ADVERTISEMENT
home / Recipes
गुळाचा चहा करण्यासाठी वापरा युक्ती, खराब होणार नाही दूध

गुळाचा चहा करण्यासाठी वापरा युक्ती, खराब होणार नाही दूध

 

चहाची आवड असलेल्या लोकांना नुसत्या चहाच्या सुंगधानेदेखील अगदी तरतरीत वाटतं. सहाजिकच या अमृत तुल्य पेयाचे चाहते जगभरात आहेत. फिटनेसचा विचार केल्यास साखरेचा चहा पिण्यावर अनेक मर्यादा येतात. शिवाय मधुमेहींना साखरेचा चहा वर्ज्य असतो. त्यामुळे बऱ्याचदा बिनसाखरेचा चहा घेतला जातो. साखरेचा चहा नको असेल तर काही प्रमाणात गुळाचा चहा घेण्यास काहीच हरकत नाही. कारण गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषकमुल्यं असतात. शिवाय गूळ हा उष्ण पदार्थ असल्यामुळे त्यामुळे आजारपण, इनफेक्शन दूर राहणं सोपं जातं. गुळाचा चहा पिण्यामुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते. गुळामुळे अशक्तपणा अथवा अॅनिमियाचा त्रास कमी होऊ शकतो. पूर्वीपासून भारतीय परंपरेत घराबाहेरून आलेल्या व्यक्तीला गूळ – पाणी देण्याची पद्धत होती. कारण गुळ अथवा गुळाचं पाणी, गुळाचा चहा घेतल्यामुळे लगेच फ्रेश वाटतं. शिवाय गूळ खाणं पोटासाठीदेखील चांगलं असतं. कारण त्यामुळे तुमची पचनसंस्था सुरळीत होते. श्वसनाच्या त्रासावर उपाय करण्यासाठी अथवा घशाचं खवखवणं बरं करण्यासाठी गुळाचा चहा पिणं फायदेशीर ठरतं. गुळामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. गुळाचा चहा घेतल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते. यासाठीच दिवसातून एक ते दोन वेळा गुळाचा चहा घेण्यास काहीच हरकत नाही. गूळ उष्ण असल्यामुळे गुळाचा चहा थंडीपेक्षा उन्हाळ्यात कमी प्रमाणात घ्यावा. मात्र कोणत्याही ऋतूमध्ये साखरेपेक्षा गुळाचा चहा पिणंच नेहमी फायदेशीर ठरू शकतो. शिवाय या चहाची चवही अतिशय सुंदर असते.

गुळाचा चहा कितीही फक्कड असला तरी हा चहा करणं मात्र वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. पहिल्यांदाच गुळाचा चहा करणार असाल तर तुम्हाला तो करण्याची योग्य पद्धत माहीत असायलाच हवी. नाहीतर तुमची चांगलीच फजिती होऊ शकते. यासाठीच जाणून घ्या चहासाठी गुळाचा वापर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.

Shutterstock

गुळाचा चहा करण्याची सोपी पद्धत

 

गुळाचा चहा पहिल्यांदाच करणार असाल तर या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्या. 

ADVERTISEMENT

साहित्य –

चहाचे भांडे, दूध, चहापावडर, गूळ अथवा गुळाची पावडर, वेलची अथवा वेलची पावडर, गवती चहाची पात, किसलेले आले, पाणी ( तुळशीची पानं, लवंग, काळीमिरी आवडीनूसार)

गुळाचा चहा तयार करण्याची कृती –

सर्वात आधी चहाच्या भांड्यात एक कप चहासाठी अर्धा कप पाणी उकळत ठेवा. पाण्याला आंदण आल्यावर त्यात किसलेलं आलं, अर्धा चमचा चहापावडर, वेलची पावडर, गवती चहा आणि आवडीचे चहाचे मसाले टाका. चहा चांगला उकळल्यावर त्यात आधी अर्धा कप दूध घाला. दुधाला चांगली उकळी आली की सर्वात शेवटी चहा कपात ओतून घेण्यापूर्वी चहात गूळ पावडर अथवा किसलेला गूळ घाला. त्यानंतर गूळ विरघळला की चहा कपात ओतून घ्या. 

ADVERTISEMENT

सूचना – जर तुम्ही दूध उकळण्याआधी चहामध्ये गूळ अथवा गूळाची पावडर टाकली तर तुमचा चहा खराब होतो. कारण गुळामुळे दूध फाटतं आणि चहाची चव बिघडते. यासाठीच गुळाचा चहा करताना नेहमी याबाबत सावध असणं गरजेचं आहे. चहात दूध टाकून ते पूर्णपणे उकळल्यावरच चहाच गूळ अथवा गुळाची पावडर टाकावी. जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर तुम्ही चहा कपात ओतल्यावर तुमच्या आवडीप्रमाणे गूळ पावडर चहात टाकू शकता. ज्यामुळे घरातील प्रत्येकाला त्यांच्या आवडीप्रमाणे चहा जास्त अथवा कमी गोडीचा करता येऊ शकतो. 

त्याचप्रमाणे जर तुम्ही जर बिनदुधाचा चहा करणार असाल तर मग तुम्ही चहा उकळतानाच त्यामध्ये गूळ टाकू शकता. 

shutterstock

 

01 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT