Fashion : सेलिब्रिटीजमध्ये पांढऱ्या शर्टचा बोल्ड ट्रेंड

Fashion : सेलिब्रिटीजमध्ये पांढऱ्या शर्टचा बोल्ड ट्रेंड

सिंपल पांढरा शर्ट ही अशी फॅशन एक्सेसरी आहे, जी कधीच आऊट ऑफ फॅशन होऊ शकत नाही. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात तर पांढऱ्या शर्टला पर्यायच नाही. त्यामुळेच सध्या सेलिब्रिटीज पुन्हा एकदा व्हाईट शर्टमध्ये स्पॉट होत आहेत. पण या लुक्समध्ये ट्विस्टही आहे. सेलिब्रिटींनी घातलेले हे व्हाईट शर्ट आहेत अनबट्न्ड. आधीच एवढं गरम होतंय आणि त्यात सेलिब्रिटीजच्या या फॅशनमुळे हॉटनेस मीटर अजूनच वाढतंय.

View this post on Instagram

à perte de vue 🖤

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty) on

मोतीचूर चकनाचूर फेम बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचा हा व्हाईट शर्ट लुक तुम्हाला नक्कीच इंप्रेस करेल. नेहमीचाच व्हाईट शर्ट तिने अनबटन्ड करून ऑफ शोल्डर पॅटर्नमध्ये घातला आहे. ज्यामध्ये तिने एक्सेसरीज घातलेल्या नाहीत. तिचा हा लुक एकदम रिफेशिंग आहे.

टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाचा व्हाईट शर्ट लुक तुम्हीही कधी ना कधी घरी केलाच असेल. उन्हाळ्याच्या दिवसासाठी ही सेलिब्रिटी फॅशन एकदम परफेक्ट आहे.

2020 च्या फेमस डब्बू रतनानी सेलिब्रिटी कॅलेंडरमध्ये अभिनेत्री क्रिती सनोननेही व्हाईट शर्ट अनबटन्ड लुक केला होता. तिचा हा फोटो फारच सेन्शुअस आहे.

मराठी अभिनेत्रींमध्येही व्हाईट शर्ट लुक ट्रेंड होतोय. तितिक्षा तावडेने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोशूट्सच्या पोस्टमध्ये तिने हा व्हाईट शर्ट लुक केला आहे. पांढऱ्या शर्टला अनबटन्ड आणि क्रॉप टॉप लुक तिने दिला आहे.

'एक थी बेगम' या वेबसीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेत्री अनुजा साठे आणि रेशम या दोघींनीही व्हाईट शर्ट लुक केल्याचं पाहायला मिळालं.

टीव्ही अभिनेत्री रिम शेखनेही हा लुक कॅरी केलाय. तिने जर व्यवस्थित हेअरस्टाईल करून हा फोटो काढला असता तर तिचा ऑफशॉल्डर पॅटर्न अजून छान पद्धतीने हायलाईट झाला असता.

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही असा अनबटन्ड व्हाईट शर्ट लुक केला होता. तिचा हा फोटो जुना असला तरी ही फॅशन अजूनही ट्रेंडमध्ये आहे.

व्हाईट शर्टची फॉरेव्हर फॅशन

पांढरा शर्ट तुम्ही कोणत्याही जीन्स किंवा स्कर्टसोबत पेअर अप करू शकता. त्यावर तुम्ही स्पंकी किंवा अगदी ट्रेडिशनल इअररिंग्ज्सही घालू शकता. तसंच पांढरा शर्ट आहे म्हटल्यावर मल्टीपल कलर ज्वेलरी घातल्यासही उठून दिसेल. मग तुमच्या वॉर्डरोबमध्येही आहे ना व्हाईट शर्ट.

मग तुम्हालाही आवडेल का उन्हाळ्यात ही अनबटन्ड व्हाईट शर्टची फॅशन करायला. अगदी सेलेब्सप्रमाणे नाही पण टीशर्ट किंवा स्पगेटी घालून तुम्हीही फॅशन आरामात कॅरी करू शकता. पांढरा शर्ट घातल्याने उन्हाळा नक्कीच सुसह्य होईल, यात शंका नाही. मग तुम्हालाही आवडला का हा फॅशन ट्रेंड?