पु. ल. देशपांडे माहीत नाहीत असा एकही मराठी माणूस तुम्हाला पृथ्वीतलावर शोधून सापडणार नाही. विनोदाची योग्य जाण असलेल्या पु. ल. देशपांडे यांची पुस्तके आजही फारच प्रसिद्ध आहेत. साहित्याचा अभ्यास तुम्ही केला असेल किंवा नसेल पण पु. ल. देशपांडे यांची विनोदी पुस्तके तुम्ही अगदी आवर्जून वाचायला हवीत. 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आपण थोडा प्रकाश टाकूया. पु. ल. देशपांडे यांची पुस्तकांची नावे (प्रसिद्ध) पुस्तकांची नावे जाणून घेऊया. करुया सुरुवात
पु.ल. देशपांडे यांचे पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. भाई आणि पुल या नावाने देखील ते ओळखले जात होत.त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबईतील गावदेवी भागातील गौड सारस्वत ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. त्यांनी त्यांचे सगळे बालपण जोगेश्वरीमधील सारस्वत कॉलनीत गेले. पार्ले टिळक महाविद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर ते काही काळ शिक्षक म्हणून कार्यरत होते. भाईच्या लहानपणातील अनेक आठवणी आजही सांगितल्या जातात. लहानपणापासून ते फारच उपद्वयापी होते. पण तितकेच हुशार होते. सतत काही ना काही करायला त्यांना आवडायचे. लोक त्यांना शांत बसण्यासाठी पैसे देऊ करत पण तरीही ते शांत बसत नसतं. भाईंना साहित्याची गोडी लागण्यामागचे कारण म्हणजे त्यांचे आजोबा. त्यांच्या आजोबांनी लिहिलेली अनेक भाषण, भाषांतर वाचून काढली होती. शाळेत असताना त्यांनी आजोबांनी लिहलेले भाषण अगदी खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. त्यानंतर त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी लिखाणाला सुरुवात केली ते स्वत:च आपली भाषणे लिहित. त्यांच्या अनेक आठवणी आज आपण इथे मांडायला गेलो तर शब्द पुरेसे पडणार नाही. पण विनोदी साहित्य म्हटले की, भाईंचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यांची विनोदी पुस्तके लहान मुलांनी वाचली नाहीत अशी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. या महान लेखकाची प्राणज्योत 12 जून 2000 रोजी मालवली. झाले बहु होतील बहु परंतु पु.ल.समान कोणीही नाही.
वाचा - मराठीतील हे दर्जेदार साहित्य तुम्ही आवर्जून वाचायलाच हवे
पु. ल. देशपांडे यांचे साहित्य साहित्यविश्वात फारच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही निवडक साहित्याचा आपण परीचय करुन घेऊया. जर तुम्ही ही पुस्तकं अजूनही वाचली नसतील तर तुम्ही पु.ल. देशपांडे यांची पुस्तके वाचायला हवीत. जाणून घेऊया पु.ल.देशपांडे यांची विनोदी पुस्तके
1944 साली ‘अभिरुची’ या मासिकामध्ये पु,ल. देशपांडे यांनी अण्णा वडगावकर नावाचे काल्पनिक पात्र घेऊन व्यक्तिचित्र लिहिले. त्यानंतर त्यांनी त्याच मासिकातून अनेक व्यक्तिचित्रांचे लेखन केले. अण्णा वडगावकर, अंतू बर्वा, गजा खोत, चितळे मास्तर, ते चौकोनी कुटुंब अशा काही मथळ्याखाली या व्यक्तीरेखा लिहिल्या गेल्या.पु,ल. देशपांडे यांच्या या व्यक्तिचित्रांच्या पहिल्या चार आवृत्यांमध्ये 18 व्यक्तिचित्रांचा समावेश होता. त्यानंतर त्यामध्ये आणखी दोन व्यक्तिचित्र समाविष्ट करण्यात आली. हेच ते पुस्तक म्हणजे व्यक्ती आणि वल्ली. आजही अनेकांच्या मनामध्ये या व्यक्तिरेखेने घर केलेल आहे.
साहित्य प्रकार: काल्पनिक व्यक्तिचित्रे
Goodreads Rating: 4.4/5
विनोदी साहित्यामध्ये आवर्जून नाव घेतले जाते ते पु.ल. देशपांडे यांच्या ‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकाचे. आता वाढत्या शहरांमध्ये चाळ संस्कृती कमी होत चालली. पण चाळीत घडणाऱ्या गमती जमती, सुख दु:ख, चाळीतील लोकांचे वेगवेगळे स्वभाव, मदतीला घावून येणारी वृत्ती या सगळ्यागोष्टी कधीकधी डोळ्याच्या कडाही ओलवतात. अशा या चाळीतील मजा पु.ल. देशपांडे यांनी मांडलेल्या शब्दात तुम्ही वाचायला हवी. 1958 साली बटाट्याची चाळ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतर या पुस्तकाचा खप पाहता त्याच्या कितीतरी आवृत्त्या आल्या आणि त्याच्या आवृत्त्या आजही निघणे सुरुच आहे. भाईंचे हे पुस्तक तुम्हाला जितका निखळ आनंद देते. तितक्याच शेवटी तुमच्या डोळ्यांच्या कडा पाणावते. ही बटाट्याची चाळ तुमच्या मनात हमखास घर करुन बसते.
