20 एप्रिल 2020 चं राशीफळ, वृश्चिक राशीला धनलाभ होण्याची शक्यता

20 एप्रिल 2020 चं राशीफळ, वृश्चिक राशीला धनलाभ होण्याची शक्यता

मेष - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

आज  भागिदारीच्या व्यवसायातून नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बदल झाल्याने त्रास वाढेल. खर्च वाढल्याने आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. मुलांसोबत रचनात्मक कार्यात मन रमवा. 


कुंभ - आनंदाची बातमी मिळणार आहे

आज तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल आहे. आई वडिलांचा सहवास मिळणार आहे. जोडीदाराशी जवळीक वाढेल. भावनिक समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमचे कौतुक करणार आहेत. 


मीन- व्यवसायात यश मिळणार आहे

आज तुमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थितीत सुधारणा होईल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. आत्मविश्वास वाढणार आहे. कौटुंबिक ताणतणाव दूर होईल. 


वृषभ - उत्साही आणि फ्रेश वाटेल

आज तुमचे आरोग्य उत्तम असेल. दिवसभर उत्साही आणि फ्रेश वाटणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही सर्वांना प्रभावित करणार आहात. प्रवासाला जाणे सध्या टाळा. घरात राहून स्वतःची काळजी घ्या. 


मिथुन - शत्रूंपासून सावध राहा

आज मित्रांच्या रूपात शत्रू तुम्हाला भेटणार आहेत. इतरांची निंदा करणे टाळा. व्यवसायात यश मिळण्याचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. आनंदाची बातमी मिळणार आहे. 


कर्क - रखडलेले पैसे परत मिळतील

आज पैशांबाबत एखादी आनंदाची बातमी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण झाल्याने कौटुंबिक प्रतिष्ठा वाढणार आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घ्या. 


सिंह - वडिलांच्या आरोग्याची काळजी वाढेल

आज तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी वाढणार आहे. व्यवसायात समस्या येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य वाढेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. घरात राहून तुमच्या नात्यातील गोडवा वाढवा. 


कन्या - जोडीदाराच्या सहकार्याने यश मिळेल

आज तुमच्या जोडीदाराची तुम्हाला साथ मिळेल. ज्यामुळे कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. धार्मिक कार्य आणि योगातील रस वाढणार आहे. वाहन चालवताना सावध राहा. 


तूळ - कामाच्या ठिकाणी सावध राहा

आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावध राहावे लागेल. व्यवसायात जोखिम घेऊ नका. मित्रांच्या भेटीत अडचणी येतील. दिलेले पैसे परत मिळतील. घरातील वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घ्या. 


वृश्चिक - कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला वडिलांच्या कौटुंबिक संपत्तीचा वाटा मिळणार आहे. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. घराच्या सजावटीसाठी वेळ द्याल. नवीन वाहन खरेदी करण्याची योजना आखाल. आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्या. 


धनु - आज अभ्यासात समस्या जाणवतील

विद्यार्थ्यांना आज अभ्यासात समस्या जाणवणार आहेत. एखाद्या नवीन कामाला सुरूवात करणे टाळा. कामाच्या ठिकाणी वायफळ गप्पा मारणे टाळा. विरोधकांपासून सावध राहा. मुलांसोबत चांगला वेळ घालवा. प्रवासाला जाणे सध्या टाळा. 


मकर - शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवेल

आज शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवणार आहे. अधिक मेहनत घेऊनही पैसे कमीच मिळतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत रोमॅंटिक क्षण घालवता येतील. घरात वातावरण आनंदाचे असेल.