इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा’. कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करु याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण न कळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची सेकंड इनिंग सुरु झाली. पण ज्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने तुम्ही तुमचे दिवस घालवलेले असतात ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत मिळणार नसते. म्हणूनच मनावर दगड ठेवून या दिवशी आपण आनंद तर साजरा करतो. पण या दिवशी दु:खही तेवढेच होत असते. तुमच्या जवळपासची व्यक्ती सेवानिवृत्त होणार असेल तर तुमच्या मनातील त्यांच्याविषयीच्या भावना मांडण्याची ही योग्य वेळ आहे. तुम्ही त्यांना सेवा निवृत्ती शुभेच्छापत्रे पाठवून किंवा सेवानिवृत्ती कविता पाठवून मनातील भावना व्यक्त करु शकता. चला तर मग करुया सुरुवात
Table of Contents
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा (Retirement Wishes In Marathi)
आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असले जरी सेवानिवृत्ती तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा
सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात. वाईट वाटून घेऊ नका आठवणी आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत. सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!
आला आनंदाचा क्षण, आता तुम्ही जगू शकाल आयुष्यातील प्रत्येक उरलेला क्षण, सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!
काम करुन सतत दुखले असतील तुमचे खांदे आता तरी विसावा घ्या आली तुमची सेवापूर्ती.सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
तुम्ही होता तेव्हा सगळे प्रश्न सहज सुटत होते..काम सगळे पटपट होत होते. पण आता तुम्ही सेवानिवृत्त होताय दु:ख तर खूप होतेय.. पण तुम्ही आनंदी राहाल या आनंदाने मन खुशही होतेय.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा
सेवानिवृत्तीचा दिवस आला.. अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला.. जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं… तुम्हाला जे जे हवे ते सारे मिळावे.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा.. या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
तुमच्यासोबत वेळ इतका पटपट केला अजिबात कळले नाही. मन माझे तुम्हाला सतत मिस करत राहील.
सोडून चाललात ऑफिस तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही.. खात्री आहे आम्हाला दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्हाला करमणारच नाही.
इतके दिवस तुम्ही केलीत आमची सेवा आता तरी करु द्या आम्हाला तुमची सेवा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
उद्यापासून तुम्हाला कामावर जायची लगबग नसेल पण तुम्हाला काही तरी नवं करण्याची नक्कीच संधी असेल. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
आयुष्यातील तुमच्या नव्या प्रवासासाठी तुम्हाला माझ्याकडून मन:पुर्वक शुभेच्छा!
आता नको घड्याळ आणि नको कामाचा ताण सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जगा एकदम झक्कास.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
आली साठी तुमची आली तुमची रिटायरमेंट.. आता घ्या थोडं दमानं कारण सुरु झालीय नवी इनिंग.. सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा!
आतत बस चुकणार नाही आणि घरी जायला उशीरही होणार नाही.. कारण तुम्ही आता रिटायर्ड होणार आहात. तुम्हाला हवे तसे जगणार आहात.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
खूप दिवसांपासून तुम्हाला मनातील भावना सांगायच्या होता. पण राहूनच जात होते. पण आज सेवानिवृत्तीच्या दिवशी त्या व्यक्त करणे गरजेचे आहे. माझ्या मनातील तुमचे स्थान कायम असेच राहील.. तुमच्यावाचून माझे ऑफिसमधील जीवन कसे जाईल.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा
तुमच्यासारखी प्रेमळ आणि कामसू व्यक्ती लाभली यासाठी आभारी आहे.
त्या ऑफिसमधील गप्पा, तुमचा ओरडा सगळेच आता पुन्हा होणार नाही. तुमच्यासारखा बॉस मला पुन्हा मिळणार नाही.. सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!
तुमच्या अनुभवातून खूप मोठा झालो. तुमच्यामुळे आयुष्यात बरचं काही करु शकलो. यापुढे नसाल एकत्र जरी तरी मनात असाल कायम. सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा!
सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी (Seva Nivrutti Messages In Marathi)
shutterstock
इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर आज थोडे निवांत घ्या.सेवानिवृत्त होताय आता तरी थोडे दमाने घ्या. सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा
लाभो सारे सुख आपणास, सहज व्हावी पुढची वाटचाल, काही चुकले असेल माझ्या पामराकडून तर मोठ्या मनाने करावे मला माफ
नाही नाही म्हणता म्हणता वर्षे इतकी सरली, तरीही तुझी माझी दोस्ती कधीच नाही विरली, सेवा निवृत्ती लख लाभो
आयुष्यात आला फक्त येणार आनंदाचे क्षण कारण मित्रा आली तुझी रिटायरमेंट.. सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!