साहित्य प्रकार: ललित वाड्.मय
Goodreads Rating: 4.28/5
असा मी असामी हे पु.ल. देशपांडे यांचे काल्पनिक आत्मचरित्र असेल तरी ते अगदी खरेखुरे वाटते. एका मध्यमवर्गीया माणसाचे भावनाविश्व आणि त्याची आजूबाजूची परिस्थिती त्यांनी यामधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धोंडो भिकाजी कडमडेकर जोशी नावाच्या गिरगावात राहणाऱ्या एका सामान्य कारकुनाचे काल्पनिक आत्मचरित्र त्यांनी त्यांच्या शैलीत लिहिले आहे. हे मांडताना विनोददेखील उत्तम पद्धतीने मांडला आहे. त्यामुळे हे आत्मचरित्र तुम्हाला शेवटपर्यंत रोखून धरते. आजच्या घडीला कदाचित परिस्थिती थोडीफार बदलली असेल. पण भाईंची विनोदी शैली वाचण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवेत.
साहित्यप्रकार: काल्पनिक आत्मचरित्र
Goodreads Rating: 4.39/5
प्रवासवर्णन प्रकारातील पु.ल.देशपांडे यांचे पुस्तक आहे. 1960 साली हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यांनी केलेल्या इंग्लड, स्कॉटलँड, फ्रान्स आणि जर्मनी या दौऱ्याचे चित्रण त्यांनी या पुस्तकाच केले आहे. या प्रवासाला निघण्याआधी केलेल्या तयारीचे विविध प्रसंग त्यांनी त्यांच्या शैलीत या पुस्तकात मांडले आहे. या प्रवासादरम्यान त्यांना भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींचे त्यांनी वर्णन यामध्ये केले आहे. विविध देशातील सांस्कृतिक पैलूदेखील त्यांनी पुस्तकातून विविध प्रसंगातून मांडले आहे.
साहित्यप्रकार: प्रवासवर्णन
Goodreads Rating: 4.25/5
आशिया आणि पूर्व आशियातील देशभ्रमंतीवर आधारीत पूर्वरंग हे प्रवासवर्णनपर पुस्तक आहे. 1962 साली जानेवारी ते मे महिन्यांदरम्यान हा प्रवास देशपांडे यांनी त्यांच्या पत्नीसोबत केला. आग्नेय आशियातील सिंगापूरपासून प्रवासाची सुरुवात होऊन पूर्व आशियातील जपानभेटीने त्यानी त्यांची सांगता केली होतीय. या प्रवासत त्यांनी मलेशिया, थायलंड, इंडोनेशियामधील बाली, हाँगकाँग या ठिकाणांना भेट दिली. या भटकतींचे वर्णन त्यांनी या पुस्तकात केले आहे. या पुस्तकात त्यांनी संस्कृती, कलाप्रकार, खाद्यसंस्कृती या गोष्टींचा समावेश केला आहे.
साहित्यप्रकार: प्रवासवर्णन
Goodreads Rating: 4.25/5
आयुष्यात कितीही दु:ख आली तरी हसणं हा त्यावरचा उत्तम उपाय आहे. हसतं राहण्याचा मंत्र देणारं हे पुस्तक आहे. विनोदी शैलीमध्ये त्यांनी हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात माझं खाद्य जीवन, बिगरी ते मॅट्रिक, माझे पौष्टिक जीवन, पाळीव प्राणी असा कथांचा समावेश आहे. या प्रत्येक कथेमध्ये आपल्याला विनोदीशैली उत्तमरित्या अनुभवता येते. आयुष्यात जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये नियतीने चालवलेली साऱ्याची फसवणूक एकदा लक्षात आली की, त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवलातील जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं? असं पु. ल. देशपांडे यांनीच लिहिलेले आहे.
