क्वारंटाइनच्या काळात घरात असलो तरीही आपल्या सगळ्यांचं रोजचं रूटीन मात्र बिघडलं आहे. आपल्याला जरी वाटलं की, आपल्याकडे त्वचेची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे तरी आपल्या त्वचेला कोरडेपणा, निस्तेजपणा आणि पिंपल्सच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. आता बऱ्याचजणी विचार करतील की, ना मी सध्या मेकअप करत आहे ना बाहेर धुळीत जातेय. ना कामाचा तणाव आहे. तरी त्वचा अशी का होतेय. याची कारणं खालीलप्रमाणे असू शकतात.
- तुमचं रोजचं स्कीन रूटीन
- हार्मोनल बदल
- सध्याच्या परिस्थितीबाबतचा तणाव
- डाएटमध्ये जास्त प्रमाणात साखर किंवा फॅटी फूड्स
- कमी पाणी पिणं
- पुरेसा व्यायाम न करणं
हे सगळं तुम्हाला टाळून सेल्फ आयसोलेशनमध्येही त्वचा चांगली कशी ठेवता येईल याबाबत सांगत आहेत प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट अप्रतिम गोयल.
क्वारंटाइनमध्ये असलो तरी वेळेबाबत काटेकोर राहा. तुमच्या रोजच्या रूटीननुसार त्वचेची आणि केसांची काळजी घ्या. कारण आपण बरेचदा आळस करतो. पण ते टाळा आणि नियमितपणे क्लिजिंग, टोनिंग, मॉश्चरायजिंग आणि सनस्क्रीनही लावा. हो..अगदी घरात असलात तरी.
कारण सनस्क्रीन फक्त सूर्याच्या प्रखर किरणांपासूनच नाहीतर तुमच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समधून निघणाऱ्या ब्लू लाईटचाही सामना करते. तसंच खिडकीतून येणारं ऊन किंवा अगदी जेवण बनवताना त्वचेची काळजी घेते.
घरात स्पासारखं मस्त वातावरण निर्माण करा. रिलॅक्सिंग म्युझिक लावा आणि डी-स्ट्रेस व्हा.
तणावामुळे शरीरात केमिकल रिएक्शन होऊन त्याचा परिणाम त्वचेवर होतो. ज्यामुळे त्वचा संवेदनशील होणे किंवा जळजळ होणे या समस्या जाणवतात. या काळात तणावामुळे कॉर्टिसोल हे हार्मोन रिलीज होते.
त्वचेची फक्त वरवर काळजी घेऊन उपयोग नाही तर त्यासाठी आहारही चांगला असावा लागतो. त्यामुळे प्रोसेस्ड फूड जसं चीज आणि डेअरी प्रोडक्ट्स टाळा.
अशाप्रकारे काळजी घेतल्यास लॉकडाऊन काय इतर कोणताही तणाव तुमच्या त्वचेच्या आणि सौंदर्याच्यादरम्यान येणार नाही. घरात राहा आणि निरोगी राहा.