आई होणे ही भावनाच प्रत्येक महिलेला सुखद करणारी असते. पण हल्लीचे वातावरण, कामाची पद्धत या सगळ्याचा परीणाम महिलांच्या गर्भाशयावरही झाला आहे. ताणतणावामुळे गर्भधारणा करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महागड्या ट्रिटमेंट्स, औषधोपचार करावे लागतात. वय वाढल्यानंर या अडचणी अधिक येतात. पण योग्यवेळी जर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आई होताना फार कमी अडचणी येतात. तुम्हालाही आई व्हायचयं ? तर मग तुम्हाला गर्भधारणेचा योग्य काळ म्हणेच Ovulation चा काळ माहीत हवा. या विषयीच आपण आज माहिती घेणार आहोत. करुया सुरुवात.
आता सगळ्यात आधी तुम्हाला या शब्दाने गोंधळात पडायला झाले असेल तर हा शब्द सोप्या भाषेत तुम्हाला समजवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. प्रत्येक स्त्रीला मासिक पाळी येते. ही मासिक पाळी म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयात बाळ तयार होण्याकरीता लागणारी मऊ गादी. मासिक पाळी दरम्यान स्त्रीच्या शरीरात असणारे बिजांड गर्भाशयात येऊन पडतं. हे बिजांड महिलेच्या शरीरात येण्याचा काळ हा मासिक पाळीपासून चौदा दिवसानंतरचा असते. महिलेच्या शरीरात हे बिजांड दोन ते तीन दिवसांपर्यंत जिवंत राहते. या काळात स्त्री- पुरुषाचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले तर पुुरुषांच्या वीर्यामधील शुक्राणू आणि बिजांड्याचे मिलन होऊ शकते आणि गर्भ राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे स्त्री- पुरुष संबंधांसाठी हा काळ फार महत्वाचा मानला जातो. ज्यांना मुलं हवे असेल आणि त्यांना मुलं राहण्यास अडचण होत असेल तर अशावेळी मासिक पाळीनंतर शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हा जो काळ असतो. त्यामुळे गर्भधारणेच्या दृष्टिकोनातून हा काळ फारच महत्वाचा आहे.
आता Ovulation काय हे आम्ही तुम्हाला सांगितले आहे. मासिक पाळीनंतर असलेले याचे चक्रही तुम्हाला समजावून सांगितले. आता महिलांनी त्यांच्या शरीराकडे अधिक लक्ष दिले तर त्यांना या काळात काही खास लक्षणे आल्याची जाणवतील. ही लक्षणे कोणती ती आता पाहूया.
जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही प्रेग्नंट असू शकता
ओव्हयुलेशनच्या काळात जाणवणाे पहिले लक्षण म्हणजे शरीराचे तापमान. जर तुम्ही तुमच्या शरीराच्या तापमानाच्या नोंदी केल्या तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल ती अशी की, तुमच्या शरीराचे तापमान कधीकधी रोजच्या तापमानापेक्षा कमी होते. तर कधी जास्त होते. शरीरातील एस्ट्रोजनचे प्रमाण वाढले तर तुमचे तापमान कमी होते आणि प्रोस्टोजनचे प्रमाण वाढले की, तुमच्या शरीराचे तापमान वाढते. शरीराचे कमी जास्त तापमान तुम्हाला या काळात नक्कीच जाणवेल.
मासिक पाळी आल्यानंतर तुमच्या योनीचा भाग हा थोडा मोठा झालेला असतो. इतरवेळी तुम्ही तुमच्या योनीचे निरीक्षण केले असेल तर तुम्हाला तुमची योनी थोडी कडक आणि योनी द्वार जास्त मोठे दिसणार नाही. पण मासिक पाळी येऊन गेल्यानंतर मात्र तुमचा योनीचा भाग मोठा होता. अनेकदा सुजतो देखील. पण हे अगदी स्वाभाविक आहे. मासिक पाळीनंतरही ही सूज काही दिवस तशीच असते.
मासिक पाळी येण्याआधी तुम्हाला तुमच्या छातीतून कळा आलेल्या जाणवल्या असतील. छातीला जराही हात लावला तरी दुखते. याचा अर्थ तुमची मासिक पाळी जवळ आली हे कळते. मासिक पाळी संपली तरी ही या काळात तुम्हाला छातीत दुखते. छाती जितके दिवस दुखते हा तुमच्यासाठी ओव्हयुलेशनचा काळ असतो. त्यामुळे जर तुम्ही आई होण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा अगदी योग्य असा काळ आहे.
ओव्ह्युलेशनमधील आणखी एक महत्वाचे लक्षण म्हणजे पोट जड वाटत राहते. तुम्ही काहीही खाल्ले नसेल तर तुमचे पोट फुगून येते. अशावेळी तुमच्या ओव्ह्युलेशनचा काळ जवळ आला असे समजावे. कारण मासिक पाळी येऊन गेल्यानंतर किमान दोन ते तीन दिवस तुम्हाला असे जाणवत राहते. हा तुमच्यासाठी चांगला कालावधी आहे. तुम्ही या दिवसात आई होण्याचा विचार करु शकता.
