हे 'लव्ह फूड्स' बनवतील तुमचे सेक्स लाईफ अधिक स्पाईसी

हे 'लव्ह फूड्स' बनवतील तुमचे सेक्स लाईफ अधिक स्पाईसी

आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांबाबत अर्थात फूड्सबाबत ऐकले असेल. चायनीज फूड,  मुघलाई पदार्थ, इटालिया,थाई फूड, महाराष्ट्रीयन, पंजाबी असे एक ना अनेक फूड्स तुम्ही वाचलेही असतील आणि बनवलेही असतील आणि खाल्लेही असतील. पण लव्ह फूड्स म्हणजे नक्की काय कधी ऐकलं नसेल. हे काही वेगळं नाहीये. हे लव्ह फूड्स म्हणजे आम्ही तुम्हाला देणार आहोत काही खास लव्ह रेसिपी, लव्ह ड्रिंक्स ज्याने तुम्ही तुमची सेक्स लाईफ अधिक स्पाईसी करू शकता. आपण नेहमीच कामात व्यस्त असतो आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम होतो तो सेक्स लाईफवर. त्यामुळे हा थोडा वेगळा फंडा करून बघायला नक्कीच काही हरकत नसावी. यामध्ये वेगळेपणा आणल्याने तुमच्या सेक्स लाईफमध्ये पुन्हा एकदा एक वेगळा स्पाईस येईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या  अधिक जवळ याल अथवा तुमचा जोडीदार सध्या कामाने त्रस्त असेल तर तुम्ही नक्कीच या गोष्टी अर्थात हे लव्ह फूड्स करून त्यांना आपल्या जवळ करू शकता. आता लव्ह फूड्स म्हणजे नक्की काय? तर या पदार्थांनी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे रोमँटिक फिलिंग्ज पुन्हा एकदा जागवण्यास मदत मिळते. बघूया कोणते आहेत असे पदार्थ. 

लव्ह रेसिपीज

आपण यामध्ये असे काही पदार्थ जाणून घेणार आहोत जे लव्ह फूड्स आहेत आणि जे तुम्हाला तुमचं सेक्स लाईफ अधिक स्पाईसी करण्यास नक्कीच मदत करेल. 

खीर

Shutterstock

दूध आणि सुक्या मेव्याने बनलेला हा गोड पदार्थ मूड हलका करायला फायदेशीर ठरतो. तसंच यामध्ये असलेल्या सुक्या मेव्यामध्ये एफ्रिडिसियक (प्रेमाची वासना) नैसर्गिक दुधासह मिळून आपल्या आतील असणाऱ्या रोमँटिक भावना जागवण्यास मदत करतो. 

शिरा

रव्याचा अथवा बेसनाचा शिरा यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून केल्यास तुमचे लव्ह हार्मोन्स रिलीज करण्यास याची मदत मिळते. तसंच तुमच्या शरीरातील रोमँटिक भावना यामुळे वाढीला लागते. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या जोडीदाराची रात्री साथ हवी असेल तर तुम्ही नक्कीच या पदार्थाचा जेवणात वापर करू शकता.

ऑयस्टर ड्रमस्टिक कढी

ड्रमस्टिक अर्थात शेवग्याच्या शेंगा.यामध्ये  तुमच्या शरीरातील लव्ह हार्मोन्स वाढवण्याची ताकद असते आणि ऑयस्टरसह हे एकत्र केल्यास, याची ही ताकद दुप्पट होते. त्यामुळे तुमच्या शरीरातील सेक्सच्या भावना वाढीला लागतात. 

असे 11 इशारे ज्यामुळे समजतं की, जोडीदाराला करायचं आहे सेक्स

चॉकलेट

Shutterstock

चॉकलेट हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक माणसाचा मूड बदलतो. चॉकलेटमुळे माणूस अधिक ताजातवाना होतो. त्यामुळे याला ‘मूड चेंजिंग फूड’ असंही म्हटलं जातं. म्हणूनच बऱ्याचदा सेक्स करतानाही चॉकलेटचा वापर केला जातो. तुम्हालाही तुमच्या जोडीदाराकडून रात्री अधिक स्पाईसी फिलिंग हवं असेल तर तुम्ही तुमच्या सेक्समध्ये चॉकलेटचा वापर नक्की करा.