घराची जबाबदारी तुम्ही अगदी न कळत्या वयापासून सांभाळता.. आता तरी तुमच्या मनाप्रमाणे वागण्याचा क्षण आला तो जगून घ्या.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
बस, ट्रेनचे धक्के खात केला तुम्ही प्रवास आता रिटायरमेंट म्हणतेय घरीच बसून करा मस्त आराम… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
याच दिवसासाठी तुम्ही अपार मेहनत केली, आता तरी थोड थांबा कारण वेळ सेवानिवृत्तीची आली, सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
सतत घरातल्यांची तक्रार होती तुम्ही कुठे नेत नाही.. म्हातारे झालात तरी प्लॅनिंग काही संपत नाही. आता करा वेळेचा सदुपयोग आणि मस्त करा जीवनाची नवी सवारी.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
सहवास तुमचा आम्हाला लाभला आम्ही धन्य झालो. तुमच्यासोबत राहून नवे काही तरी शिकलो. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
सहकारी नाही तर काय मित्र म्हणून पाठिशी राहिलास..आता मस्त जग मित्रा कारण तुझा आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा दिवस आला
आई-वडिलांच्या पुण्याईने आज आपण आयुष्यात चांगले दिवस पाहिले. दादा पुन्हा एकदा एकत्र जगण्याचे दिवस आपले आले.. सेवानिवृत्ती लखलाभो
तुमच्या वयाची साठी कधी आली आम्हाला कळले नाही.सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
आयुष्याच्या सेंकड इनिंगचा सदुपयोग करा.. मस्त फिरा आणि स्वस्थ राहा
आयुष्य कधीच थांबत नाही.. ते असचं निरंतर सुर असतं. रिटायरमेंटनंतरच आयुष्य अधिक सुंदर असतं
सेवा निवृत्त होताय आता मस्त आयुष्य जगा.. तुमच्या स्वप्नांना पुन्हा नव्याने पंख लावा.
नवी आशा नवी दिशा.. सेवा निवृत्ती नव्या आयुष्याची नवी दिशा.
लहानपणी न जोपासलेले छंद आता जपा.. पुन्हा नव्याने बालपण अनुभवा
साठी असते दुसरे बालपण. स्वत: समजून पुन्हा एकदा नव्याने जगण्याचे म्हातारपण
बऱ्याच गोष्टींकडे कामामुळे तुमचं झालं होतं दुर्लक्ष आता द्या त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष
प्रवासाचे प्लॅन तुम्ही आधीच ठेवले असतील आखून हे प्लॅन तुम्ही पूर्ण करा आणि तुमची रिटायरमेंट मजेत घालवा हीच अपेक्षा
सेवानिवृत्ती व्हॉटसअॅप स्टेटस (Retirement Status For Whatsapp)
आज तुम्हाला वाटत असेल की, हा दिवस तुमच्या कामाचा शेवट आहे. पण थोडं थांबा कारण ही तुमच्या नव्या आयुष्याची अनोखी सुरुवात आहे.
रोज रोज दमछाक करुन कंटाळला होता तुम्ही तुम्हाला हवी असलेली सेवानिवृत्ती आज आली तुमच्या दारी.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
सतत घराबाहेर असताना घराची खूप आठवण येत असेल...कधी एकदा घरी जातो असेही झाले असेल. पण आता उद्यापासून
बाहेर पडता येणार नाही.. त्यावेळी तुम्हाला / मला ऑफिसची आठवण आल्यावाचून राहणार नाही
क्षण आला तुमच्या सेवानिवृत्तीचा….आज सन्मान करुया तुमच्या या सेवाभावीवृत्तीचा … सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा
उद्या तुम्ही आमच्यासोबत असणार नाही याची आज प्रकर्षाने जाणीव होत आहे.. आता कोणी देईल आम्हाला सल्ला याचा सतत विचार मनाशी येत आहे.प्रत्येक क्षण तुम्हाला आम्ही मिस करु… आज तुमच्या सेवानिवृत्तीचा दिवस आहे.
दिवसामागून वर्षे गेली.. तुमच्या सेवा निवृत्तीचा दिवस आला. कळले नाही इतक्या वर्षात की, तुम्ही म्हातारे झालात.. सेवानिवृत्ती आनंदाची जावो
सेवानिवृत्तीचा क्षण असतो मनाला हळवा करणारा पण त्यासोबतच आयुष्याला नवी दिशा देणारा… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
आज तुम्ही सेवानिवृत्त होताय विश्वास होत नाही. तुमच्या आयुष्याची नवी वाटचाल सुखद आणि आरोग्याची जावो ही शुभेच्छा!
सेवानिवृत्ती हा असा दिवस आहे ज्यावेळी तुम्ही घरी येता आणि तुमच्या आप्तेष्टांना सांगता की, तुम्ही कायम त्यांचे आहात. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
उद्या तुमची ऑफिसमधील जागा कोणी दुसरं घेईल… पण आमच्या मनातील तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही… सेवा निवृत्तीच्या आनंददायी शुभेच्छा!
सुरवंटाचे झाले पाखरु,सर्वत्र लागले भराऱ्या मारु नवे जग, नव आशा, शोध घेण्याची जबर मनिषा, सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
सूर्य बोलत नाही.. त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो.. तुमच्या उत्तम कर्मामुळे लोकं कायमचं तुमचा परिचय देत राहतील… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याची दुसरी इनिंग… हा क्षण देवो तुम्हाला तुमचा आनंद आणि वेळ.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
सेवानिवृत्ती किंवा रिटायरमेंट काहीही म्हणा याला यापुढे जीवनात येणारा प्रत्येक क्षण तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
नोकरीपासून सुटका झाली आयुष्यातून नाही.. आता तरी तुमच्यासाठी जगा… दुसऱ्यांसाठी नाही
नवा गंध .. नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा.. नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
आजचा दिवस आपल्यासाठी अनमोल दिवस ठरावा आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिक सुंदर व्हावं.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
नवे क्षितीज नवी पहाट… फुलावी आयुष्यातील स्वप्नांची पहाट.. हे स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो… तुमच्या पाठिशी हजारो सूर्य तळपत राहो… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
आयुष्याच्या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे… तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
उगवता सूर्य तुम्हाला तेज प्रकाश देवो...उगवणारी फुलं तुमच्या आयुष्यात गंध देवो.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
आपण सेवानिवृत्त होताय, आमचा निरोप घेताय हे अगदी खरं! पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र, सदैव अबाधितच राहील! तुमच्या सहवासात घालवलेले अनेक जण आजही आम्हाला आठवतात… तुमचा स्वभाव, तुमचं वागणं आम्हाला सतत आठवतच राहील… तुमचं इथून पुढचं आयुष्यही असंच सुखसमाधानाचं आणि आनंदाचे जाईल!
निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छाचा सण आहे, पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हासू अन् दुसऱ्यात आसु मन नितळ नितांत आठवणीत आम्ही जातो मम ग्रहासी देवा निरोप द्यावा सख्याहारी!!
समजा या फेऱ्या बदलेल. आपण जाऊ आणि कोणीतरी येईल.परंतु आपल्या अंतःकरणाची नेहमीच अंतःस्थिती राहील. सत्य हे आहे की आपण एक क्षण विसरणार नाही. अडचणींमध्ये एकत्रितपणे लक्षात येईल. आपण घसरण करण्यासाठी दिला हात लक्षात ठेवा. तुमच्या जागी येतो ते तुमच्यासारखेच आहे. आपल्याला हे आवडेल. सत्य हे आहे की आपण एक क्षण विसरणार नाही.
मस्त मजेचे आयुष्य, गाडी थांबली वळणावर जरा विश्रांती करायची आहे सेवानिवृत्त झाल्यावर सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
जीवन आहे एक आगगाडी, ती धावे आशेच्या रुळावरी धुरे सोडी निराशेचा अन थांबी सहानुभूतीचे स्टेशनवरी सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अंधार दाटला होता… भूतकाळातील आठवणींना आज पाझर फुटला होता. सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा! तुझी आठवण म्हणजे कस्तुरी कधीच साथ न सोडणारी सदैव सोबत दरवळत राहणारी पण तशीच हवीहवीशी वाटणारी सुखात साथ देणारी आणि दु:ख विसरवणारी स्वप्न जुळवणारी आणि स्वप्नात रमवणारी पण तिथे मनाला सोडवत नाही कारण जितकी सुखद तुझी आठवण, तितकाच परतीचा प्रवास असतो माझ्यासाठी
जरी डोळ्यात पाणी येत असलं तरी ते गालावर आणयचं नसतं निरोपाच्या वेळी असे गुंतवायचे नसतात हातात हात केवळ स्पर्श सांभाळायचा असतो,
मखमली हृदयात गेलेले काही सुखाचे क्षण घालीत असतात. मधून साद मात्र आपण द्यायचा नसतो प्रतिसाद निरोपाच्यावेळी फक्त एकच करायचं असतं, दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा! - आशिष देशपांडे
नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात नजरेत भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी माणसं फारच कमी असतात सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!-आशिष देशपांडे
सेवानिवृत्ती छे छे ही तर क्षणभर विश्रांती मनासारखे जगणे आता आनंदाची अनुभूती जीवनातला वसंत हा अनुभवाचा प्राजक्त सडा रुप घेऊनी प्रियजनांना आठवणींचा भरा घडा उशीर होईल गाडी जाईल डबा न मी नेणार या साऱ्याला बगल देऊनी रम्य विश्व फुलणार या वाटेवरी शब्दरुपी या भावना आरोग्य धन अक्षय मिळो हीच मनापासुनी शुभकामना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
आता सेवानिवृत्त होणाऱ्या तुमच्या काका, मामा, दादा यांना नक्की द्या अशा शुभेच्छा!