कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Maharashtra Day Wishes In Marathi)

कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Maharashtra Day Wishes In Marathi)

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या जयघोषातच दरवर्षी महाराष्ट्रात १ मे या दिवसाची सुरूवात होते. संपूर्ण महाराष्ट्रात १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. त्याचप्रमाणे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीसाठीदेखील ओळखला जातो. महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठीच जाणून घेऊया महाराष्ट्राचा इतिहास आणि यंदा हा  दिवस साजरा करण्यासाठी काही प्रेरणादायी महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश.

Table of Contents

  महाराष्ट्राचा इतिहास (History Of Maharashtra Day In Marathi)

  भारताच्या स्वातंत्र्यानंतर विविध भाषांप्रमाणे अनेक प्रांताची निर्मिती केली . 1960 सालापर्यंत महाराष्ट्र राज्य हे सर्व भाषिकांचे राज्य होते. मात्र काळाची गरज ओळखत मराठी भाषिकांसाठी राज्यात स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी वाढू लागली. यासोबतच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र या मागणीनेदेखील जोर धरला. महाराष्ट्राला  स्वतंत्र राज्य करण्याची प्रक्रिया सुरू असताना मुंबई महाराष्ट्राला देण्याच्या मागणीला मात्र प्रचंड विरोध झाला. महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठी माणसे ही मुंबईत राहणारी होती. मराठी माणसांपासून मुंबई हिसकावली जात आहे हे पाहून जनमाणसांमध्ये प्रक्षोभ वाढत गेला. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी याबाबत सरकारचा विरोध करण्यासाठी आंदोलकांनी मुंबईच्या फ्लोरा फाऊंटनसमोर भव्य मोर्चा काढला. आंदोलकांनी मुंबईसह सयुंक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत हा परिसर अक्षरशः दुमदुमवून टाकला होता. मात्र सरकारकडून आंदोलकांवर यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्जने परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश दिले. या गोळीबारात 106 आंदोलकांना आपले जीव गमवावे लागले होते. पुढे या बलिदानापुढे नमतं घेत सरकारने १ मे रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. आजही या हुताम्यांचे स्मरण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

  मराठी भाषा दिन स्टेटस (Marathi Bhasha Din Status In Marathi)

  Shutterstock

  महाराष्ट्र दिन विशेष आणि महत्त्व (Importance of Maharashtra Day In Marathi)

  १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. शिवाय त्यानुसार महाराष्ट्राची त्या काळातील भौगोलिक परिस्थितीनुसार निरनिराळ्या जिल्हांमध्ये विभागणी करण्यात आली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असे विभाग मिळून महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले. मराठी भाषिकांचे स्वंतत्र राज्य निर्माण करण्यासाठी करण्यात आलेल्या या लढ्यामुळे या दिवसाला मराठी भाषिकांच्या मनात एक अनन्य साधारण महत्त्व आहे. हा इतिहास आजही संपूर्ण महाराष्ट्राला रोमांचित करणारा आहे. ज्यामुळे या दिनानिमित्त अनेक पोवाडे आणि गाणी रचण्यात आली. आज या गाण्यांचे बोल महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसांला प्रेरित करणारे आहेत. महाराष्ट्र दिन मेसेज पाठवण्यासाठी तुम्ही या गाण्यांचा नक्कीच वापर करू शकता. 

  महाराष्ट्र दिन शुभेच्छा (Maharashtra Day Wishes In Marathi)

  महाराष्ट्र दिन साजरा करण्याठी आपण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवतो यासाठी हे महाराष्ट्र दिवस शुभेच्छा तुमच्या नक्कीच फायद्याचे आहेत. 

  • जय जय महाराष्ट्र माझा... गर्जा महाराष्ट्र माझा...महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी... मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
  • प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा ! महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा
  • मंगल देशा... पवित्र देशा... महाराष्ट्र देशा...प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • गर्जा महाराष्ट्र माझा.... जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा
  • राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा.... महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
  • कपाळी केशरी टिळा लावितो... महाराष्ट्र देशा तुला वंदितो.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा... जय जय महाराष्ट्र माझा... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • ज्ञानाच्या देशा ,प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा... महाराष्ट्र  दिनाच्या शुभेच्छा  
  • महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व मराठी बांधवाना मनपूर्वक शुभेच्छा 

  कामगार दिनाच्या शुभेच्छा (International Labour Day Wishes)

  १ मे हा दिवस आंतरराष्टीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. यासाठी कामगार दिनासाठी शुभेच्छा संदेश 

  • सर्व कष्टकरी, श्रमिकांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • एकजुटीने काम करू कामावरती प्रेम करू कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • काम करा हो काम करा कामावरती प्रेम करा.... कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • कष्टाची भाकर मिळते कामातून, काम करा आणि मोठे व्हा... महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • दिवस हक्काचा... दिवस कामगारांचा... कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • कामगार कल्याणाचे राखू धोरण, करू या महाराष्ट्राचे निर्माण ... कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • काम असे करा की लोकांना म्हणायला हवं काम करावं तर यानेच... कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट... कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • सर्व कामगार बंधू आणि भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  महाराष्ट्र दिवस कोट्स (Maharashtra Day Quotes In Marathi)

  महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा इतिहास मराठी माणून कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच हेे संदेश मनात महाराष्ट्रीन असल्याचा अभिमान निर्माण करतात. 

  • महाराष्ट्र दिनाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवा हे महाराष्ट्र दिन संदेश
  • भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा... जय जय महाराष्ट्र देशा 
  • बहु असोत सुंदर संपन्न की महा...प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • शिव निष्ठा येथ असे सतत जागती...अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती... मराराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
   अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
   सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
   दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा  
  • पैठणचे प्रेम अमित देश कोकणा... पंढरीस ये विदर्भ देवदर्शना... अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र... माझ्या राजाचा महाराष्ट्र...महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी... गुणगुणलो जे गीत गीत मराठी.... मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या दार्दिक शुभेच्छा 
  • लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

  महाराष्ट्र दिन मेसेज (Maharashtra Day Messages in Marathi)

  महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वजण आपल्या परिचयातील लोकांना मेसेज पाठवतात. त्यासाठी हे महाराष्ट्र दिन मेजेस नक्कीच उपयुक्त आहेत.

  • महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा, पवित्र माती लावू कपाळी धरणी मातेच्या चरणी माथा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • आम्हाला  अभिमान आहे महाराष्ट्रीयन असण्याचा, आम्हाला  गर्व आहे मराठी भाषेचा... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • मराठा तितुका  मेळवावा... महाराष्ट्र अखंड राखावा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • मराठी माणसाने मनात मनात जपला आहे महाराष्ट्र माझा… जय महाराष्ट्र 
  • महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा
  • माझे राज्य… मराठी माणसाचे राज्य….जय महाराष्ट्र 
  • महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद… महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी सांडलं रक्त, त्याच मातीतून निर्माण झालेले मराठी भाषेचे सारे भक्त
  • माझा महाराष्ट्र आणि मी महाराष्ट्राचा, मला आहे अभिमान मी मराठी असण्याचा 
  • जन्मोजन्मी होईन महाराष्ट्रीन, हे मातृभूमी तुझा मी सदैव मान राखीन  

  सोशल मीडिया स्टेटससाठी महाराष्ट्र दिन संदेश (Maharashtra Day Status In Marathi)

  सध्या सोशल मीडियाचा ट्रेंड आहे तेव्हा सोशल मीडियावर स्टेटस अपडेटसाठी हे शुभेच्छा संदेश नक्कीच खास आहेत. 

  • महाराष्ट्र चिरायू होवो... महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • मनोमनी वसला शिवाजी राजा, माझा माझा आहे महाराष्ट्र माझा
  • दगड झालो तर सह्याद्रीचा होईन माती झालो कर महाराष्ट्राची होईन...तलवार झालो तर भवानी मातेची होईन आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • महाराष्ट्र ही एक चाल आहे जी सर्वांनी मिळून गुणगुणावी.... जय महाराष्ट्र…
  • जय महाराष्ट्र जय मराठी.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य असे महान... या राज्याचे आम्ही नित्य गातो गुणगाण
  • महाराष्ट्राची गावी स्तुती दररोज पोटभरून...महाराष्ट्राने ठेवलं आहे आपल्या सर्वांना धरून
  • कृतज्ञता राष्ट्राची, कृतज्ञता इथल्या मातीची.... माझ्या महाराष्ट्राची... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • अनंत संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र, टाकावा ओवाळून जीव असा माझा महाराष्ट्र 
  • माझ्या राष्ट्राच्या मातीला सुंगध आहे मराठी माणसांचा, नेहमीच अग्रेसर राहील महाराष्ट्र माझा