ओटीपटात दुखण्याचा त्रासही अनेकांना या दरम्यान होतो.ओटीपोटात दुखू लागले की, मासिक पाळी येणार असे समजतो. आई होणाऱ्यांसाठी मासिक पाळी अत्यंत महत्वाची आहे. कारण या 5 दिवसानंतर तुम्हाला गर्भधारणेसाठी प्रयत्न करता येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्यामध्ये ही काही लक्षणे जाणवत असतील तर तुमचा ओव्हुयलेशनचा काळ हा जवळ आला आहे असे तुम्ही समजावे.
ओव्हुलेशनच्या काळात होणारा आणखी एक त्रास म्हणजे डोकेदुखी. काहीजणांना या काळात थोडी डोकेदुखी जाणवायला लागते.जर तुम्हालाही या काळात अशी डोकेदुखी जाणवत असेल तर तुमच्या ओव्ह्युलेशनचा काळ जवळ आला असे समजावे.
काहींच्या अंगावरुन सतत पांढरे जाते. आता हे पांढरे जाणे प्रत्येकवेळी एकसारखे नसते. पाळीच्या आधी पांढऱ्या रंगाचा डिस्चार्ज हा थोडा घट्ट असतो. हा डिस्चार्ज सुरु झाला की, तुम्हाला मासिक पाळी येणार आहे असे कळते. तुमच्या शरीरातून सतत पांढरे जास असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्टी आहे कारण तुमच्या ओव्ह्युलेशनचा काळ हा जवळ आलेला आहे.
पाळी येऊन गेल्यानंतर महिलांमध्ये सेक्स करण्याची इच्छा अधिक जागृत होते. मासिक पाळीच्या 5 दिवसांमध्ये आलेली सगळी मरगळ आणि त्रास कमी झाल्यानंतर सेक्स करण्याची इच्छा ही अधिक तीव्र होत जाते. जर मासिक पाळीनंतर तुम्हाला ही इच्छा तीव्र झालेली जाणवत असेल तर हा गर्भधारणेसाठी अगदी योग्य काळ आहे. Ovulation चे हे एक महत्वाचे लक्षण आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करुन चालणार नाही.
महिलांना पुरुषांच्या तुलनेत रंग, गंध, दृष्टि थोडी अधिक असते. मासिक पाळीच्या काळात तर ही इंद्रिये अधिक सक्रीय होतात. वास, चव याची जाणीव तुम्हाला अधिक जाणवू लागते. तुम्हाला या गोष्टी अधिक जाणवू लागल्या की, समजा तुमच्या ओव्हयुलेशनचा काळ हा जवळ आलेला आहे.
वाचा - गरोदरपणी ही फळं आवर्जून खावी
मेन्स्टुरल सायकल किंवा मासिक पाळीच्या काळात तुम्हला रक्तस्राव होतो. तुम्हाला अगदी हल्का हल्का रक्तस्राव सुरु झाला की, तुमच्या ओव्ह्युलेशनचा काळ जवळ आला असे समजावे. कारण काहींना मासिक पाळी फक्त तीन दिवसांसाठी असते तर काहींना हा त्रास 5 दिवस होतो. त्यामुळे तुमच्या मेन्स्टुरल सायकलकडे लक्ष देऊन तुम्ही पुढचा विचार करायला हवा.
1. गरोदर राहण्यासाठी ovulation महत्वाचे आहे आहे का?
अर्थात, तुम्हाला आई व्हायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ovulationचा काळ जाणून घेणे फार आवश्यक आहे. या कालावधीतच तुमच्या बिजांडातून निघणाऱ्या अंडकोष आणि वीर्य यांच्या मिलनातून गर्भ राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आई होऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी हा काळ महत्वाचा आहे.
2. ओव्ह्युलेशन किती दिवसांपर्यंत असते?
मासिक पाळीनंतर साधारण पुढील 14 दिवस हे यासाठी योग्य मानले जातात. पण डॉक्टरांच्या मते मासिक पाळीनंतरचे 5 दिवस हे गर्भधारणेसाठी अत्यंत महत्वाचे असतात. कारण या काळामध्ये महिलेच्या योनीचा आकार आणि गर्भाशयापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा झालेला असतो. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर या गोष्टी कराल तितक्या चांगल्या. कारण तुम्ही गरोदर राहण्याची शक्यता या काळात अधिक असते.
3. ओव्ह्युलेशनमध्ये तुम्हाला थकवा जाणवू शकतो का?
डॉक्टरांच्या मते या काळात महिलेला थकवा अजिबात जाणवत नाही. उलट त्या या काळात आनंदी असतात. पण या दरम्यान जे शारीरिक बदल होतात. कदाचित त्यामुळे एखाद्या महिलेला शारीरिक थकवा जाणवून शकतो. पण हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे आहे.
आता जर तुम्हाला आई व्हायचे असेल तर तुम्ही ओव्हुलेशनच्या कालावधीचा योग्य विचार करायला हवा.