ADVERTISEMENT
home / Mythology
Viral : भारतातील या गावात केली जात नाही हनुमानाची पूजा

Viral : भारतातील या गावात केली जात नाही हनुमानाची पूजा

सध्या दूरदर्शनवर महाभारत आणि रामायणसारख्या जुन्या मालिका सुरू झाल्याने पुन्हा एकदा या मालिकांच्या संदर्भातल्या चर्चांना सुरूवात झाली आहे. अशातच सध्या व्हायरल झालेली बातमी म्हणेज हनुमानाच्या पूजेवर बंदी असलेल्या गावाची. असं म्हणतात त्रेतायुगापासून या गावातले गावकरी हनुमानावर नाराज आहेत. हनुमानाची पूजा करत नाहीत पण भगवान श्रीरामाची पूजा मात्र करतात.

भगवान हनुमानावरील नाराजीचं कारण काय?

Instagram

गावातील या नाराजीमागे रामायणातील एक घटना असल्याचं म्हटलं जातं. जेव्हा प्रभू श्रीरामाचे भाऊ लक्ष्मणाच्या इलाजासाठी मारूतीला संजीवनी औषधी आणण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. तेव्हा दंतकथेनुसार मारूती संजीवनी औषधी आणण्यासाठी देवभूमी उत्तराखंडमधील या गावात आले होते. या गावाचं नाव द्रोणागिरी. इथला पर्वत हनुमानाने नेल्यामुळे येथील लोकं आजही हनुमानावर नाराज आहेत. एवढंच नाहीतर या गावात लाल रंगाच्या झेंड्यावरही बंदी आहे.

ADVERTISEMENT

महाभारताचं युद्ध संपताच जळून खाक झाला होता अर्जुनाचा रथ

कुठे आहे हे गाव

Instagram

देवभूमी उत्तरांचलमधील चमोल क्षेत्रात हे द्रोणागिरी गाव आहे. या गावकरांच्या मान्यतेनुसार लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमानाने जो पर्वत उचलून नेला होता, तो इथे होता. चमोली जिल्ह्यातील जोशीमठपासून मलारीकडे जाताना 50 किलोमीटर पुढे जुम्मा नावाची एक जागा आहे. जिथून द्रोणागिरीला जाण्याचा पायी मार्ग सुरू होतो. इथे शुभ्रपांढऱ्या गंगा नदीवर पुलाच्या दुसऱ्या बाजूला हे गाव आहे. जिथून दूरवर पाहिल्यास पर्वतांच्या रांगा दिसतात. तिथून तब्बल दहा किलोमीटर पायी कठीण आणि रोमांचकारी सर्ता चालल्यावर हे गाव येते. द्रोणागिरी गावाच्या वरती बागिनी, ऋषी पर्वत आणि नंदी कुंडसारखी चर्चित स्थळ आहेत. जिथे उन्हाळ्यात अनेक ट्रेकर्स जातात.

ADVERTISEMENT

नजर लागणे म्हणजे नेमकं काय, याबाबतचा विज्ञानाचा पैलू आणि त्यावरील उपाय

द्रोणागिरी आणि हनुमानाची दंतकथा

Instagram

असं मानलं जातं की, येथील लोकं या पर्वताची पूजा करत होते. ज्यावेळी हनुमान संजीवनी औषधी घेण्यासाठी आले तेव्हा पर्वत देवता ध्यानमुद्रेत होते. हनुमानाने त्यांची परवानगी घेतली नाही आणि त्यांच्या साधनेच्या पूर्ण होण्याची वाटही पाहिली नाही. त्यामुळ येथील लोकं नाराज आहेत. अशीही मान्यता आहे की, एका वृद्ध महिलेने हनुमानाला संजीवनी औषधी उगवणारा या पर्वताचा भाग दाखवला होता. पण हनुमानाला ती औषधी ओळखता आली नाही. ज्यामुळे त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून नेला. पण दुसरीकडे गावातील लोकांचा प्रभू श्रीरामावर कोणताही राग नाही. ज्यामुळे इथे प्रभू रामचंद्राची पूजा केली जाते. पण हनुमानाची नाही.

ADVERTISEMENT

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’

या भागात मुख्यतः भोटिया जातीची लोकं राहतात. द्रोणागिरी या 12 हजार फिट उंचीवर असलेल्या गावात जवळपास शंभर कुटुंब राहतात. हिवाळ्याच्या दिवसात या गावावर बर्फाची चादर असते. त्यामुळे इथे राहणं शक्य नसतं. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच या गावातील लोकं चमोली शहराच्या आसपासच्या गावात राहायला जातात. मे महिन्यात बर्फ वितळू लागल्यावर लोकं द्रोणागिरीमध्ये परत येतात.

29 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT