फेशियल शेव्हिंग करायचं असेल तर जाणून घ्या योग्य पद्धत

फेशियल शेव्हिंग करायचं असेल तर जाणून घ्या योग्य पद्धत

फेशियल शेव्हिंगसाठी तसं  तर काही खास सामानाची गरज भासत नाही. शिवाय जे  सामान वापरायचे आहे ते जास्त महागही नसतं. बऱ्याचदा पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसतो. अशावेळी जर तुम्ही घरच्या घरी फेशियल क्रिम आणि रेजरच्या मदतीने शेव्हिंग केलं तर तुमच्या चेहऱ्यावरून केस काढणं जास्त सोपं होतं. पण घरच्या घरी शेव्हिंग करायला तुम्हाला भीती वाटत असेल अथवा त्याची योग्य पद्धत माहिती नसेल तर तुम्हाला आम्ही त्याबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला सतत पार्लरमध्ये जायचं नसेल आणि सहजरित्या तुम्हाला चेहऱ्यावरील केस काढायचे असतील तर तुुम्ही अशा सोप्या पद्धतीने फेशियल शेव्हिंग करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स व्यवस्थित फॉलो करायला लागतील. नक्की काय आहे त्या स्टेप्स आपण पाहूया. 

#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय

फेशियल शेव्हिंग करण्याची सोपी पद्धत

Shutterstock

फेशियल शेव्हिंग करण्यासाठी काही सोप्या पद्धती पाळा म्हणजे  तुम्हाला कोणत्याही तऱ्हेचा त्रास होणार नाही. आपण जाणून घेऊया या काही स्टेप्स 

स्टेप 1 - शेव्ह करण्यापूर्वी चेहरा धुवा 

फेशियल शेव्हिंग करण्यापूर्वी आपला चेहरा अगदी स्वच्छ धुवा.  जेणेकरून चेहऱ्यावरील घाण आणि साचलेला मळ अथवा मेकअप पूर्ण निघून जाईल. जेव्हा चेहरा अगदी स्वच्छ होईल तेव्हा तुम्ही शेव्हिंग केलंत तर जळजळ आणि इन्फेक्शन होणार नाही. 

स्टेप 2 - डेड स्किन घालवण्यासाठी एक्सफोलिएट करा 

शेव्हिंग करण्यापूर्वी तुम्ही तुमची त्वचा एक्सफोलिएट करून घ्या. असे केल्यामुळे चेहऱ्यावरील केस अथवा त्वचेवर असणारी मृत त्वचा अर्थात डेड स्किन बाहेर पडते. चेहऱ्यावर स्क्रब अथवा एक्सफोलिएटिंग ग्लव्ह्ज लाऊन तुम्ही डेड स्किन काढून टाका.  असेल केल्याने तुम्हाला शेव्हिंग करताना त्रास होत नाही. 

स्टेप 3 - त्वचा करा हायड्रेट 

चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यापूर्वी तुम्ही चेहरा गरम पाण्याने भिजवून घ्या अथवा गरम पाण्यात कॉटनचा कपडा घालून साधारण तीन मिनिट्सपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर हा कपडा ठेऊन द्या. फेशियल शेव्हिंग करण्यापूर्वी चेहरा हायड्रेट करणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे हेअर फॉलिकल्स मुलायम होतात आणि शेव्हिंग करण्यासाठी त्रास होत  नाही. 

स्टेप 4 - चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी चेहऱ्यावर शेव्हिंग जेल लावा

जेल लावल्यानंतर चेहऱ्यावरील मऊपणा कायम राहातो आणि त्वचेवर रेझर चालवणं सोपं होतं. तसंच शेव्हिंग क्रिम लावल्यानंतर याचा फायदा असा होतो की, तुम्ही कोणत्या भागावर शेव्हिंग करत आहात हे तुम्हाला व्यवस्थित कळत राहाते.  ज्या ठिकाणी शेव्हिंग करून झालं आहे तिथे पुन्हा रेझर वापरावं लागत नाही. 

स्टेप 5 - शार्प रेझरचा करा वापर 

आपल्या चेहऱ्यावर शेव्ह करण्यासाठी एखाद्या नाजूक रेझरचा वापर न करता आपल्या शरीरासाठी जो रेझर तुम्ही वापरता तोच शार्प रेझर तुम्ही वापरा. रेझरमध्ये वापरण्यात आलेले ब्लेड जुने नाही ना याची नीट खात्री करून घ्या. डल ब्लेडने शेव्हिंग केल्यास केस निघून जात नाही आणि त्वचेवर डाग पडण्याचाही धोका असतो. 

स्टेप 6 - रेझर हलकेसे दाबा 

फेशियल हेअर शेव्ह करत असताना तुम्ही रेझर ब्लेड साधारण 45 डिग्री अंशात ठेवा आणि शेव्ह करताना हलकेसे दाबा. हलकेसे दाबून रेझर केल्याने केस काढताना जळजळ होत नाही. 

स्टेप 7 - शेव्हिंग केल्यानंतर करा त्वचेला मॉईस्चराईज 

चेहऱ्यावरील केस काढून टाकल्यानंतर अर्थात शेव्हिंग केल्यानंतर मॉईस्चराईजर अथवा लोशन अथवा तेल लावणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा कोणतेही उत्पादन तुम्ही वापरत असाल त्यात कोणतेही हानिकारक रसायन नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.  तसंच शेव्हिंगनंतर तुम्ही फेशियल क्रिम लावण्याची अथवा मेकअप करण्याची घाई करू नका. त्वचेला श्वास घेऊ द्या.

नारळाच्या तेलानेही करता येतं Shave, कसं ते जाणून घ्या
 

महत्त्वाच्या टिप्स

  • प्रत्येक वेळी फेशियल शेव्हिंग करताना नवे रेझर आणि ब्लेडच वापरा. जुन्या  ब्लेडचा वापर करू नका 
  • वेळोवेळी रेझर बदलत राहा
  • केसांची वाढ ज्या दिशेने होत आहे त्यानुसारच शेव्हिंग करा 
  • मुलींसाठी शेव्हिंग क्रिम वेगळे  मिळते. त्याच क्रिमचा वापर करा

घरात शेव्हिंग करायचे असेल तर तुम्ही या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा आता सतत पार्लरच्या फेऱ्या मारणं बंद करा आणि करा घरच्या घरी शेव्हिंग. 

लॉकडाऊनमुळे शेव्हिंग करण्याची आली वेळ, मग वाचाच