चिमुकल्यांच्या हातावर काढण्यासाठी सोपी मेंदी डिझाईन

चिमुकल्यांच्या हातावर काढण्यासाठी सोपी मेंदी डिझाईन

आजकालची मुलं ही कोणत्याच बाबतीत मागे नाहीत. अगदी कपडेसुद्धा आजकाल मुलं त्यांच्या आवडीने खरेदी करतात अगदी लहानपणापासून. मग घरचं फॅमिली फंक्शन किंवा सणवार असल्यावर तर बघायलाच नको. अशा फंक्शनमध्ये किंवा सणाला मुलांचीच मजा जास्त असते. मग अशावेळी पारंपारिक ड्रेस घातल्यावर मेंदीसाठी हट्ट धरणंही साहजिक आहे. हो...मुलींप्रमाणेच मुलंही आईने काढली म्हणून मेंदीचा हट्ट धरू शकतात. मग अशावेळी क्युट मुलांच्या चिमुकल्या हातावर काढण्यासाठी खास क्युट डिझाईन्स.

स्माईली डिझाईन

Instagram

हे डिझाईन अगदी बेसिक नसलं तरी तुम्ही यामध्ये व्हेरीएशन करून सिंपल स्माईली मेंदी काढू शकता. टिपीकल मेंदी डिझाईनपेक्षा हे स्माईली डिझाईन छोट्या लेकरांना नक्कीच आवडेल आणि तुम्हालाही काढणं सोपं जाईल.

मंडालाज

Instagram

हे डिझाईन्स सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत. ही डिझाईन्स अगदी बेसिक असून काढायला सोपी आहेत. तसंही मुलं खूप वेळ एका जागी मेंदी काढायला बसणार नाहीत आणि ठेवणारही नाहीत. पण जर तुम्हाला त्यांच्या मेंदीसाठी पारंपारिक डिझाईन हवं असल्यास हे अगदी परफेक्ट आहे.

क्युट डॉट्स

Instagram

छोट्या छोट्या हातांवर छोट्या छोट्या टिंबानी साकारलेली ही मेंदी. या टिंबानीही तुम्ही छान छान डिझाईन मुलांच्या हातावर काढू शकता किंवा आमच्या लहानपणी तर आई अगदी गोळे काढून द्यायची हातावर. कारण तिला माहीत असायचं की, मी काही मेंदी जास्त वेळ हातावर ठेवणार नाही.

हार्ट डिझाईन

Instagram

एक मोठं हार्ट किंवा छोटी छोटी हार्ट्स काढूनही तुम्ही मुलांचा हातावर छान मेंदी काढू शकता. मुलांना आणि त्यांच्या फ्रेंड्सनाही हे मेंदी डिझाईन नक्कीच आवडेल.

अरेबिक फ्लोरल डिझाईन्स

Instagram

बोल्ड बॉर्डर आणि फुलांचं असं अरेबिक डिझाईनही तुम्ही मुलांच्या हातावर काढून शकता. खरंतर लहान मुलांच्या हातावर जितकं कमीतकमी डिझाईन काढाल तितकं ते छान दिसेल.

Instagram

बटरफ्लाय डिझाईन

Instagram

मेंदी डिझाईनचा सोप्यात सोपा पर्याय म्हणजे बटरफ्लाय डिझाईन. जे सोपं आणि सुंदरही दिसतं.

एनिमल्स

Instagram

छोट्या छोट्या हातांवर असं एनिमल डिझाईन काढल्यास ते मुलांनाही आकर्षक वाटतं. क्युट पांडा, मांजर किंवा फिश असं मेंदी डिझाईन तुम्ही काढू शकता.

कार्टून डिझाईन

Instagram

लहान मुलांची आवडती कार्टून कॅरेक्टर्सही तुम्ही हातावर काढल्यास मुलांना मजा वाटेल. अगदी सुपरहिरोजचं डिझाईन काढल्यास तर त्यांचा उत्साह नक्कीच वाढेल.

Instagram

आजकाल मुलींमध्ये युनिकॉर्नचीही क्रेझ आहे. त्यामुळे ते डिझाईनही तुम्ही काढू शकता.

मग पुढच्यावेळी लहानग्यांच्या हातावर काय मेंदी डिझाईन काढायचा असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडणार नाही. तसंच मेंदी काढल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्यासारखा असेल. नाही का? POPxoMarathi वर तुम्हाला अजून कोणते विषय वाचायला आवडतील आम्हाला नक्की कळवा.