कपाळावर दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

कपाळावर दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

प्रत्येक स्त्रीला आपण आयुष्यभर चिरतरूण दिसावं असं वाटत असतं. मात्र जस जसं वय वाढू लागतं तस तसं त्वचेवर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. वाढतं वय सांगणारी सर्वात मोठी खूण म्हणजे चेहऱ्यावर वाढणाऱ्या सुरकुत्या. सुरकुत्या येण्याची सुरूवातच कपाळापासून होते. उतार वयात त्वचेमधील कोलेजीनची निर्मिती कमी कमी होत जाते  आणि त्वचा सैल पडू लागते. ज्यामुळे त्वचेवर अशा सुरकुत्या दिसू लागतात. कधी कधी कपाळावर हवेतील कोरडेपणा, हॉर्मोनल असंतुलन, ताणतणाव, व्यसनाच्या अधीन जाणं यामुळे देखील सुरकुत्या दिसू लागतात. सहाजिकच यामुळे बऱ्याचजणींना कमी वयातच उतार वयातील या खुणा दिसू लागतात. कारण काही असलं तरी तुमच्या चेहऱ्यावरच्या हावभाव, हसणं, बोलणं, दिसणं या सर्वांवरच याचा प्रभाव पडू लागतो. म्हणूनच या सुरकुत्या येणं वेळीच रोखण्यासाठी काही खास उपाय करायला हवेत. अशावेळी काही सोप्या टिप्स करून तुम्ही ही समस्या रोखून धरू शकता. यासाठी या काही सोप्या गोष्टी तुमच्या स्कीन केअर रूटीनमध्ये जरूर समाविष्ठ करा. 

Shutterstock

कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

 • जर तुम्ही चाळीशीच्या पुढील वयोगटातील असाल तर तुम्ही अॅंटि एजिंग फेशियलने यावर उपाय करू शकता. कारण या फेशियलसाठी वापण्यात येणाऱ्या अशा साहित्यामुळे तुमची त्वचा सैल पडणं रोखता येऊ शकतं. 
 • काही संशोधनानुसार व्हिटॅमिन ए चा वापर आहारात केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाईन लाईन्स मॅनेज करणं सोपं जातं. यासाठी आहारात व्हिटॅमिन ए युक्त पदार्थांचा समावेश जरूर करा. 
 • आहाराकडे पुरेसं लक्ष द्या. जर तुमच्या आहारात व्हिटॅमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असेल तर तुमच्या चेहऱ्यावर वयाआधीच येणाऱ्या एजिंगच्या खुणा दिसणार नाहीत. कारण यामुळे तुमच्या त्वचेतील कोलेजीनची निर्मितीला योग्य चालना मिळते. 
 • तरूण दिसण्यासाठी नियमित व्यायाम करा. कारण व्यायामामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण  सुधारेल आणि त्वचेला ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा होईल
 • दिवसभर भरपूर पाणी प्या. कारण पाण्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील. ओलाव्यामुळे तुमची त्वचा सैल पडणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्यादेखील येणार नाहीत. 
 • सतत अती सुर्यप्रकाशात जाणे टाळा. कारण प्रखर सुर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याममुळे तुमच्या कपाळावरील सुरकुत्या वाढण्याची शक्यता आहे.
 • जर तुम्हाला मद्यपान अथवा धुम्रपानाची सवय असेल तर ती त्वरीत सोडा. कारण अती व्यसनामुळे तुमच्या त्वचेचा मऊपणा कमी होतो आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.
 • पुरेशी झोप घ्या. ज्यामुळे तुमचा ताणतणाव कमी  होईल आणि तुमच्या त्वचेला पुरेसा आराम मिळेल.
 • दिवसभरात कमीत कमी वीस मिनीटे मेडिटेशन करा. कारण मेडिटेशनमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक ताणाला नियंत्रित करणे  सोपे जाईल. मन शांत असल्यामुळे त्याचा चांगला परिणाम शरीर आणि त्वचेवर नक्कीच दिसून येईल. 
 • नारळाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील विशेषतः कपाळावरील सुरकुत्या कमी होतील. कारण नारळाच्या तेलात भरपूर अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे त्वचापेशी रिलॅक्स होतात.
 • कोरफडाचा गर आणि अंड्याचा पांढरा भाग मिक्स करून त्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. कारण  या दोन्ही मध्ये व्हिटॅमिन ईचे घटक असतात. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. शिवाय यामुळे तुमच्या कपाळावरील सुरकुत्यादेखील कमी होतील.