30 एप्रिल 2020चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना धनलाभ

30 एप्रिल 2020चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना धनलाभ

मेष - प्रिय व्यक्तीकडून तणाव मिळेल

आज प्रिय व्यक्तीकडून तणाव मिळण्याची शक्यता आहे. घराबाहेर जाणे टाळा. बिघडलेले काम सुधारण्याची शक्यता आहे. व्यवसायातील स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. 


कुंभ - फायदा रखडण्याची शक्यता आहे

आज तुमच्या व्यवसायातील फायदा रखडण्याची शक्यता आहे. मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. वादविवादांपासून दूर राहा. बऱ्याच काळापासून रखडलेली एखादी योजना पूर्ण होईल. घरातील लोकांसोबत वेळ मजेत जाईल. 


मीन- आरोग्याची काळजी घ्या

आज तुमचे आरोग्य सुधारणार आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या खास कामात यश मिळेल. घरातून बाहेर पडू नका. मुलांसोबत रचनात्मक कामात मन गुंतवा. कोर्ट कचेरीपासून दूर राहा. 


वृषभ -  धनलाभ होण्याचा  योग आहे

आज तुमचा दिवस आनंदाचा असेल. दिलेले पैसे  परत मिळणार आहेत. व्यवसायात फायदा होणार आहे. मुलांकडून शुभ समाचार मिळतील. घरासाठी आवश्यक सामान खरेदी करावे लागेल.


मिथुन - मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता

आज व्यवसाय बंद असल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदाचे असेल. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहा. 


कर्क - कौटुंबिक संबंध सुधारणार आहेत

आज तुमच्या कौटुंबिक संबंधांमध्ये सुधारणा होणार आहे. घरात मुलांसोबत वेळ आनंदात जाणार आहे. दिवसभर उत्साही वाटेल. एखाद्या अडचणीमुळे व्यवसायात समस्या निर्माण होतील. अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यामुळे समस्या सुटतील. 


सिंह - एखादं काम अर्धवट राहिल

आज एखादं काम अर्धवट राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येऊ शकतील. मित्रांकडून आनंदाची बातमी मिळेल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळणार आहे. 


कन्या - उत्पन्न वाढेल

आज तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. मुलांसोबत गाण्याच्या कार्यक्रमात व्यस्त व्हाल. आर्थिक व्यवहार टाळलेच बरे राहील. 


तूळ -  व्यवसायातील मंदीमुळे निराश व्हाल

आज व्यवसायात मंद गतीमुळे तुम्ही निराश होणार आहात. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. मित्रांची साथ चांगली मिळेल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. देणी घेणी करताना सावध राहा.  


वृश्चिक - तणाव वाढण्याची शक्यता आहे

चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवल्यामुळे तुमचा तणाव वाढणाक आहे. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. 


धनु -  प्रॉपर्टीच्या वादात यश मिळेल

आज तुम्हाला प्रॉपर्टीच्या वादात यश मिळणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे. जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे.  


मकर -विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल

आज व्यवसायात तुम्हाला विशेष लाभ मिळण्याचा काळ आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. घरातून ऑफिसचे काम करावे लागेल. नियोजित कामे पूर्ण होणार आहेत. समस्या दूर होणार आहेत.