -
  बहती हवा सा था वो
  यार हमारा था वो
  कहा गया उसे ढूंढो...

  नवरा बायकोवर मराठी जोक्स (Husband Wife Jokes In Marathi)

  1. अरेंज मॅरेज म्हणजे
  गुपचूप भांडी घासणे
  लव्ह मॅरेज म्हणजे
  प्रेमाने भांडी घासणे
  पण भांडी घासावी लागतातच

  2. बायको - दोन किलो वाटाणे घेऊ का?
  नवरा - हो घे ना
  बायको - तुझा सल्ला नाही मागितला रे, यासाठी विचारतेय की, तू इतके सोलू शकशील की नाही, का कमी घेऊ?

  3. बायको - चहा बनवू का?
  नवरा - हा ठीक आहे
  बायको - आलं घालून का?
  नवरा - ओके
  बायको - पुदीना घालू का?
  नवरा - हा ठीक आहे
  बायको - तुळस आरोग्यासाठी चांगली असते
  नवरा - एक काम कर मोहरी आणि जिरे घालून त्याला फोडणी पण दे आता

  4. बायको - अहो माझ्याकडे तोंड करून झोपा ना मला भीती वाटते
  नवरा - हा म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल

  5. बायको - अहो ऐकलं का आपलं लग्न लावणारे भटजी वारले
  नवरा - एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळणारच होतं

  6. बायको - माझं नशीबच फुटकं म्हणून तुमच्यासारख्या मूर्ख माणसाशी माझं लग्न झालं
  नवरा - मी नक्कीच मूर्ख आहे कारण तुझ्याबरोबर लग्न करण्याचा मूर्खपणा माझ्या हातून घडला 

  7. नवरा आपल्या चिडलेल्या बायकोला रोज फोन करतो
  सासू - तुला किती वेळा सांगितलं की ती आता तुझ्या घरी येणार नाही, मग रोज का फोन करतोस?
  जावई - ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून...

  8. भारतीय पत्नी अतिशय संस्कारी असते. ती कधीच आपल्या नवऱ्याला सगळ्यांसमोर ‘अरे गाढवा’ ‘ओय गाढवा’, ‘ऐक अर्थात सुनो गधे’ असं म्हणत नाही.
  त्याऐवजी ती संक्षिप्तमध्ये ए. जी./ओ. जी./सुनोजी असं म्हणते

  9. बायको - कशी दिसते मी
  नवरा - एकदम प्रियांका चोप्रासारखी दिसतेस 
  बायको - खरंच? डॉनमधली की क्रिशमधील?
  नवरा - बर्फीवाली
  मग काय मेरी कॉम बनून नवऱ्याला धू धू धुतलाय बायकोने 

  10. सर्वात छोटा जोक 
  नवरा - मला कविता आवडतो
  बायको - मला पण विनोद आवडतो 

  11. आळशी बायको आणि समजूतदार पती 
  याचा अर्थ संध्याकाळी खिचडी 

  12. एकदा नवरा बायको खूप भांडत असतात
  थोड्या वेळाने रागात बायको नवऱ्याच्या अंगावर लुंगी आणून फेकते
  बायको - बदला लुंगी 
  नवरा - घाबरत ...हे तू मराठीत बोललीस की हिंदीत?

  13. मे महिना भारीच असतो 
  कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुष  असतो 
  तर कोणी आपलं जुनं प्रकरण परत गल्लीत माहेरी आलंय म्हणून खुष असतो

  14. सुखी संसाराचे तीन महत्त्वाचे शब्द
  हिला विचारून सांगतो 

  Mother’s Day...आईसाठी करा खास आईच्या कविता (Poem On Mother In Marathi)

  नात्यावरील मराठी जोक्स (Marathi Jokes On Relationship)

  1. मुलगा - I Love You
  मुलगी - माझ्या चप्पलची साईज माहीत आहे का तुला?
  मुलगा - अरे प्रेम नुसतं स्वीकारलं नाही तर लगेच गिफ्ट्स पण मागायला सुरूवात 

  2. BF - मला तुझे दात खूपच आवडतात
  GF - अय्या खरंच, का रे 
  BF - कारण पिवळा हा माझा सर्वात आवडता रंग आहे 

  3. मुलगी - हिप्नोटाईज करणे म्हणजे काय रे?
  मुलगा - एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात करून त्याच्याकडून हवे ते काम करवून घेणे
  मुलगी - चल याला तर बॉयफ्रेंड म्हणतात 

  4. आपले नाते सध्या सिर्फ तुम पिक्चरसारखे झाले आहे
  भेट ना गाठ ONLY Whats app वर चॅट

  5. माझा रिलेशनशिप स्टेटस
  ना कधी कोणाला धक्का लागून पुस्तकं पडली
  ना कधी कोणाच्या शर्टामध्ये ओढणी अडकली 

  6. नातं 
  हे हात आणि डोळ्यासारखे असले पाहिजे 
  हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते आणि 
  डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात 

  7. रिलेशनशिप स्टेटस
  नाही एक्सचा
  नाही नेक्स्टचा

  8. भांडण नको प्रेम करा
  आणि दोन्ही करायचं असेल 
  तर लग्न करा 

  9. ब्लॉक केल्यावर नाती कधीच संपत नाहीत
  फक्त डीपी दिसत नाहीत

  10. लग्नाच्या पत्रिकेवर दोघांचं नाव होतं
  फक्त तिचं आत होतं 
  आणि माझं बाहेर होतं 

  जागतिक हास्य दिन साजरा करा हे मराठी विनोदी चित्रपट पाहून (Marathi Comedy Movies List)

  ज्ञानदा कदम मराठी मीम्स (Dnyanda Kadam Marathi Memes)

  1. कोरोनाबद्दल काय सांगशील ज्ञानदा?
  घरात घुसून मारेन

  2. ज्ञानदाने सांगितल्यावर सगळी पोरं गमगुमान घरात बसून  आहेत
  कोरोना व्हायरस -  काय कमिटमेंट आहे बॉस!

  3. काय सांगशील ज्ञानदा?
  मोठी स्टोरी आहे सांगत बसले तर पहाट होईल

  4. काय सांगशील ज्ञानदा?
  गप गुमान घरीच बसा रे
  तू म्हणशील तसं

  5. वर्क फ्रॉम होम करतोय वेडे
  चिरतोय कांदा पटापटा
  काय सांगशील ज्ञानदा 

  6. तूच शाळा, तूच क्लास 
  तूच दारू, तूच ग्लास, 
  तूच वारा, तूच निवारा
  तूच चखण्यातला शेंगदाणा खारा
  काय सांगशील ज्ञानदा?

  7. असे कोण कोण आहेत 
  जे ज्ञानदा आल्यापासून 
  TV9 ला विसरले

  8. टीव्हीवर ज्ञानदा आहे 
  म्हणूनच तरूण जनता घरात बसून आहे
  नाहीतरी इटलीच्या आधी 
  आपलाच नंबर लागला असता 

  9. सगळेच म्हणतात वेडे
  म्हणू नको तू दादा
  काय सांगशील ज्ञानदा?

  10. मटकीला मोड नाही 
  आणि ज्ञानदाला तोड नाही