Lockdownच्या दिवसात घरीच करा स्वत: वर करा हे प्रयोग

Lockdownच्या दिवसात घरीच करा स्वत: वर करा हे प्रयोग

सध्या देशाची परिस्थिती पाहता आपल्याला काही दिवस घरी घालवण्याची गरज आहे. आता या दिवसात तुम्हाला बोअर झालं असेल आणि तुम्हाला म्हणावं तितकं काही काम नसेल तर मग तुम्ही तुमच्यावर काही प्रयोग करुन पाहायला हवे. कारण हाच तो रिकामी वेळ आहे ज्याची तुम्ही सध्या खूप आतुरतेने वाट पाहात आहात. आता तुम्ही नेमके कोणकोणते प्रयोग करुन पाहायला हवे ते जाणून घेऊया.

चैत्र महिन्यात एकदा तरी करा चटकदार आंबे डाळ

मेकअपमध्ये करा बदल नवीन करा ट्राय

shutterstock

तुम्ही नसाल मेकअप करणारे पण घरी आणलेले  मेकअपच सामान कधीतरी लावून बघायला नको का? आता रोज घाईत आणि कामावरुन थकून आल्यानंतर तुम्हाला हे असे प्रयोग तुमच्यावर करता येत नाही. सध्या घरीच बसत असल्यामुळे तुमच्याकडे मेकअपचे वेगवेगळे प्रयोग करायला खूप वेळ आहे.  म्हणजे तुम्हाला स्मोकी आईज, लायनर लावण्याचे वेगवेगळे प्रकार, लिपस्टिकच्या वेगवेगळ्या शेड्स असे काही ट्राय करा. आता जर तुम्हाला अजून थोडा काही वेगळा प्रयोग करायचा असेल तर ट्रेडिशनल वेअर आणि वेस्टर्नवेअरवर करण्यासारखा मेकअप ट्राय करा. तुम्हाला मेकअप येत नसेल तर युट्युब तुमच्या मदतीसाठी आहेच.

वयाच्या तिशीनंतर आई व्हायचंय, जाणून घ्या 5 गुंतागुंतीच्या गोष्टी

घरीच करा एखादा हेअरकट

shutterstock

हो आता हे थोडं कठीण आहे. पण आता तुम्हाला हे करायला काहीच हरकत नाही कारण तुम्ही जरी काही चूक केली तरी घराबाहेर पडायला तुम्हाला थोडा अवकाश आहे. तुम्ही अगदी इंचभर केस कापूच शकता. जर तुम्हाला पुढचे काही फ्लिक्स कापायचे असतील तर तुम्ही तसे केस कापू शकता. खूप जास्त केस तोकडे करु नका. जितकं कमीत कमी करता येईल तेवढेच केस कापा. (कधी कधी चुकांमधूनही एखादा चांगला हेअर कट होऊ शकतो हा)

सतत डोकं दुखत असेल तर बदला तुमची हेअरस्टाईल

नखांना लावा वेगवेगळ्या नेलपेंटस

shutterstock

प्रत्येक मुलीच्या घरी कितीतरी शेड्सच्या नेलपेंट असतात. पण या लावण्याचे कष्ट आपण घेतो कुठे. एखादा रंग आवडला तो घरी आणला की, कपाटात ठेवून दिला असेल. चला आता तो रंग काढण्याची वेळ आहे. तुम्ही वेगवेगळा रंग वेगवेगळ्या बोटाला लावू शकता. जो रंग तुम्हाला चांगला दिसणार नाही असं वाटत असेल तर नेमका तो रंग वापरा. तुम्हाला तो चांगलाच दिसणार. इतरवेळी कधीही तुम्ही नेलपेंट लावणे आणि काढणे असा प्रयोग तुम्ही करणार नाही. त्यामुळे हे तर तुम्ही नक्कीच करा.

वर्क फ्रॉम होम होण्यासाठी टिप्स (Tips For Work From Home In Marathi)

नवी स्टाईल करा ट्राय

shutterstock

 आता काही जणांना वेस्टर्नवेअरचे वावडे असते. तर काहींना ट्रेडिशनलवेअरचे वावडे असते.  तुमच्या कपाटात नक्कीच अे काही कपडे असतील जे तुम्ही कधीही घालून पाहिले नसतील. आता असे कपडे तुम्ही नक्की काढून घालून पाहा. कारण तुम्हाला हे कपडे चांगले दिसतील. किंवा कधी कधी त्यांची स्टाईलिंग कशी करायची हे तुम्हाला कळले नसेल तर आता थोडे वेगवेगळे प्रयोग करुन पाहा. एखाद्या जुन्या टॉपवर चांगली ज्वेलरी घालून बघा. स्कार्फने काही स्टायलिंग करता येईल का ते बघा. 


आता तुम्हाला या काही आयडियाज दिल्यानंतर तुम्हालाही काहीतरी नवे प्रयोग स्वत:वर करावेसे वाटतील. मग नक्की करुन पाहा हे प्रयोग कारण आताच ही वेळ आहे ज्यावेळी तुम्ही हा बदल करु शकता.