ADVERTISEMENT
home / Love
ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आहे या गोष्टींंची गरज (How To Deal With Breakup)

ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आहे या गोष्टींंची गरज (How To Deal With Breakup)

 

‘ब्रेकअप के बाद’ या गाण्याचं महत्व खऱ्या अर्थाने ब्रेकअप झाल्यानंतर सगळ्यांना कळतं. प्रेमाचं नातं तुटण्यासारखं दु:ख नसतं. पण हे दु:ख कवटाळून तरी किती दिवस राहायचं. जी व्यक्ती आयुष्यातून कायमची निघून गेली आहे. ती व्यक्ती पुन्हा येण्याची वाट पाहण्यासाठी किती दिवस झुरायचं. रब ने बना दी जोडी ही गोष्ट जरी कितीही खरी असली तरी ब्रेकअप झाल्यानंतर कदाचित हीच आपली Destiny असे म्हणत आपण त्यातून बाहेर पडणं नेहमीच चांगलं असतं. तुमचाही असाच ब्रेकअप झालाय का? तुमच्या मित्राचा मैत्रिणीचा किंवा कोणत्याही जवळच्या व्यक्तीचा ब्रेकअप झाला असेल तर त्याला त्यातून बाहेर काढणे फारच गरजेचे आहे. ब्रेकअपमधून बाहेर पडणे ही सगळ्यांसाठीच सोपी गोष्ट नसते. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे आज आपण जाणून घेऊया. करुया सुरुवात

ब्रेकअपच्या 5 पायऱ्या (Stages Of Breakup In Marathi)

ब्रेकअपमधून असे पडा बाहेर - How To Deal With Breakup In Marathi

shutterstock

ब्रेकअप झाल्यानंतर तुमच्या मनाशीच तुमचे एक द्वंद्व सुरु असते. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत असतात पण तरीही तुमच्या वागण्यातून तुमच्या बोलण्यातून तुम्ही निराश आहात हे सतत जाणवत राहते. काहीवेळा ब्रेकअपबाबतचे तुमचे स्टेटस पाहून तुमच्या मित्रमैत्रिणींना याबाबत कळतं. सर्वसाधारणपणे ब्रेकअपच्या 5 पायऱ्या असतात. या तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नियंत्रणात आणणे शक्य आहे. 

ADVERTISEMENT

सुखी वैवाहिक जीवन हवं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स (Tips For Happy Married Life)

परिस्थिती स्विकारणे (Acceptance)

हो, ब्रेकअप झाला यावर विश्वास ठेवणे अनेकांना कठीण जाते. ते या गोष्टी मानायला तयारच नसतात. पण हेच अंतिम सत्य आहे. असे समजून तुम्ही तुमच्या मनाला परिस्थिती स्विकारण्यासाठी तयार करायला हवे.(क्षुल्लक भांडणातून ब्रेकअप होणे हे हल्ली स्वाभाविक आहे. पण त्यामध्ये प्रेम शुद्ध आणि असतेच असे सांगता येत नाही. त्यामुळे तुमच्या प्रेमाची पायरी तुम्ही ओळखा) खूप काळ टिकलेले नाते अचानक तुटते त्यानंतर कोणालाही त्या व्यक्तिपासून दूर राहणे शक्य होत नाही. हे जरी खरे असले तरी नाते तुटल्यानंतर ते जोडणे आणि त्या नात्यात खूश राहणेही कठीण होऊन जाते. त्यापेक्षा आहे ती परिस्थिती स्विकारा 

उदा. रिया आणि रोहनचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. दोघांमध्ये अचानक दुरावा आला आणि तब्बल 10 वर्षांनंतर त्यांनी नातं संपवायचं ठरवलं. या 10 वर्षांमध्ये त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं पण परिस्थिती बदलली की माणसं बदलतात आणि नातीही त्यामुळे जे नातं संपत आहे आणि चांगलेपणाने संपत असेल तर संपू द्या. ही परिस्थिती मनापासून स्विकारा कारण त्यामध्ये तुम्हाला दोघांचे हित आहे. 

