29 एप्रिल 2020चं राशीफळ, मेष राशीला आर्थिक लाभाचे शुभ संकेत

29 एप्रिल 2020चं राशीफळ, मेष राशीला आर्थिक लाभाचे शुभ संकेत


मेष - आर्थिक लाभाचे शुभ संकेत

आज तुम्हाला आर्थिक लाभाबाबत एखादा संकेत मिळेल. घरातील वृद्ध लोकांची काळजी घ्या. सोशल मीडियावर नवीन ओळखी होतील. रचनात्मक कार्यात मन रमेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 


कुंभ - आरोग्यात सुधारणा होईल

आज तुमच्या वडीलांच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. दिवसभराची दिनचर्या सुरळीत करा. आहाराकडे लक्ष द्या. विनाकारण खर्च करणे टाळा. जोखिमेच्या कामांपासून दूर राहा. प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकते. 


मीन- कौटुंबिक तणाव कमी होईल

आज तुमचा संवादातून कौटुंबिक तणाव कमी होणार आहे. वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. व्यवहार करताना सावध राहा.


वृषभ -  आज जोडीदाराची काळजी घ्या

आज जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. मनात अनेक शंका निर्माण होऊ शकतात. एखाद्या खास व्यक्तीमुळे उत्पन्नाचे नवे साधन मिळणार आहे. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. अज्ञात लोकांपासून दूर राहा.  


मिथुन - कौटुंबिक वादविवाद दूर होतील

आज तुमच्या घरातील वादविवाद दूर होणार आहेत. कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल. राजकारणात फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. वाहन चालवताना सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. 


कर्क - आयात निर्यातीमध्ये अडचणी येतील

आज तुमच्या आयात निर्यातीच्या व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरेल. मित्रांसोबत फोनवर चर्चा कराल. जोडीदारासोबत घरातच रोमॅंटिक चित्रपट पाहाण्याचा बेत आखाल. 


सिंह - एखादी महागडी भेटवस्तू मिळेल

आज तुम्हाला एखादी महागडी भेटवस्तू मिळणार आहे. व्यवसायातील प्रोजेक्ट यशस्वी होणार आहे. यशासाठी एखाद्या खास व्यक्तीची मदत घ्यावी लागेल. कौटुंबिक समस्या वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळणार आहे. 


कन्या - आळसामुळे काम बिघडण्याची शक्यता

आज आळसामुळे तुमचे काम बिघडण्याची शक्यता आहे. दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमवाल. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. आवश्यक सामान खरेदीसाठी घराबाहेर जावे लागेल. 


तूळ - डोळ्यांच्या समस्या निर्माण होतील

आज तुम्हाला डोळे अथवा डोकेदुखी जाणवणार आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण होतील. 


वृश्चिक - बिघडलेले नातेसंबंध सुधारतील

आज एका  मित्राच्या मध्यस्तीमुळे तुमचे बिघडलेले नातेसंबंध पुन्हा सुधारणार आहेत. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून प्रेम आणि  सहकार्य मिळेल. घरातील कामांमध्ये वेळ जाणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. 


धनु - नवीन रोजगार मिळण्याची शक्यता आहे

नवीन रोजगार मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात थोड्या मेहनतीने चांगले यश मिळेल. नातेसंबंध सुधारणार आहेत. सामाजिक कार्यक्रमापासून दूर राहा. नवीन कामांच्या योजना तयार कराल. 


मकर - व्यवहारात धोका मिळण्याची शक्यता

व्यवहारात धोका मिळण्याची शक्यता आहे. जुन्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी आयुष्यभराची पुंजी लावावी लागू शकते. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.