27 एप्रिल 2020 चं राशीफळ, मिथुन राशीला धनलाभाचा योग

27 एप्रिल 2020 चं राशीफळ, मिथुन राशीला धनलाभाचा योग

मेष -नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील

आज तुमचे इंटरनेटच्या माध्यमातून नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील. घरात एखाद्या मंगल कार्याची योजना आखाल. व्यवसासात प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. 


कुंभ - कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात वाढ होईल. घराच्या सजावटीत वेळ जाईल. योगामधील रस वाढेल. वाहन चालवताना सावध राहा. हात स्वच्छ धुण्याची सवय लावा. 


मीन- मानसिक अशांतता जाणवणार आहे

आज तुम्हाला कुटुंबातील मतभेदांचा त्रास होईल. आरोग्य बिघडणार आहे. मन अशांत होणार आहे. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात मन रमवा. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. 


वृषभ - करिअरमधला तणाव वाढण्याची शक्यता

आज तुमच्या करिअरमधला तणाव वाढू शकतो. सहकाऱ्यांशी जुळवून घेणं कठीण जाणार आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. जोडीदाराशी नाते अधिक मजबूत होणार आहे. 


मिथुन - रखडलेले पैसे परत मिळतील

आज तुम्हाला रखडलेले पेैसे परत मिळणार आहेत. व्यवसायात राजकीय लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवहारातील समस्या सुटणार आहेत. कुटुंबासोबत वातावरण आनंदाचे असेल. आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घ्या.


कर्क - चांगली संधी गमवाल

आज तुमच्या दुर्लक्षपणामुळे तुम्ही चांगली संधी गमावणार आहात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्या. व्यवहार करताना सावध राहा. मुलांसोबत घरातच गाण्याच्या कार्यक्रमात व्यस्त राहाल.


सिंह - आईला पायाचे दुखणे सतावेल

आज तुमच्या आईच्या गुडघ्या अथवा पायाच्या दुखण्यात वाढ होईल. व्यवसायात बिघडलेली परिस्थिती सुधारणार आहे. व्हिडिओ कॉल अथवा फोनमधून अधिकाऱ्यांशी संवाद साधाल. घरातील वातावरण आनंदाचे असेल.


कन्या -  भावंडासोबत मतभेद होण्याची शक्यता 

आज तुमच्या भावंडांसोबत तुमचे मतभेद होऊ शकतात. वडीलांची साथ मिळणार आहे. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीसोबत फोनवर बोलणे होईल. नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. 


तूळ -  शैक्षणिक यश मिळणार आहे

आज तुम्हाला शैक्षणिक यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील. रचनात्मक कार्यात रस वाढणार आहे. घरातील सजावटीत व्यस्त राहाल.


वृश्चिक - खर्च वाढण्याची शक्यता आहे

आज तुमचा खर्च अधिक वाढणार आहे. आरेग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत घरात एखादा रोमॅंटिक चित्रपट पाहाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येण्याची शक्यता आहे. 


धनु - आरोग्य उत्तम राहील

आज तुमचे आरोग्य उत्तम असेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. उत्पन्न आणि खर्चात नियंत्रण ठेवा. राजकारणात यश मिळणार आहे. आत्मविश्वास वाढेल. घरातून बाहेर पडू नका.


मकर - जोडीदाराचा तणाव वाढण्याची शक्यता

आज एखाद्याकडून अचानक बोलण्यात आलेली गोष्ट तुमच्यासाठी चुकीची ठरणार आहे.जोडीदाराचा तणावा वाढण्याची शक्यता आहे. आईवडीलांचे सहकार्य मिळणार आहे. अध्यात्म आणि योगातील रस वाढेल. व्यवहार करताना सावध राहा.