सत्य नाकारणे (Denial)

ब्रेकअप झाल्यानंतर एक वेळ अशीही येते की, तुम्ही सगळं स्विकारलेले असतानाही पुन्हा ती व्यक्ती आयुष्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करता. कारण तुम्ही मनापासून एखादी गोष्ट स्विकारली नाही ही हे होणे अत्यंत स्वाभाविक आहे. तुम्हालाही कदाचित हा त्रास होऊ शकेल. तुम्हाला सगळे समजावून सांगत आहेत. पण तुम्हाला ती गोष्ट अजिबात जाणून घेण्याची इच्छा नसेल. तुम्ही एखाद्या गोष्टीचा परिस्थिती विरोध करत राहता. 

ADVERTISEMENT

उदा. राकेशने गैरसमज करुन प्रियासोबतचे नाते अचानक एकाएकी संपवले. त्यानंतर चूक लक्षात आल्यानंतर त्याने प्रियाची माफी मागितली. पण प्रियाच्या मनाला ती गोष्ट इतकी लागली की, तिने आता पुन्हा माघारी न येण्याचा निर्णय घेतला. आता तुमच्या दृष्टिकोनातून ही एक छोटी चूक होती. पण कदाचित प्रियाच्या मनाला त्यामुळे मोठ्या वेदना झाल्या असतील. त्यामुळे तुम्ही सत्य नाकारण्याची चुकी अजिबात करु नका.

चिडचिड होणे (Irritation)

मनाविरुद्ध काही झाले की, आपली चीडचीड होते. पण ती तुमच्यापुरती मर्यादित असेल तर ठिक आहे काही जण त्यांच्या ब्रेकअपचा त्रास इतरांना देतात. तुमचे दु:ख इतरांसोबत वाटणे ही गोष्ट स्वाभाविक आहे. चीडचीड होणारच तुमच्या आजुबाजूला एखादी व्यक्ती आनंदी असेल तर त्याचा तुम्हाला त्रासही होणार. पण हा सतत होणारी चिडचिड तुम्हाला नैराश्याच्या गर्तेत लोटू शकते. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे फारच गरजेचे असते. 

उदा. मनिषा आणि रोहितचे ब्रेकअप होऊन आता दोन महिने झाले होते. मनिषासाठी हा काळ फार कठीण होता. रोहितकडे पुन्हा जाणे शक्य नव्हते. एकूणच हे नाते पुन्हा पूर्ववत होणे शक्य नव्हते. सतत तोच तोच विचार करुन मनिषा फारच चिडखोर झाली होती. तिला काहीही विचारल्यानंतर त्याची उत्तर ती सरळ देत नव्हती. याचा परिणाम तिच्या आजुबाजूची लोकं तुमच्यापासून दुरावू लागतात. 

तणावाखाली जाणे (Depression)

एखादी जवळची व्यक्ती सोडून गेल्यानंतर खूप जणांना हमखास होणारी गोष्ट म्हणजे तणाव.. हा तणाव तुम्हाला तुमच्यापासून दूर घेऊन जातो. तुमच्या आयुष्यातील उद्दिष्ट्य, ध्येय तुम्हाला या ताणतणावामुळे पूर्ण करता येत नाही. तुमच्यावर प्रेम करणारी इतर माणसंही जगात आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी तरी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत हे समजून तुम्ही त्यातून बाहेर पडणे फारच गरजेचे असते.