स्ट्रॉबेरी विथ चॉकलेट

Shutterstock

स्ट्रॉबेरीमुळे शरीरातील उत्तेजना वाढते.  स्ट्रॉबेरीसह चॉकलेट हे कॉम्बिनेशन नेहमीच रोमँंटिक मानलं जातं.  यामुळे तुमचा कितीही तणावाचा मूड असेल तर तो निघून जातो. स्ट्रॉबेरी ही उत्तेजनात्मक असल्यानेच नेहमी शँपेनसह सर्व्ह करण्यात येते. त्यामुळे तुम्हाला जर तुमची रात्र अधिक आठवणीत ठेवण्यासारखी करायची असेल तर तुम्ही या कॉम्बिनेशचा विचार नक्कीच करू शकता. 

लव्ह फ्रूट्स

लव्ह फूड्स मध्ये तुम्ही फ्रूट्सचाही समावेश करू शकता. अशी काही फळं आहेत जी तुम्हाला सेक्स लाईफमध्ये मदत करतात. 

शेड्युल सेक्स माहीत आहे का, याचे आहेत असे फायदे

स्ट्रॉबेरी

Shutterstock

यामध्ये विटामिन सी चा समावेश असतो जे अँटिऑक्सिडंट्सचे काम करते. हे अँटि ऑक्सिडंट्स शरीरातील मांसपेशी आणि टिशूसाठी उपयुक्त ठरते. 

केळे

Shutterstock

केळ्यामध्ये पोटॅशियम आणि विटामिन बी चा समावेश असतो. जे तुमचे सेक्शुअल हार्मोन्स वाढवण्यास मदत करतात. केळ्याचा उपयोग सेक्स पॉवर वाढवण्यासाठीदेखील केला जातो. 

‘या’ नुकसानांपासून वाचायचं असेल तर करा प्राचीन नियमानुसार सेक्स

पपई

Shutterstock

यामध्ये अशा प्रकारचे केमिकल असतात जे फिमेल हार्मोनच्या प्रॉडक्शनसाठी फायदेशीर ठरतात आणि मदत करतात आणि त्याचप्रमाणे हे हार्मोन्स रोमँटिक फिलिंग्ज वाढवण्यासाठीही फायदेशीर ठरतात. 

अव्हॅकॅडो

Shutterstock

याच्या आकारावरूनही याला लव्ह फूड असे म्हटले जाते. यामध्ये असणारे विटामिन ई आणि बी 6 हे रोमँटिक भावना आणि एनर्जी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे सेक्स लाईफमध्ये अधिक आनंद मिळवायचा असेल तर या फळाचा आहारात समावेश केला जातो. 

सेक्स करताना सर्वात पहिले फिलिंग जाणवतं ते स्तनांना

डाळिंब

Shutterstock

याला फर्टिलिटीचे प्रतीक मानण्यात येते. याचा प्रयोग कस्टर्ड आणि शेकसह करण्यात येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात लोह असते जे पुरूषांच्या हार्मोन्ससाठी अनिवार्य आहे.  

लव्ह व्हेजिटेबल्स (भाज्या)

Shutterstock

हे वाचून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल. पण हो भाज्यांमुळेही तुमच्या सेक्स लाईफला चांगली गती मिळू शकते. यामध्ये रताळ्याचा समावेश आहे. यामध्ये पोटॅशियम असते जे महिलांना रोमँटिक भावना वाढण्यासाठी कारणीभूत ठरते. याची मदत होते. त्याचप्रमाणे हे खाताना जास्त मीठाचा वापर करू नये.  कारण मीठ हे पोटॅशियमचा परिणाम कमी करते. 

सुका मेवा

सुका मेवादेखील तुमची सेक्स लाईफ अधिक स्पाईसी बनविण्यास मदत करतो. यामध्ये आपण नक्की काय खायला हवे बघूया 

सेक्स करण्याचे नक्की फायदे काय

अक्रोड

अक्रोडमध्ये आर्जिनन असते. हे एक प्रकारचे अमिनो अॅसिड आहे,  जे पुरूषांच्या हार्मोन्सच्या प्रॉडक्शनमध्ये मदत करते. याचा प्रयोग केक, शेक इत्यादीमध्ये केला जाऊ शकतो.  

बदाम

Shutterstock

यामध्ये लोह, मँगनीज आणि विटामिन्स या तिन्ही गोष्टी असतात ज्या सेक्स लाईफसाठी फायदेशीर ठरतात. तसंच आपल्या रोमँटिक भावना अधिक वाढण्यास याची मदत होते. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा