जगभरात होणाऱ्या लाखोंच्या मृत्यूमागील एक कारण आहे तंबाखूचं वाढतं सेवन. या निमित्ताने 31 मे ला जगभरात दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश आहे तंबाखू सेवनाचा प्रसार रोखणं आणि त्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधणं. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या सदस्य देशांनी 1987 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला. गेल्या काही वर्षात जगभरात सरकारी, सार्वजनिक आरोग्य संघटना आणि धूम्रपानाचा निषेध करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा केला जातो. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि याबाबतीले अनेक कार्यक्रम या दिवसाच्या निमित्ताने आयोजित करून लोकांमध्ये जनजागृती केली जाते. दरवर्षी या दिवसाची एक थीमही ठरवली जाते. या लेखात आपण तंबाखू सेवनाचे शरीरावरील दुष्परिणाम आणि त्यापासून कसं मुक्त होता येईल याबाबत माहिती घेणार आहोत.
तंबाखूमध्ये अनेक प्रकारची केमिकल असतात. जसं निकोटीन, टार आणि कार्बन मोनोऑक्साइड जी हानीकारक असतात. तंबाखूचा फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर जास्त प्रमाणात परिणाम होतो. चला जाणून घेऊया शरीरावर होणारे तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम.
तंबाखूमधील निकोटीन महाधमनीला कडक बनवून टाकते. महाधमनी ही मोठी धमनी असते जी आपल्या पूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा करत असते. धुम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांना सर्वात जास्त नुकसान होते. त्यामुळे तंबाखूचा उपयोग करणाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यांना खोकल्यासोबतच कफची समस्याही होते. तंबाखूचा फुफ्फुसांवर सर्वात वाईट परिणाम म्हणजे वातस्फिती (फुफ्फुसांचा आजार) आणि फुफ्फुसांचा कॅन्सर आहे.
तंबाखूच्या सेवनाचं व्यसन लागतं आणि ते आवडूही लागतं. या व्यसनामुळे कधी खूप उत्सुकता, मूडी, नर्व्हसनेस आणि उदासही वाटू शकतं. नियमित तंबाखू सेवन करत असल्यास डोकेदुखी आणि चक्कर येण्यासारख्या समस्याही जाणवू शकतात. एका रिसर्चनुसार ब्रेन मेटाबॉलिटीज आणि निकोटीनवर अवलंबून राहणं यामध्ये गंभीर सबंध आहे.
तंबाखूमध्ये आढळणारं कार्बन मोनोऑक्साइड आणि निकोटीन हे तुमच्या तोंडासाठी अनेक प्रकारे नुकसानदायक ठरू शकते. तंबाखूच्या सेवनाने दातांवर डाग पडणे, तोंडाला दुर्गंधी येणे, दात पिवळे पडणे असे दुष्परिणाम होतात. याशिवाय तंबाखूचा वारंवार उपयोग केल्याने गळा, तोंड आणि एसोफंगल कॅन्सर होण्याचा धोकाही जास्त असतो.
तंबाखूच्या सेवनाने हृदयावरही वाईट परिणाम होतो. यामधील केमिकल्स हे तुमच्या हृदयाचे ठोके वाढवतात आणि पूर्ण शरीरातील रक्तवाहिन्या घट्ट करून हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढवतात. याशिवाय खराब रक्तभिसरणामुळेही अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात.
तंबाखू उत्पादनांचा उपयोग कोणत्याही परिस्थितीत शरीरावर नकारात्मक परिणामच करतो. हे त्वचेवर परिणाम करून सुरकुत्यांसाठी कारणीभूत ठरतात. कोरडी आणि पिवळी त्वचा तंबाखू खाणाऱ्यांमध्ये दिसून येते. याशिवाय तंबाखूयुक्त उत्पादनांनी तुमच्या त्वचेला एक प्रकारची दुर्गंधीही येते.
तंबाखूच्या सेवनाने तुमचे केस पातळ आणि नाजूक होतात. तुमच्या केसांच्या निर्मितीवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. काहीवेळा जास्त प्रमाणात तंबाखूचं सेवन केल्यास केस गळून टक्कलही पडू शकते.
नियमित रूपाने तंबाखूचं सेवन केल्यास तुमच्या मांसपेशींवर परिणाम होऊन रक्तपुरवठा आणि ऑक्सीजनच्या प्रवाहावर परिणाम होऊ लागतो. परिणामी, व्यायाम, खेळणं किंवा शारीरिक हालचालींमध्ये सामील झाल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो.
तंबाखूच्या वापराने आणि विशेषतः धुम्रपानामुळे संपूर्ण पचनतंत्र खराब आणि उच्च एसिडचं उत्पादनास उत्तेजना मिळते. यामुळे अल्पकाळ आणि दीर्घकाळाचा हार्टबर्न होऊ शकतं. सर्वात खराब परिस्थितीत धुम्रपानमुळे कॅन्सर आणि पेप्टिक अल्सर होण्याचा धोकाही वाढतो.
धुम्रपानातील तंबाखू हे तुमच्या मानसिक आरोग्यावर अनेक प्रकारे दुष्परिणाम करू शकतात. यामुळे तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतं. तोंडाला चव नसते आणि शरीराचं तापमान कमी होतं. खासकरून हात आणि पायाला ही तापमानाची समस्या जाणवते.
धूम्रपान हाही अन्य अंमली पदार्थांसारखाच एक नशा आहे. पण दृढ निश्चय केल्यास तुम्ही धूम्रपानाची सवय नेहमीसाठी सोडू शकता. धूम्रपान थांबवण्यासाठी काही सोपे उपाय आणि टिप्स.
तंबाखू असलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन टाळणं किंवा व्यसन सोडणं हे तुमच्यासाठी कधीही आरोग्यदायकच आहे. जाणून घ्या तंबाखू सोडण्याचे फायदे.
तंबाखूचे आरोग्यासाठी असणारे घातक परिणाम माहीत असूनही लोकं याचं सेवन करतात. तर काही लोकांच्या मनात आजही उत्सुकता आढळते. तंबाखूबाबत विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं.
1. तंबाखूपासून बनवलेल्या उत्पादनांचं व्यसन का लागतं?
निकोटीन हे अंमली पदार्थप्रमाणे आहे. कॅफीनसारखं असलं तरी जास्त परिणामकारक आहे आणि याचमुळे लोकांना याचं व्यसन लागतं.
2. निकोटीन आणि तंबाखूमध्ये काय फरक आहे?
निकोटीन हे घातक रसायन तंबाखूमध्ये आढळतं. हे तुम्हाला व्यसनाधीन करतं आणि तुम्हाला धूम्रपान किंवा तंबाखू खाण्याची सवय लागते. निकोटीन हा तंबाखूमधील सर्वात घातक घटक आहे.
3. हुक्का पिणंसुद्धा घातक आहे?
जर तुम्ही फक्त फ्लेवर्ड हुक्का पित असाल तर तो पूर्णतः घातक नाही. पण जर त्यात तुम्ही तंबाखू किंवा मद्य टाकल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे.
आम्हाला आशा आहे की, POPxoMarathi ची ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल आणि यातून उपयुक्त माहितीही मिळाली असेल. ही पोस्ट आवडल्यास लाईक करा आणि सोशल मीडियावर शेअरही करा.
हेही वाचा -
धरणीमातेचा उत्सव जागतिक वसुंधरा दिन