ADVERTISEMENT

उदा. रियाच्या ब्रेकअपनंतर ती फारच बिथरली. नातं अचानक तुटल्याचा धक्का दिला होता. हे झाल्यानंतर तिने स्वत:ला जगापासून अलिप्त केले. एकट्यात राहायची तिला सवय होऊ लागली. आपल्याशी कोणी बोलायला येऊ नये यासाठी ती फोनपासूनही दूर राहू लागली. लोकांपासून दूर जाण्यासाठी तिने जे प्रयत्न केले त्यामुळे ती अधिक तणावाखाली जात होती हे तिला लक्षात आले नाही. कामामध्ये तत्पर असणारी रिया आता काहीही करत नसल्याचे आश्यर्च अनेकांना वाटू लागले. पण या सगळ्याचा परीणाम तिच्या प्रगतीवर झाला हे कळण्यात फार वेळ निघून गेला. 

मनाची समजूत घालणे (Convincing The Mind)

ब्रेकअप झाल्यानंतर एक पायरी अशी येते की, तुम्ही तुमच्या मनाशीच हितगुज करत राहता. तुम्हाला रिलेशनशीप तुटणे, ब्रेकअप होणे या सगळ्यासाठी तुम्हाला तुम्हीच जबाबदार आहात असे वाटायला लागते. हा टप्पाही ब्रेकअपमध्ये येतो. काहींना याची जाणीव अगदी पहिल्यांदाच आणि पटकन होते. तर काहींना थोडा वेळ लागतो. त्यामुळे ब्रेकअपमध्ये होणारी ही गोष्ट फार साहजिक आहे. 

उदा. एकमेकांवर खूप प्रेम करुनही करण आणि रुहीला वेगळे व्हावे लागले. त्यांच्या वेगळे होण्यामागे अनेक कारणे होती.ही कारण दूर करता आली असती असे ब्रेकअपनंतर करणला सतत वाटत होते. पण रुहीचे दुखावलेले मन त्याला पुन्हा जोडणे अशक्य होते. पण तरीही हे सगळे नीट होईल या आशेने मनाची समजूत घालत राहिला. ज्याचा परीणाम रुही त्याच्या आयुष्यात पुन्हा कधीच आली नाही. कारण एकतर्फी ठरवलेल्या गोष्टी नात्यात कधीच काम करत नाहीत.

ब्रेकअपवर अशी करा मात (How To Deal With Breakup In Marathi)

ब्रेकअपवर करा अशी मात - How To Deal With Breakup In Marathi

ADVERTISEMENT

shutterstock

ब्रेकअप म्हटला की, त्रास हा होणारच! आम्ही कितीही तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला तरी हे होणे अगदी स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ तुम्ही यातून बाहेर पडू शकत नाही असे अजिबात नाही. ब्रेकअप तुमच्यामुळेच होते आणि त्यावर तुम्हालाच मात मिळवायची असते. आता या ब्रेकअपवर मात मिळवायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील त्या कोणत्या ते आधी पाहुया.

ब्रेकअपशी संबंधित असतो आजार, ब्रोकन हार्ट सिंंड्रोम

1. वेगळ्या गोष्टीत गुंतवा मन (Do Things You Love)

आयुष्यात करायला तशा भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही त्या करत नाहीत कारण तुमचा वेळ तुम्ही आधीच वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवलेला असतो. ब्रेकअप झाल्यानंतर जर तुम्हाला लवकर त्यातून बाहेर पडायचे असेल तर तुम्ही जे आधी केले नव्हते किंवा मी हे वेळ मिळाल्यावर करीने असा विचार करत होता ती गोष्ट करण्याची आता योग्य वेळ आली आहे असा विचार करुन कामाला लागा 

ADVERTISEMENT

उदा. चित्रकला, एखादा क्लास, एखादी अॅक्टिव्हिटी, काहीही जो तुमचा वेळ सत्कारणी घालवेल.

2. कुटुंबासोबत घालवा वेळ (Spend Time With Family)

एका ठराविक वयात आपण कुटुंबापासून दूर होऊ लागतो. आता दूर होणे हा सृष्टीचा नियम आहे. म्हणजे एका ठराविक वयानंतर तुमच्या आयुष्यात कुटुंबासोबत अनेक गोष्टी येऊ लागतात. रिलेशनशीप त्यामधीलच एक आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण तुम्ही तुमचा जास्त वेळ तिथे घालवता. आता तुमचा ब्रेकअप झाला असेल तर तुम्हाला तसा वेळ आहे. कुटुंबासोबत मिस केलेले क्षण घालवण्याची संधी तुम्हाला पुन्हा एकदा मिळाली आहे त्याचा उपयोग करा. 