साहित्यप्रकार: विनोदी लेख
Goodreads Rating: 4.25/5
गणगोत हे पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेले आणखी एक व्यक्तिचित्र आहे. आयुष्याच्या प्रवासात आपण कितीतरी माणसांना भेटतो. काही व्यक्ती आपल्या फार जवळच्या असतात. काहींचे आपल्याला आकर्षण असते. काहीं आपल्याला आवडत नाही. हे सगळे त्याचे गणगोत असतात. त्यांनी या पुस्तकातून हेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तावनेत त्यांनी माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसे असूही नये. माझे गणगोत फार मोठे आहे.अनिलांनी म्हटल्याप्रमाणे ‘इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे!’
साहित्यप्रकार: व्यक्तिचित्रे
Goodreads Rating: 4.25/5
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी भाषांतर म्हणजे ती फुलराणी हे नाटक. हे नाटक खूप गाजले. सतीश आणि मंजुळा यांची ही कथा असून एका फुल विकणाऱ्या मुलीला सतीशला चांगली भाषा शिकवायची असते. यासाठी तो तिच्यावर मेहनत घेतो, असे या नाटकाचे कथानक आहे. पण हे नाटक एक प्रवास असला तरी हा प्रवास वेगळ्या पद्धतीने मांडण्याच प्रयत्न भाईंनी केला. त्याला विनोदाची झालर देण्याचे काम केले. सगळ्यात सुरुवातीला भक्ती बर्वे यांनी मंजुळाची भूमिका स्वीकारली. त्यानंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष आणि आता नव्या नाटकात हेमांगी कवी अशी ही स्थित्यंतरे आली आहेत.
साहित्यप्रकार: नाटक
Goodreads Rating: 4.12/5
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आपण वेगवेगळे अनुभव गोळा करत असतो. हीच गोळा बेरीज वेगवेगळ्या विनोदी कथांमधून मांडण्याचा प्रयत्न पु.ल. देशपांडे यांनी केला आहे. या पुस्तकात एकूण 13 कथांचा समावेश असून वेगवेगळ्या धाटणीच्या या सगळ्या कथा आहेत. त्यामुळे त्या वाचताना आपसुकच तुम्हाला काही गोष्टी स्वत:शी निगडीत वाटू लागतात.
साहित्यप्रकार: विनोदी कथा
Goodreads Rating: 4.03/5
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा संदेश (Shivaji Maharaj Status In Marathi)
अघळ पघळ या पुस्तकात पु. ल. देशपांडे लिखित 12 लेखांचा समावेश आहे. भाई यांनी त्यांच्या खास शैलीत त्यांनी हे लेख लिहिले आहे. या सर्व लेखांची सुरुवात ही थोडी आगळीवेगळी आहे. या लेखांचे शीर्षकही आगळेवेगळे आहेत. त्यामुळे हे नक्की लेख आहेत की, अभ्यासपूर्ण धडे हे सुरुवातीला कळत नाही. पण शीर्षकामुळे या पुस्तकाची उत्कंठता नक्कीच वाढते, विनोदी लेखन साहित्य असल्यामुळे हे पुस्तकही तुम्हाला खळखळून हसवते.
साहित्यप्रकार: काल्पनिक आत्मचरित्र
Goodreads Rating: 3.98/5
गांधीयुग व गांधीयुगान्त, संस्कार,छान पिकत जाणारे म्हातारपण , अत्रे :ते हशा आणि टाळ्या, नाटकवेडा महाराष्ट्र लेखांचा यामध्ये समावेश आहे. त्याच्या लेखातून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ प्रकट होतात. या लेखांमधून सुसंस्कृत महाराष्ट्रीय समाजाचे दर्शन घडते. थोडासा वेगळा विचार रुजविणारा हा त्यांचा संग्रह आहे. त्यामुळे तुम्ही नक्की हे पुस्तक अवश्य घेऊन वाचा.
साहित्यप्रकार: वैचारिक लेख
Goodreads Rating: 4.09/5
एखाद्याने उगीचच एकाच्या आयुष्यात झाकण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला नस्ती उठाठेव करु नको असे म्हणतो. पण पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेली ही नस्ती उठाठेव तुम्हाला नक्कीच वाचावीशी वाटेल. कारण त्यांच्या शैलीत त्यांनी या वेगवेगळ्या कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठच इतके बोलके आहे की, तुम्हाला यातून या कथा किती मजेशीर असतील याचा अंदाज येतो. याशिवाय तुम्हाला यामध्ये एकपात्री नाटकदेखील वाचायला मिळेल. तुम्हाला इतरांच्या आयुष्यात नस्ती उठाठेव करायची नसेल तर ही उठाठेव नक्की करा.
साहित्यप्रकार: कथासंग्रह
Goodreads Rating: 4.12/5
तुम्हा सगळ्यांना जागतिक पुस्तक दिनाच्या (World Book Day) च्या शुभेच्छा! छान छान पुस्तक वाचत राहा आणि आम्हालाही तुम्ही वाचलेली काही छान पुस्तक नक्की सुचवा
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी.