मेष - कौटुंबिक समस्या कमी आहेत
आज तुमच्या सकारात्मक विचारांमुळे घरातील समस्या कमी होणार आहेत. कौटुंबिक वातावरण उत्साही असेल. अचानक आनंदाची बातमी मिळेल. नवीन व्यवसायिक कामे मजबूत होतील.
कुंभ - मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता
आज मित्रांकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. घरात संगीत मैफिल रंगणार आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल.
मीन- डोळे आणि डोकेदुखील वाढण्याची शक्यता
आज तुम्हाला डोळे अथवा डोके दुखण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. भावंडांची मदत मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. खर्चात वाढ होणार आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.
वृषभ - विद्यार्थ्यांच्या समस्या वाढणार आहेत
आज विद्यार्थी त्यांच्या करियरबाबत चिंतीत होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी झालेला जाणवेल. कुटुंबाची भावनिक साथ मिळेल. घरातून बाहेर पडू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
मिथुन - व्यवसायात नवीन योजना आखाल
आज व्यवसायात नवीन योजना आखण्याची गरज वाटेल. प्रभावशाली व्यक्तीकडून फोनवरून संवाद साधणार आहात. आरोग्याची विशेष काळजी घ्या. सामाजिक कार्यक्रमापासून दूर राहा.
कर्क - कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील
आज तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. नकारात्मक विचारसरणीचा प्रभाव राहील. मित्रांशी फोनवरून संपर्क साधा. जोडीदाराच्या मदतीने घरात वातावरण आनंदाचे असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
सिंह - मानसिक तणाव जाणवण्याची शक्यता
आज तुम्हाला मानसिक तणाव जाणवणार आहे. स्वभावात चिडचिड होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणा करू नका. आत्मविश्वास कमी जाणवणार आहे. अध्यात्मातील आवड वाढणार आहे.
कन्या - एखाद्या खास व्यक्तीशी भेट
आज तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत प्रेमाची भावना जागृत होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी नात्यातील गोडवा वाढेल. विद्यार्थ्यांना परिक्षा रद्द करावी लागेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
तूळ - नवीन नोकरी मिळणार आहे
आज दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. इंटरनेटमुळे नवीन नोकरी मिळणार आहे. पैशांबाबत चांगली बातमी मिळेल. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
वृश्चिक - खर्च वाढण्याची शक्यता आहे
आज तुमचा विनाकारण खर्च वाढणार आहे. परिस्थितीमुळे अनेक समस्या निर्माण होतील. घरातून बाहेर पडू नका. घरातून रखडलेली कामे पूर्ण करा. अध्यात्म आणि योगातील रस वाढवा.
धनु - आईचा हेल्थ रिपोर्ट चांगला येईल
आज तुमच्या आईचा हेल्थ रिपोर्ट चांगला असेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. व्यवसायात नवीन योजना आखाल. विद्यार्थ्यांच्या समस्या वाढणार आहेत. प्रेमिकांना भेटणे अशक्य आहे. प्रवास करणे टाळा.
मकर - जवळच्या संबधात दूरावा येण्याची शक्यता
आज घरातून वादविवाद करणे टाळा. इतरांच्या टीकेपासून दूर राहा. पैशांबाबत चांगली बातमी मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. आर्थिक स्थिती मजबूत असेल.