महाभारताचं युद्ध संपताच जळून खाक झाला होता अर्जुनाचा रथ

महाभारताचं युद्ध संपताच जळून खाक झाला होता अर्जुनाचा रथ

महाभारताच्या युद्धाबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. हे असं युद्ध होतं ज्यामध्ये एक भाऊ आपल्या भावासमोर युद्धासाठी उभा ठाकला होता. धर्म आणि अधर्म यांपैकी एकाचं श्रेष्ठत्व ठरवण्यासाठी हे युद्ध झालं होतं. या युद्धादरम्यान अनेक घटना झाल्या ज्या अनेकांच्या लक्षातही आल्या नाहीत. त्यापैकी असलेली घटना म्हणजे अर्जुनाच्या रथाबाबतची. आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की, महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाची कमान स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी सांभाळली होती. महाभारताच्या युद्धात पांडवांचा तर विजय झाला पण श्रीकृष्ण ज्या रथाचे सारथी होते. त्या रथाचं पुढे नेमकं काय झालं?

श्रीकृष्णासोबतच रथावर हनुमानाची उपस्थिती

महाभारतामध्ये जेव्हा कौरव आणि पांडव एकमेकांच्या विरूद्ध उभे होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला रामभक्त हनुमानाला आवाहन करण्यास सांगितले होते. असं केल्यामुळे अर्जुनाने हनुमानाला रथाच्या पताकेसोबत विराजमान केलं. श्रीकृष्ण जे रथ चालवत होते ते स्वतः विष्णूदेवाचे अवतार होते आणि याचमुळे शेषनाग जमिनीखाली या रथाच्या चाकांना सांभाळत होता. ज्यामुळे कठोर वार होऊनही अर्जुनाचा रथ डगमगत नसे. अर्जुन आणि धर्माच्या युद्धात सत्याची साथ देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सर्वतोपर उपाय केले होते.

Instagram

युद्ध संपताच अर्जुनाच्या रथाला लागली आग

महाभारताचं युद्ध समाप्त होताच अर्जुनाने सर्वात आधी श्रीकृष्णाला रथातून उतरायची प्रार्थना केली. पण श्रीकृ्ष्णाने अर्जुनाला आधी खाली उतरण्याचा आदेश दिला. अर्जुन रथातून खाली उतरला आणि भगवान कृष्णही खाली उतरले. त्यासोबतच शेषनाग पुन्हा एकदा पाताळलोकात गेले आणि हनुमानही अदृश्य झाले. श्रीकृष्ण आणि अर्जुन रथापासून काही पाऊलं लांब जाताच रथ आगीत होरपळताना नजरेस पडला आणि जळू लागला.

अर्जुनाने श्रीकृष्णास विचारले याचे कारण

आपल्या रथाला जळताना पाहून अर्जुनाने श्रीकृष्णास यामागील कारण विचारले असता, भगवान श्रीकृष्णाने सांगितले की, हा रथ तर आधीच जळला होता. पण या रथाच्या पताकेवर हनुमान आणमि माझी उपस्थिती असल्यामुळे हा रथ आपल्या संकल्पापर्यंत आपली साथ देत राहिला. महाभारताच्या समाप्तीन तुझे काम पूर्ण झाले आणि यामुळे हा रथ मी सोडला. ज्यामुळे तो आता भस्म झाला.

कशी वाटली ही महाभारतातील आख्यायिका? तुम्हाला अजून अशा आख्यायिका वाचायला आवडतील का, आम्हाला जरूर सांगा.