26 एप्रिल 2020 चं राशीफळ, वृषभ राशीला संपत्ती खरेदीचा योग

26 एप्रिल 2020 चं राशीफळ, वृषभ राशीला संपत्ती खरेदीचा योग


मेष - तणाव वाढू शकतो

आज कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीबाबत समस्या सुटणार आहेत. विनाकारण खर्च करणे टाळा. योग आणि अध्यात्मातील रस वाढणार आहे. वाहन चालवताना सावध राहा. 


कुंभ - मानसिक अशांतता जाणवणार आहे

आज तुमच्या कुटुंबातील भावनिक मतभेदांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक अशांतता जाणवण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत काळजी घ्या. रचनात्मक कार्यात मन रमवा. धार्मिक रस वाढणार आहे. 


मीन- विवाहातील अडचणी दूर होतील

आज तुमच्या विवाहातील अडचणी दूर होणार आहेत. नवीन व्यवसायाच्या योजना तयार कराल. जोडीदारासोबत आनंद साजरा कराल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. घरातून बाहेर जाऊ नका. 


वृषभ -संपत्ती खरेदीचा योग

आज तुम्हाला चल अथवा अचल संपत्ती खरेदीचा योग आहे. कला आणि संगीत यामध्ये वेळ जाईल. अधिकाऱ्यांची साथ मिळेल. आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घ्या.


मिथुन - व्यवसायातील कामे रखडणार आहेत

आज व्यवसायातील कामे रखडण्याची शक्यता आहे. पैसे खर्च करूनही फायदा होणार नाही. कुटुंबातील नातेसंबध मजबूत होतील. जीवनावश्यक गोष्टी खरेदी कराव्या लागतील. 


कर्क - जोडीदाराला डोकेदुखीचा त्रास होईल

आज तुमच्या जोडीदाराला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. व्यवसायात चढ उतार येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षण घेण्यासाठी जाणे सध्या टाळावे. प्रेमसंबंधांमध्ये कलह निर्माण होतील.  


सिंह - नातेसंबंध सुधारतील 

आज तुमचे बिघडलेले नातेसंबंध सुधारणार आहेत. घरातील लोकांसोबत मौजमस्तीचे वातावरण असेल. आर्थिक उन्नती होणार आहे. सध्या बाहेरगावी फिरायला जाणे टाळावे लागेल. अध्यात्म आणि योगामधील रस वाढणार आहे. 


कन्या - नोकरी मिळेल

आज विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची संधी मिळेल. व्यवसायातील योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन कामे मिळणार आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. 


तूळ - व्यवसायातील कामे रद्द होण्याची शक्यता

आज व्यवहारात तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे व्यावसायिक कामे रद्द होतील. महत्त्वाचे काम करण्याचा आळस करू नका. कुटुंबासोबत एखादा आनंद साजरा कराल. घरातून बाहेर पडू नका. आरोग्याची काळजी घ्या. 


वृश्चिक - जुन्या आजारपणातून सुटका मिळेल

आज तुम्हाला एखाद्या जुन्या आजारपणातून सुटका मिळणार आहे. नवीन कामे करण्यासाठी मन उत्साही असेल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. आर्थिक स्थिती ठिक असेल. रखडलेली कामे पूर्ण कराल.  


धनु - कौटुंबिक समस्या येण्याची शक्यता

आज तुम्हाला एखादी कौटुंबिक समस्या येण्याची शक्यता आहे. निर्णय घेणे कठीण जाणार आहे. आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव वाढणार आहे. धार्मिक कार्यात मन रमवा. 


मकर - कामाच्या ठिकाणी पदोन्नती होईल

आज चल अचल संपत्ती खरेदी करण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांशी झालेली भेट फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा.