11 एप्रिल 2020 चं राशीफळ, वृषभ राशीसाठी दिवस आनंदाचा

11 एप्रिल 2020 चं राशीफळ, वृषभ राशीसाठी दिवस आनंदाचा

मेष - मन अशांत असेल

आज तुमचे मन नकारात्मक विचारांनी भरलेले असणार आहे. मनात बैचनी आणि अशांतता वाढेल.जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल.


कुंभ - आज धनलाभाचा योग आहे

आज तुम्हाला  धनलाभ होण्याचा योग आहे. शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. सरकारी नियमांचे उल्लघंन करू नका. वाद विवाद करणे टाळा. 


मीन-  विद्यार्थ्यांना समस्या जाणवतील

मनाप्रमाणे निकाल न मिळाल्यामुळे विद्यार्थी निराश होतील. घरात राहून एखाद्या छंदाकडे लक्ष केंद्रित करा. आर्थिक स्थिती चांगली असेल. वाहन चालवताना सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. 


वृषभ - कुटुंबासोबत दिवस आनंदात जाईल

आज तुमचा दिवस तुमच्या कुटुंबासोबत अगदी आनंदाच जाईल. एखादी शुभ बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. काम करण्याच्या पद्धतीमध्ये नाविण्य येईल. 


मिथुन -  विद्यार्थ्यांना एखादी आनंदवार्ता मिळेल

आज विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळणार आहे. व्यवसायातील स्थिती चांगली असेल. कुटुंबात मंगल कार्य घडेल. सध्या घराबाहेर पडणे टाळा. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


कर्क -  महागडी वस्तू तुटण्याची शक्यता
आज एखादी महागडी वस्तू तुटण्याची शक्यता आहे. इतरांच्या मदतीने यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मुलांसोबत रचनात्मक कामात मन रमवा. वादविवादांपासून दूर राहा. 


सिंह - आजची सकाळ उत्साही असेल

आज सकाळपासून तुम्हाला उत्साही वाटणार आहे. प्रत्येक काम व्यवस्थित केल्यामुळे लवकरच यश मिळेल. वैयक्तिक जीवन आज सुखाचे असेल. एखाद्या कारणासाठी पैसे अडकण्याची शक्यता आहे. 


कन्या -  भावंडासोबत भांडणे होण्याची शक्यता

आज तुमचे भावंडांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. घरातील वृद्ध लोकांचा आदर करा. प्रवासाला जाणे सध्या टाळा. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यावसायिक वाढ होण्याची शक्यता आहे. 


तूळ -  व्यवसायात फायदा होईल

आज किराणा व्यवसायिकांना चांगला फायदा होणार आहे. विरोधक नमणार आहेत. मुलांसोबत घरातील रचनात्मक कामांमध्ये वेळ घालवा. जोडीदाराची साथ मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. 


वृश्चिक - आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्हाला एखादी दुखापत होण्याची शक्यता आहे. विनाकारण तर्क वितर्क लावण्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा फुकट जाईल. व्यवसायात वाढ होऊ शकते. नातेसंबंधात गोडवा येईल. घरातून बाहेर जाऊ नका. 


धनु - जोडीदारा कडून चांगली बातमी मिळेल

आज तुमच्या जोडीदाराकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. मुलांसोबत रचनात्मक कामात मन रमवा. इतरांना मदत केल्यामुळे आनंद मिळेल. एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. 


मकर - व्यवसायात दुर्लक्ष झाल्यामुळे नुकसान 

आज कामात दुर्लक्षपणामुळे व्यत्यय येण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकते. अधिकाऱ्यांच्या वागण्याचा त्रास होईल. वादविवादांपासून दूर राहा. मुलांना अभ्यासात यश मिळेल. 

हे ही वाचा -

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव