ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोषवाक्य (Save Environment Slogan In Marathi)

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोषवाक्य (Save Environment Slogan In Marathi)

 

पर्यावरणाचे महत्व आपण सर्वजण जाणतोच. मात्र सध्या दिवसेंदिवस निसर्गाचा आणि पर्यायाने पर्यावरणाचा तोल ढासळत चालला आहे. 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू पर्यावरणाचं रक्षण करणं, पर्यावरणाचे संवर्धन करणं आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करणं हा आहे. निसर्ग डोळ्यांना दिसतो मात्र त्याच्या आतमध्ये असणारी नैसर्गिक व्यवस्था जी आपल्याला डोळ्यांना पाहता येत नाही तिला पर्यावरण असं म्हणतात. माणूस हा देखील या पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्याचे जीवन निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग आणि पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम थेट माणसाच्या जीवनावरदेखील होत असतो. वास्तविक माणसाने निसर्गात केलेल्या हस्तक्षेपामुळेच आज पर्यावरणाचा तोल ढासळू लागला आहे. म्हणूनच प्रत्येकाने आज प्रयत्नपूर्वक पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं झालं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या विषयाची जनजागृती करण्यासाठी काही खास पर्यावरण घोषवाक्य नक्कीच फायदेशीर ठरतील. म्हणूनच यंदाचा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी या काही खास पर्यावरण घोषवाक्य मराठीतून 

पर्यावरण घोषवाक्य मराठी (Save Environment Slogan In Marathi)

जागतिक पर्यावरण दिना- save environment slogan in marathi

Shutterstock

 

पर्यावरणाचे रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी याबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे. यासाठीच तुमच्यासोबत शेअर करत आहेत काही पर्यावरण घोषवाक्य

1. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा

ADVERTISEMENT

2. झाडे जगवा झाडे वाचवा 

3. पर्यावरणाचे  करा रक्षण,उज्वल भविष्याचे हेच धोरण 

4. वृक्षतोड करू नका, भविष्य धोक्यात टाकू नका

5. कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी

ADVERTISEMENT

6. सांभाळा ओझोनचा थर, शरीरातील कमी होईल ज्वर

7. प्रत्येकजण पर्यावरणाची काळजी घेईल, तर आपला देश महान होईल

8. काम करा लाख मोलाचे, निसर्ग आणि त्याच्या संवर्धनाचे

9. दररोज पाणी द्या झाडांना, भविष्य मिळेल मुलांबाळांना

ADVERTISEMENT

10. पर्यावरणाची करा रक्षा, जीवनाची खरी सुरक्षा

11. झाडे लावा झाडे जगवा, भविष्य वाचवा जीवन फुलवा

12. पर्यावरणाचे करा जतन, निसर्गासाठी खर्च करा तन आणि धन

13. निसर्गाचा नाश म्हणजे मानवी जीवनाचा सर्वनाश

ADVERTISEMENT

14. झाडे, फुले, पशु, पक्षी…जीवनाची सुंदर नक्षी

जाणून घ्या निसर्गावर कविता आणि सुविचार

पर्यावरण घोषवाक्य-save environment slogan in marathi

Shutterstock

 

15. करा पर्यावरणाच्या रक्षणाची सुरूवात, आनंद पसरेल जगभरात

ADVERTISEMENT

16. प्रदूषण करा कमी, सुंदर भविष्याची देईल निसर्ग हमी

17. नैसर्गिक गोष्टींचा वापर करा, गो ग्रीनमध्ये सहकार्य करा 

18. परिसर स्वच्छ ठेवाल, तर निरोगी आणि आनंदी राहाल

19. पर्यावरण वाचवण्यासाठी उचला पाऊल, जीवन होईल सर्वांसाठी अनुकूल

ADVERTISEMENT

20. स्वच्छ आणि सुंदर परिसर, मुलाबाळांसाठी हाच आहेर

21. नका करू अंगण तुझं आणि माझं, पर्यावरण तर आहे सर्वांचं 

22. पर्यावरण हाच खरा नारायण 

23. पुढच्या पिढीला हक्काने सांगू, पर्यावरणाचा तोल आताच सांभाळू

ADVERTISEMENT

24. पर्यावरणाचे करा रक्षण, मुलांना द्या याचे शिक्षण

25. पर्यावरणाची सुरक्षा हिच आहे तुमची आमची रक्षा

वाचा – शेतकऱ्यांसाठी खास सुविचार मराठीतून (Farmer Quotes In Marathi)

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुविचार (Environment Quotes In Marathi)

पर्यावरण घोषवाक्य मराठी-environment quotes in marathi

Shutterstock

ADVERTISEMENT

 

पर्यावरणाची महती आणि महत्त्व पटवण्यासाठी काही आकर्षक घोषवाक्य नेहमीच प्रेरक ठरतात. यासाठीच यंदाचा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी वापरा ही काही प्रेरणादायी पर्यावरण घोषवाक्य

1. वृक्ष लावा घरोघरी पर्यावरण राखा जीवनी

2. पर्यावरण जागवा वसुंधरा वाचवा

3. दारी वृक्षाचा पहारा पशुपक्ष्यांना देऊ आसरा

ADVERTISEMENT

4. उन्हातान्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलो पावली

5. पुढच्या पिढीसाठी करू आसरा, फळांच्या बिया पर्यावरणात पसरा

6. वृक्षांना द्या मानपान, पर्यावरणाचा राखा मान

7. हवी असेल शुद्ध हवा तर आजच झाडे लावा

ADVERTISEMENT

8.वृक्षांसोबत नका वागू कृतघ्न, राखा मान आणि व्हा कृतज्ञ

9.झाडे आणि पशुपक्षी, मानव जीवनाला पर्यावरण  साक्षी

10.वसुंधरेचे हिरवे लेणे, पर्यावरण आणि वृक्षांना वाचवणे

11.प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा

ADVERTISEMENT

12.सर्वांनी मिळून शपथ घेऊ, आजपासून आपले पर्यावरण वाचवू 

13. पर्यावणाची हानी म्हणजे जीवनाची हानी

घरच्या झाडांची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स (How To Care For Indoor Plants In Marathi)

Environment Slogan In Marathi

 

14. घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवा, प्रदूषणाला दूर करा

ADVERTISEMENT

15. निसर्ग आणि पर्यावरण हाच आहे खरा तुमचा मित्र

16. जागतिक पर्यावरण दिन साजरा करू, जागोजागी झाडे लावू

17. गाऊ महती पर्यावरणाची, भिती नाही भविष्याची

18. पर्यावरण दिनाचे महत्त्व, सुखी जीवनाचे आहे खरे तत्त्व

ADVERTISEMENT

19. चिऊ काऊला चारापाणी, निसर्गाची मेहरबानी

20. अंगणात लावा वृक्षवेली, आरोग्याची गुरूकिल्ली

21. पर्यावरण राखा, आरोग्य राखा

22. फळांच्या बी अंगणात टाक, निसर्ग देत आहे हाक

ADVERTISEMENT

23. पर्यावरणाचे सुंदर चक्र, भविष्यासाठी ठरेल सुदर्शन चक्र

24. स्वच्छ परिसर स्वच्छ गाव, आजारपणाला दूर ठेव

25. स्वच्छता ठेवा गल्लोगल्लीत, निसर्गाचे चक्र चालेल सुरळीत

 

फोटोसौजन्य -शटरस्टॉक

ADVERTISEMENT

अधिक वाचा –
पृथ्वी दिवस पर संदेश
About Earth Day in Hindi
जागतिक जल दिवसानिमित्त ’50’ पाणी वाचवा घोषवाक्य (Save Water Slogans In Marathi)
धरणीमातेचा उत्सव जागतिक वसुंधरा दिन (Save Earth Slogans In Marathi)
पाण्याची बचत करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स (How To Save Water In Marathi) 
Classic Slogan For Safety In Marathi

22 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT