गायक मिका सिंग आणि चाहत खन्नाचं ‘क्वारंटाइन लव्ह’

गायक मिका सिंग आणि चाहत खन्नाचं ‘क्वारंटाइन लव्ह’

एकीकडे देशभरात लॉकडाऊन सुरू असताना काही जणांचं या क्वारंटाइनमध्येही प्रेम फुलतंय की काय, अशी चर्चा आहे. आता ही जोडी खरंच प्रेमात पडली आहे की नाही हे कंफर्म नसलं तरी त्यांच्या पोस्टमध्ये तरी 'क्वारंटाइन लव्ह' दिसतंय. तुम्हालाही वाटलं ना जे आम्हाला वाटतंय ते. मग पुढे वाचा नक्की काय आहे क्वारंटाइन लव्ह प्रकरण.

मिका आणि चाहतचं सुरू आहे का डेटिंग?

एक आहे प्रसिद्ध गायक आणि एक आहे टीव्ही अभिनेत्री. दोघंही शेजारी राहतात आणि क्वारंटाइनमुळे वेळच वेळ आहे. मग काय त्यांनी ठरवलं की, चला मिळून एक म्युझिक अल्बम काढूया आणि त्याला नाव देऊया 'क्वारंटाइन लव्ह'. या दोघांच्या फोटोजवरून तरी असं वाटतंय की, हे फक्त अल्बमपुरते नाही तर खरंच प्रेमात आहेत की काय? 

Instagram

हे सो कॉल्ड क्वारंटाइन लव्ह कपल आहे मिका सिंग आणि चाहत खन्ना. या दोघांची पुढील कहाणी सांगण्याआधी चाहत खन्नाच्या वादग्रस्त लग्नाबद्दल जाणून घेऊया. ही अभिनेत्री सध्या नवरा फरहान मिर्झापासून वेगळी राहत आहे. चाहत आणि फरहानचं लग्न 2013 साली झालं होतं. त्यांना दोन मुली जोहर आणि अमायरा आहेत. पण दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर चाहत आणि तिचा नवरा वेगळे झाले आणि तिने सिंगल मदर म्हणून प्रवास सुरू केला. पण आता जे फोटो व्हायरल झालेत त्यावरून तरी चाहत पुन्हा प्रेमात पडल्यासारखं वाटत आहे.

क्वारंटाइन लव्हबाबत

गायक मिका सिंग आणि त्याची शेजारी असलेली अभिनेत्री चाहत खन्ना हे एका प्रोजेक्ट काम करत आहेत. ज्याचं नाव आहे क्वारंटाइन लव्ह. या प्रोजेक्टला दोघांनीही लॉकडाऊनमध्येच सुरूवात केली. हा एक म्युझिक अल्बम आहे. ज्याला मिकाने आवाज दिला आहे. याबाबत एका मुलाखतीत चाहतने सांगितलं की, मिका आणि मी खूप वेळापासून एकत्र काम करण्याबाबत विचार करत होतो पण आम्हाला चांगला प्रोजेक्ट मिळत नव्हता आणि आम्हाला या प्रोजेक्टचं सुचलं. या प्रोजेक्टसाठी आम्ही दोन गाणी शूट केली आहेत. गाणी शूट करताना आम्ही सर्व खबरदारी घेतली. पण शूट करताना आम्ही खूप एन्जॉय केलं आणि लोकांनाही आमचा हा प्रोजेक्ट नक्कीच आवडेल. या आठवड्यातच ही गाणी रिलीज करण्यात येणार आहेत.

मिका आणि चाहत दोघांनी अगदी सारखेच काळ्या रंगाचे टीशर्ट्स घातले आहेत. तिने पोस्ट केलेल्या फोटोत लिहीलं आहे की, चला कोणाचं तरी क्वारंटाइन होऊया. आम्हाला आनंद आहे लॉकडाऊनमध्ये एकमेकांना भेटलो #quarantinelove @mikasingh. यासोबत तिने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. चाहत या आधी प्रस्थानम चित्रपटात दिसली होती. ज्यात तिच्या अपोझिट अली फजल आणि संजय दत्त होते.

Instagram

मिकानेसुद्धा चाहत आणि त्याचा फोटो इन्स्टास्टोरीवर शेअर करत त्याला क्वारंटाइन लव्ह नाव दिलं.

चाहतचं आधीच लग्न खूपच वादग्रस्त ठरलं. तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आता तिच्यापासून विभक्त झालेल्या नवऱ्याने तिच्यावर प्रोस्टीट्यूशनचा आरोप केला होता. तिने सांगितल की, त्याने फक्त एवढाच आरोप केला असं नाहीतर मला आर्थिक आणि मानसिक छळालाही सामोरं जावं लागलं. घरातल्या अशा वातावरणामुळे मला वेड लागण्याची पाळी आली होती. तो माझ्या मालिकांच्या सेट्सवर अचानक यायचा आणि तिकडे माझ्या गळाभेट किंवा हात मिळवण्याच्या सीन वेळी उगाच नाटक करायचा. असो चाहतचं आधीच लग्न जरी यशस्वी ठरलं नसलं तरी तिला आता मिकामध्ये प्रेम मिळालं असेल तर चांगलंच आहे. तिचं पुढचं आयुष्य सुखकर जावो.

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.