ADVERTISEMENT
home / Recipes
घरच्या घरी बनवा व्हॅनिला केक आणि द्या सरप्राईज

घरच्या घरी बनवा व्हॅनिला केक आणि द्या सरप्राईज

तुम्हाला सध्या घरी अनेक रेसिपी बनवण्यासाठी वेळ आहे. जर तुम्हाला घरच्या घरी व्हॅनिला केकही बनवता येईल असं म्हटलं तर? हो आता तुम्हाला घरातच बनवता येईल व्हॅनिला केक. घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा केक आवडेल. आता तुम्हाला घरात कोणाचा वाढदिवस असेल तर बाहेरून केक मागवणं शक्य नाही. मग तुम्ही घरच्या घरीच केक बनवून द्या सरप्राईज. यामध्ये तुम्ही घरातील जॅम अथवा कँडीजदेखील घालू शकता. केवळ लहान मुलांसाठीच नाही तर अगदी मोठ्यांच्याही हा केक नक्कीच पसंतीला उतरेल. आपण जाणून घेऊया यासाठी नक्की काय साहित्य लागते आणि याची कृती कशी करायची. हा के बनवण्यासाठी तुम्हाला साधारण 1 तास 15 मिनिट्स लागतात तर तुम्ही हा केक किमान 5 माणसांसाठी तयार करू शकता. पहिले आपण पाहूया यासाठी काय साहित्य लागते.

अगदी दोन मिनिटात घरच्या घरी करा मस्त ‘मगकेक’

व्हॅनिला केकसाठी लागणारे साहित्य

Shutterstock

ADVERTISEMENT

व्हॅनिला केकसाठी तुम्हाला घरात असलेले साहित्यही वापरता येईल. तुम्हाला यासाठी जास्त साहित्यांची गरज भासत नाही. 

  • दीड कप मैदा
  • साधारण पाव कप दूध
  • 1 कप साखर
  • पाऊण कप मिल्क पावडर
  • अगदी चिमूटभर मीठ
  • पाऊण कप लोणी अथवा बटर
  • व्हॅनिला चिप्स 2 चमचे
  • व्हॅनिला इसेन्स 2 चमचे
  • बेकिंग सोडा एक चमचा
  • अॅप्पल साईड व्हिनेगर ½ चमचा 
  • बेकिंग पावडर 1 चमचा 

ख्रिसमससाठी सोप्या केक रेसिपीज (Cake Recipes For Christmas In Marathi)

कसा तयार करायचा व्हॅनिला केक

Shutterstock

ADVERTISEMENT

व्हॅनिला केक तयार करण्यासाठी आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप रेसिपी देत आहोत.  त्यामुळे तुमची केक करताना गडबड होणार नाही. तुम्ही या स्टेप्सनुसार केक केलात तर अगदी सॉफ्ट आणि चविष्ट केक तुम्हाला मिळेल. हा केक करताना तुम्ही यातली एकही स्टेप चुकवू नका अन्यथा तुम्हाला हवा तसा सॉफ्ट केक मिळणार नाही. तसेच हा केक अंडे न घातल्यामुळे प्युअर व्हेज केक आहे. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अंडेही मिक्स करू शकता. 

  • एक मोठा बाऊल घ्या त्यात साखर, मिल्क पावडर, दूध आणि बटर घाला
  • हे व्यवस्थित फेटून घ्या जेणेकरून यामध्ये एकही गुठळी राहणार नाही
  • एक चाळणी घ्या
  • यामध्ये मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि मीठ घाला आणि नीट चाळून घ्या 
  • चाळून झाल्यावर वरील मिश्रणात नीट मिक्स करा आणि नीट फेटून घ्या
  • याची तयार झालेली पेस्ट ही दिसायला बऱ्यापैकी पातळ दिसायला हवी
  • त्यानंतर यात व्हॅनिल इसेन्स मिक्स करा. हे सर्व एकत्रित नीट मिक्स करून घ्या
  • यामध्ये अॅप्पल साईड व्हिनेगर मिक्स करा आणि नीट फेटून घ्या
  • त्यानंतर एक बेकिंग ट्रे घ्या आणि त्याला ब्रशने थोडे बटर लावा
  • त्यानंतर वरील तयार मिश्रण या बेकिंग ट्रे मध्ये ओता
  • तोपर्यंत ओव्हन 160 डिग्री सेल्सियसवर 5-10 मिनिट्स प्री – हिट करून घ्या
  • बेकिंग ट्रे प्री – हिट झालेल्या ओव्हनमध्ये ठेवा 
  • साधारण 40-45 मिनिट्स तुम्ही 160 डिग्री सेल्सियसवर बेक करून घ्या
  • त्यानंतर बेकिंग ट्रे बाहेर काढा आणि थंड होऊ द्या
  • वरून काही व्हॅनिला चिप्स घाला आणि कापून सर्वाना खायला द्या. 

टीप – तुम्हाला हा केक जास्त फ्लफी बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये अंडे मिक्स करू शकता. 

ख्रिसमससाठी मधुरा बाचलच्या खास केक रेसिपी

चॉकलेट केक रेसिपी मराठीत

ADVERTISEMENT

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

11 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT