घरच्या घरी बनवा वजन नियंत्रणात ठेवणारे Yummy चॉकलेट स्प्रेड

घरच्या घरी बनवा वजन नियंत्रणात ठेवणारे Yummy चॉकलेट स्प्रेड

काही जणांना चॉकलेटचे क्रेव्हिंग काहीही केले तरी आवरता येत नाही. शरीरासाठी चॉकलेटच सेवन करणे चांगले असले तरी देखील आपण अनेकदा त्याचा अतिरेक करतो. मग काय शरीरातील फॅट वाढण्याचे काम हे चॉकलेट करते. पण तुम्हाला चॉकलेट खाणे अगदीच सोडायचे नसेल आणि चॉकलेट खाऊन वजनही नियंत्रणात ठेवायचे असेल. तर तुम्ही वजन नियंत्रणात ठेवणारे चॉकलेट स्प्रेड घरीच बनवायला हवे. तुमच्या रोजच्या ब्रेडला अगदी एक चमचा हे चॉकलेट स्प्रेड लावून तुम्ही अगदी बिनधास्त याचे सेवन करु शकता. आता बघूया नेमकं हे हेल्दी चॉकलेट स्प्रेड नेमकं कसं बनवायचं

हेजल नट्सचे फायदे वाचून आजच विकत घ्याल हा महागडा सुकामेवा

चॉकलेट स्प्रेडसाठी लागणारे साहित्य

shutterstock

साहित्य: 

2 कप हेजलनट्स (बाजारात सहज उपलब्ध होतात), 1 चमचा व्हॅनिला इसेन्स, ¼ कप कोको पावडर, 2 चमचे बिनवासाचे तेल, ½ कप दूध आवश्यक असल्यास, गोडासाठी मॅपल सिरप किंवा साखर 

कृती : 

  • 2 कप हेजलनट्स घेऊन ते छानर रोस्ट करुन घ्या. तुम्हाला ओव्हनमध्ये करायचे असेल तर तुम्ही ओव्हनमध्येही ते करु शकता. 
  • रोस्ट केलेले हेजलनट्स थंड करुन त्याची साल काढून घ्या. असे करताना काही साली राहिल्या तरी चालतील. 
  • आता तुमच्या मिक्सीमध्ये हे सगळे हेजलनट्स घेऊन ते छान वाटून घ्या. ड्रायफ्रुटमध्ये तेल असल्यामुळे त्याला नक्कीच तेल सुटेल. 
  • त्यामध्ये कोको पावडर, व्हॅनिला इसेन्स, दूध आणि साखर( शुगर फ्री) घालून पुन्हा एकदा वाटून घ्या. 
  • आता तुमचे चॉकलेट स्प्रेड तयार आहे. आता जर तुम्हाला बाजारातील चॉकलेट स्प्रेड प्रमाणे ते चकचकीत वाटत नसेल तर तुम्ही त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घाला. 
  • छान मिक्स करु घ्या.
  • तुमचे Yummy चॉकलेट स्प्रेड तयार 

ओल्या काजूपासून बनवा या मस्त 5 रेसिपी नक्की करुन पाहा

असे खा तुमचे आवडते चॉकलेट स्प्रेड

आता  अनेकंना हे चॉकलेट स्प्रेड असेच खायला आवडते. खूप जण याचे असेच सेवन करतात. पण तुम्हाला याचे योग्य सेवन करायचे असेल तर ब्राऊन ब्रेड किंवा मल्टी ग्रेन ब्रेड गरम करा किंवा टोस्ट करा. त्यावर एक चमचा हे स्प्रेड पसरा. अशा पद्धतीने तुम्ही हे चॉकलेट स्प्रेड खाल्ले तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल. कारण अशा पद्धतीने तुमचे पोट लवकर भरते आणि तुम्हाला सतत ते खाण्याची इच्छा होत नाही. 

मी घरी बनवल्या बाजारापेक्षाही चांगल्या पाणीपुरीच्या पुऱ्या, जाणून घ्या कशा

आरोग्यासाठी असे आहे फायदेशीर

shutterstock

आता जर तुम्हाला असे वाटत असेल की, हे चॉकलेट स्प्रेड हेल्दी कसे? तर यामध्ये असलेले हेजलनट्स या पदार्थाला पौष्टिक करण्याचे काम करते. शिवाय चॉकलेट खाण्याचेही अनेक फायदे आहेत. बटरच्या तुलनेत चॉकलेट स्प्रेड हे नक्कीच हेल्दी असते. त्यामुळे लहान मुलांनी चॉकलेटचा हट्ट केल्यानंतर त्यांना हे स्प्रेड नक्की खायला द्या. 


मग तुमच्याकडे या स्प्रेडसाठी लागणारे साहित्य उपलब्ध झाले की, लगेच तयार करा हे yummy चॉकलेट स्प्रेड