उदा. जुने फोटो काढा, लहानपणीच्या आठवणी शेअर करा वगैरे 

3. मस्त फिरा स्वस्थ राहा (Go To Vacation And Stay Healthy)

तुम्ही चित्रपटांमध्ये अनेकदा पाहिले असेल की, जरा काही आयुष्यात जरा वेडेवाकडे झाले की, वेकेशन हा त्यावर उतारा दाखवला जातो. पण ते खरं आहे. तुम्ही बाहेर फिरल्यानंतर त्याची नशा काय असते ते तुम्हाला कळेल. एखादी छोटी टूरही तुमच्यामध्ये नवचैतन्य आणते. त्यामुळे मस्त फिरा. सोबत जायला कोण नसेल तर? अहो, मस्त एकटे फिरा सोलो ट्रॅव्हलिंग एक थ्रील आहे ते अनुभवायला शिका. 

ADVERTISEMENT

उदा. गोवा, केरळ, हिमाचल ही ठिकाण फिरण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी बेस्ट आहेत 

4. चला थोडं व्यायामाला लागा (Exercise)

तुमच्या मनाला आणि शरीराला आलेली मरगळ झटकण्याची ही आहे योग्य वेळ. इतके दिवस जर तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष दिले नसेल तर आता त्याकडे लक्ष द्या. सुंदर आणि आकर्षक दिसणे हे ब्रेकअपनंतर दिसणे फारच आवश्यक असते. इतक्या दिवसात आळशी झाला असाल तर मस्त जीमला जा. सकाळी मॉर्निंग वॉक करा. जरा छान दिसा. छान दिसणे हे कधीच वाईट नाही.

5. व्यक्त व्हा (Express Yourself)

ब्रेकअप झाला म्हणजे तुम्ही कोणता मोठा गुन्हा केला नाही. अनेक जण ब्रेकअपनंतर गायबच होतात. त्यांना वाटते की, त्यांना जग आता त्यांचा शत्रू समजणार आहे. पण असे अजिबात नाही. तुम्ही जर स्वत:ला व्यक्त करण्याचे विसरुन गेला असाल तर हीच वेळ आहे व्यक्त होण्याची त्यामुळे तुम्ही व्यक्त व्हायला शिका. 

6. तुमचे छंद जोपासा (Pursue Your Hobbies)

हा पर्याय कदाचित तुम्हाला थोडासा बालिश वाटेल पण हे अगदी खरे आहे. तुम्ही ज्या गोष्टी सोडून दिल्या होत्या त्या गोष्टी तुम्ही करण्याची ही योग्य वेळ आहे. छंद जोपासायचे असतात तुमच्या मन: शांतीसाठी. त्यामुळे तुम्ही तुमचे छंद किंवा तुम्हाला एखादी करायची होती आणि ती तुम्ही केली नसेल तर ती गोष्ट तुम्ही करा.

ADVERTISEMENT

7. सोशल मीडियापासून जा थोडे दूर (Get Away From Social Media)

सोशल मीडिया हे तुम्हाला लोकांपासून जितके जवळ आणते तिकतेच ते तुम्हाला दूर नेऊ शकते तुम्हाला कदाचित काही गोष्टींची होणारी चर्चा आणि तुमचे मन कदाचित दुखवू शकते. त्यामुळे तुम्ही किमान काही दिवस सोशल मीडियापासून थोडे दूर राहा. याचा फायदा तुम्हाला नक्की होईल.

