Beauty Tips : पार्लर बंद असताना चेहऱ्याची अशी घ्या काळजी

Beauty Tips : पार्लर बंद असताना चेहऱ्याची अशी घ्या काळजी

कोरोनाच्या सावटाने संपूर्ण देशात सध्या गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे सगळेजण घरात राहूनच स्वतःची काळजी घेत आहेत. मग ते आपल्यासारखे असोत वा सेलिब्रिटी असो. या काळातही सगळेच फिट राहण्यासाठी वर्कआऊटपासून ते ब्युटी टिप्सपर्यंत सर्वच फॉलो करत आहेत. POPxoMarathi च्या या लेखात आम्ही तुम्हाला क्वारंटाइनमध्ये स्वतःच्या त्वचेची काळजी कशी घेता येईल याबाबत सांगणार आहोत.

Shutterstock

लॉकडाऊनच्या काळात मॉल, थिएटर्स, कपड्यांची दुकानं ते अगदी ब्युटीपार्लरपर्यंत सर्वच बंद आहे. पण या काळात तुमच्या त्वचेच्या काळजीसाठी तुमच्या मदतीला आहेत सोपे घरगुती उपाय. जर तुम्ही या काळात चेहऱ्यासाठी योग्य घटकांची निवड केली तर तुमची त्वचा क्वारंटाइनमध्येही अगदी छान आणि तुकतुकीत दिसेल. अशावेळी तुम्हाला फक्त गरज आहे ती स्कीन केअरसाठी थोडा वेळ देण्याची.

काही दिवसांआधी बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोणनेही तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती फेस रोलरच्या मदतीने तिच्या स्किनची काळजी घेताना दिसत होती. जर तुम्हीही कोरोना व्हायरसपासून बचावासाठी स्वतःला आयसोलेट केलं असेल तर घाबरू नका. खालील गोष्टी फॉलो करा.

वाचा - वर्क फ्रॉम होम होण्यासाठी टिप्स

  • सर्वात आधी सुंदर त्वचेसाठी कोरडी आणि डेड स्किनवर रोज क्लीजिंग करा.
  • एक चांगलं एक्शन नाईट क्रीम निवडा
  • समस्याविरहीत त्वचेसाठी तुमच्या त्वचेला सूट होणार टोनर निवडा. 
  • आपल्या त्वचेला वेळोवेळी डिटॉक्स करा. 

त्वचेच्या काळजीसाठी फॉलो करा या टिप्स

Shutterstock

  • चेहरा दोन ते तीन वेळेपेक्षा जास्त धुवू नका. 

कोरड्या त्वचा असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक मॉइश्चराइजिंग फॅक्टरची निर्मिती होत नाही. त्यामुळे वारंवार चेहरा धुतल्यास तो कोरडा आणि निस्तेज दिसू शकतो. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी वारंवार चेहरा धुतल्यास जास्त तेल चेहऱ्यावर येऊ शकतं.

जर तुम्हाला घरी खूप गरम होत असेल आणि घाम येत असेल तर बर्फाचा तुकडा चेहऱ्यावर घाम कमी येईल. यामुळे तुमचा मेकअपही कोरडा होणार नाही.

Shutterstock

  • सौंदर्याच्या तीन स्टेप्स 

या काळात फेसवॉश, सनस्क्रीन आणि मॉईश्चराईजर तिन्ही स्टेप्स फॉलो करा. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार आठवड्यातून एक ते दोन वेळा एक्सफॉलिएशन करा.

  • तुम्ही घरगुती स्क्रब म्हणून बेसनाचा वापर लिंबू आणि गुलाबपाण्याचे काही थेंब त्यात मिक्स करा.
  • पहाटेच्या वेळी युव्ही प्रोटेक्टेड सनग्लासेस घालून बाल्कनीत किंवा टेरेसमध्ये बसा.
  • दिवसभर घरात असलात तरी भरपूर पाणी प्या. तुमच्या शरीराला आणि त्वचेला हायड्रेट ठेवा. शक्य असल्यास घरात असताना मेकअप करणं टाळा.