चेहऱ्याचा व्यायाम जो आणेल तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट

चेहऱ्याचा व्यायाम जो आणेल तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. चांगले स्कीन रुटीन फॉलो करतो. झोप पूर्ण करतो आणि बरेच काही. पण असे काही व्यायामप्रकार आहेत जे तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणू शकतात. आहे त्या जागी बसून दिवसातून एकदा तुम्ही हा व्यायाम करु शकता. हा व्यायाम करायला फार वेळ जात नाही. पण तुम्हाला इच्छित असलेला ग्लो यामुळे इन्स्टंट मिळू शकतो. चला तर आज जाणून घेऊया चेहऱ्यावर ग्लो आणणारा हा इन्टंट व्यायामप्रकार कोणता आहे ते

डबलचीन घालवण्यासाठी व्यायाम नाही तर वापरा या ट्रिक्स

व्यायाम प्रकार 1

shutterstock

व्यायामासाठी शांत जागा निवडा. पहिला व्यायामप्रकार हा तुमच्या डोळ्याखील असलेल्या काळ्या वर्तुळांसाठी आहे. स्तब्ध बसून उजव्या हाताने डाव्या भुवईला वर उचला. दोन बोटांनी डोळ्यांच्या खाली हात फिरवा. डोळ्यांच्या आतल्या बाजूने सुरु करत ही बोट भुवईपर्यंत येऊ द्या. डोळ्यांखाली हात फिरवताना खूप जोरात आणि डोळा दुखेल असे काहीही करु नका. अगदी हलक्या हाताने असे दोन्ही बाजूला  5 वेळा करा. 

फायदा: अनेकदा आपला चेहरा टवटवीत वाटत नाही याचे कारण असतात. डोळे. तुमचे डोळे थकलेले तर त्यावर हा व्यायाम अगदी इन्स्टंट काम करतो. तुमच्या डोळ्यांखालील थकवा दूर करतो.

चेहरा कायम चमकदार राहण्यासाठी करा 'योग्य' व्यायाम

व्यायामप्रकार 2

दोन्ही हातांची मूठ करुन गालांवर ठेवा.क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज तुम्हाला गालावर हात फिरवायचा आहे. आता तुम्हाला असे किमान दहा वेळा करायचे आहे. असे करताना तुम्हाला तुमच्या चीकबोनला थोडासा ताण द्यायचा आहे. असे केल्यामुळे तुमच्या गालाच्या नसा मोकळ्या होतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि तुमच्या त्वचेवर ग्लो दिसू लागतो. शिवाय तुमच्या त्वचेवर असलेल्या सुरकुत्याही त्यामुळे कमी होतात. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हा व्यायाम करु शकता. (हा व्यायाम करताना तुम्ही तुमचे हात स्वच्छ ठेवा)

 फायदा: चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. गालावर ग्लो येतो.त्वचेची इलास्टिसिटी वाढते

व्यायामप्रकार 3

shutterstock

तिसरा व्यायामप्रकार करण्यासाठी तुम्हाला दोन्ही हात तुमच्या चेहऱ्यावर फिरवायचे आहे. असे करताना तुम्हाला कानाच्या बाजूला आल्यानंतर तुम्ही चेहरा असाच ताणून ठेवायचा आहे. असे करताना तुम्हाला असे करताना तुमच्या हनुवटीचा भागही ताणला जाईल.   जर तुम्हाला एकाचवेळी चेहऱ्यावरुन हात फिरवणे शक्य नसेल तर तुम्ही थोडा थोडा भाग हाताने ताणा. असे करताना तुमची त्वचा ताणली जाते. तुमच्या त्वचेला आलेला सैलपणा यामुळे कमी होते. तुमची त्वचा अधिक चांगली दिसू लागते. आपसुकच त्यामुळे तुमच्या त्वचेला ग्लो येतो.  

फायदा: सैल झालेली त्वचा पूर्ववत होण्यात मदत होते. तुमच्या संपूर्ण त्वचेला ग्लो येतो.

घरी बसून मांड्या झाल्या असतील जाड तर फक्त 5 मिनिटं करा हा व्यायाम

व्यायामप्रकार 4

आता बोटांनी तुम्हाला थोडा हनुवटीचा व्यायाम करायचा आहे. दोन्ही हातांनी हनुवटी पकडून बोटाने कानाच्या दिशेला हनुवटी दाबत दाबत तुम्हाला कानापर्यंत जायचे आहे. असे तुम्हाला दोन्ही बाजूला करायचे आहे. असे केल्यामुळे तुमच्या हनुवटीला चांगला आकार मिळतो. त्यामुळे तुम्ही अगदी दोन ते तीन मिनिटं हा व्यायाम करा तुम्हाला तुमच्यामध्ये झालेलया फरक नक्की जाणवेल. 

फायदा: डबलचीन कमी करण्यात मदत करते.

व्यायामप्रकार 5

संपूर्ण चेहऱ्याचा व्यायाम करायचा आहे म्हटल्यावर तुम्हाला तुमच्या कपाळाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या कपाळावरही व्यायाम करायला हवा. हातांची बोटं तुम्हाला कपाळावर टॅब करायची आहे. फेशिअल करताना तुम्ही असे अनेकदा करताना पाहिले असेल. जर तुम्हाला त्यापेक्षा थोडा जास्त स्ट्रेच करायचे असेल तर तुम्ही दोन्ही हातांनी कपाळावर बोट फिरवा. 

फायदा: कपाळावर आलेल्या बारीक बारीक सुरकुत्या या व्यायामप्रकारामुळे कमी होण्यास मदत मिळते.


आता तुम्हाला जर त्वचेवर ग्लो हवा असेल तर तुम्ही हे व्यायाम नक्कीच ट्राय करायला हवे.