8. तुम्ही आहात तसे राहा (Be Yourself)

ब्रेकअप झाला तो कोणामुळे झाला? कशामुळे झाला? यावर लोकं उलटं सुलटं चर्चा करणे स्वाभाविक आहे. पण तुम्ही स्वत:ला ओळखता. तुम्हाला माहीत आहे तुम्ही कसे आहात. लोकं तुम्हाला काय बोलतील या भीतीने तुम्ही कधीही स्वत:ला बदलू नका.

नातं समजून घ्यायला वर्ष लागतात आणि तोडायला फक्त दोन मिनिटं

9. तुमच्या इतर समस्या सोडवण्याचा करा प्रयत्न (Try To Solve Other Issues)

रिलेशनशीप सोडून तुमच्या आयुष्यात दुसऱ्या कोणत्याही समस्या नसतील असे अजिबात होणार नाही. जर काही कारणास्तव तुमच्या या काही गोष्टींकडे तुमचे दुर्लक्ष झाले असेल तर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्या. तुमच्या आयुष्यातील इतर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

ADVERTISEMENT

10. तुमच्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या (Focus On Your Best Qualities)

एखाद्या व्यक्तीचे सतत ब्रेकअप होत असतात. सतत ब्रेकअप होणे म्हणजे तुम्ही वाईट आहात असे होत नाही. तुमच्यामध्ये काही चांगल्या क्वालिटी नक्कीच असतील. त्याचा विचार करा.

तुम्हाला पडलेत का प्रश्न) (FAQ)

तुम्हालाही पडलेत का प्रश्न - How To Deal With Breakup In Marathi

shutterstock

 

ब्रेकअपनंतर नेमके कसे वाटते? 
ब्रेकअप कोणत्या कारणामुळे झाले आहे यावर तुम्हाला काय वाटणार हे अवलंबून आहे. सगळं काही चांगलं असताना अचानक जोडीदाराने सोडून जाणे हे वेदना देणारे असते. तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला सोडायचे आहे. पण ती गोष्ट तुमच्याकडून खूप प्रयत्नांती ज्यावेळी होते. त्यावेळी असा ब्रेकअप आनंद देणारा असतो. त्यामुळे ब्रेकअपच्या भावना या प्रत्येकावर अवलंबून असतात. तुम्हाला नात्यापासून सुटका हवी असेल तर तो हा क्षण आनंदाचा असतो.

ADVERTISEMENT

ब्रेकअप झाल्यानंतरही पुन्हा रिलेशनशीप चांगले होऊ शकते का?
कदाचित, कारण अनेकदा फारच टुकार कारणावरुन जोडपी ब्रेकअप करतात आणि पुन्हा एकत्र येतात. अगदी रागात झालेली भांडणही निस्तरतात. पण हे नाते पूर्ववत होणे दोघांवरही अवलंबून असते. केवळ तुम्हाला एकट्याला वाटते म्हणून तुमचे रिलेशनशीप चांगले होऊ शकते, असे नाही. एकत्र येण्याची भावना दोघांमध्ये असायला हवी तरच या तुम्ही पुन्हा नात्यात एकत्र येऊ शकता. 

जोडीदाराच्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे ?
ब्रेकअप झाला म्हणजे आयुष्य संपले असे होत नाही. तुम्हाला आलेला प्रत्येक दिवस घालवायचा आहे. या दु:खात तुमचे आयुष्य घालवण्यापेक्षा तुम्ही काहीतरी नवीन करा. आयुष्यात काहीतरी वेगळा विचार करा. जर तुम्ही या आठवणींमध्ये स्वत:चा वेळ घालवत असाल तर तुम्ही तुमचे आयुष्य वाया घालवत आहात हा विचार करुन तुम्ही आताच तुमच्या भावनांना आवरणे फार गरजेचे आहे. 

आता ब्रेकअपनंतर या काही गोष्टी लक्षात ठेवाल तर तुम्हाला त्रास होणार नाही आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल.

You Might Also Like

ADVERTISEMENT

How to forget someone in english

Royal Attitude Status In Marathi

 

20 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT