अभिनेत्री समीराच्या मुलीने दिला तिला क्युट फेसमसाज

अभिनेत्री समीराच्या मुलीने दिला तिला क्युट फेसमसाज

सध्या लॉकडाऊनच्या काळात अगदी लहान मुलंही आपल्या आईला मदत करण्यासाठी किचनमध्ये जात असल्याचं चित्र दिसतंय. आपल्या मुलांनी केलेली अगदी छोटीशी मदतही आईला खूप सुखावून जाते. असाच अनुभव घेतला अभिनेत्री समीरा रेड्डीने.

आई म्हणून प्रवास सुरू झाला की, रात्र रात्र जागरण, पाच मिनिटात करावी लागणारी आंघोळ आणि 24*7 सुरू असणारी कामं ही चुकत नाहीत. याला काही प्रमाणात अपवाद सेलिब्रिटीजही नाहीत. अभिनेत्री समीरा रेड्डीसुद्धा आपल्या दोन्ही मुलांसोबत म्हणजे हंस वर्दे आणि नायरा वर्देसोबत मातृत्व एन्जॉय करतेय. तिच्या मुलांसोबतचे क्युट व्हिडिओज ती नेहमीच शेअर करत असते. असाच तिने शेअर केला तिच्या क्युट मुलीचा नायराचा क्युट व्हिडिओ पाहा.

लॉकडाऊनमुळे आईबाबा सध्या 24 तास मुलांसोबत आहेत. त्यामुळे जेव्हा समीराने चेहऱ्याला फेसमास्क लावला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना क्युट नायराने तिच्या चेहऱ्याला क्युट मसाज द्यायला सुरूवात केली. समीराने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, 'माझा स्पा टाईम #momlife #spa नायराला खूपच आवडतोय ! @alishka_varde_singh @lathasunadh मिस यू गर्ल्स ! #lockdown #babygirl #spatime #motherhood #baby #metime'

जेव्हापासून समीराने दुसऱ्यांदा आई व्हायचं ठरवलं तेव्हापासून ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. मग ते तिचं अंडरवॉटर मॅटर्निटी शूट असो वा नो मेकअप लुक कँपेन असो. मोठ्या पडद्यापासून लांब असली तरी समीराही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक नव्या आईला ती प्रेरणा देत आहे आणि पोस्ट-पार्टम डिप्रेशनबद्दलही मोकळेपणाने बोलत आहे.

तिच्या इन्स्टाग्राम फिडमध्ये ती सतत आपल्या कुटुंबासोबतचे व्हिडिओज शेअर करत असते. समीराची दोन्ही मुल हंस आणि नायरा खूपच क्युट असून त्यांचे व्हिडिओ लगेचच व्हायरल होतात. तिने कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन झाल्यावर मुलांना दिवसभर घरात कोंडून ठेवणं आईंसाठी किती कठीण जात आहे, याबाबतचा व्हिडिओही शेअर केला होता.

इतर सेलिब्रिटीज जिथे आपल्या फिटनेस आणि कुकींगबद्दलचे व्हिडिओज शेअर करत आहेत. तिथे समीराचे व्हिडिओज नक्कीच हटके आणि तुम्हाला आनंद देणार आहेत हे मात्र नक्की.

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा