बऱ्याच जणांना अॅसिडिटी, बद्धकोष्ठ, उलटी, जंत, पोटातील दुखणे यासारख्या अनेक गोष्टींमुळे अपचानाची समस्या उद्धवते. त्यासाठी आपण नक्की कोणते उपचार करायचे याचा आपल्याला शोध घ्यावा लागतो. पण अपचनावर तुम्हाला त्वरीत उपचार हवे असतील तर आयुर्वेदाशिवाय चांगला पर्याय नाही. तुम्हालाही जर अपचानाचा त्रास होत असेल तर तुम्ही हे सोपे आयुर्वेदिक उपचार करू शकता. त्यासाठी तुम्हाला हे घरगुती उपचार फायदा मिळवून देतील. खरं तर आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपलं जेवण वेळेवर होत नाही. त्यामुळे अपचनाची समस्या ही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. याचा त्रास बऱ्याच व्यक्तींना होत असतो. पण काही वेळा आपण याकडे दुर्लक्ष करून हा त्रास अधिक वाढवून घेतो. त्यामुळे यावर वेळच्या वेळी उपचार होणे अत्यंत गरजेचे आहे. नक्की कोणते हे 5 सोपे घरगुती उपचार आहेत आपण पाहूया.
तुम्हाला जर अॅसिडिटीचा त्रास होत असेल अथवा काहाही खाल्ल्यानंतर जर अॅसिडिटी वाढत असेल तर तुम्ही पाच ते सहा तुळशीची पाने अथवा काही बडिशेपचे दाणे तुम्ही चावा. असं केल्याने तुम्हाला या त्रासापासून लवकर सुटका मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. हा अतिशय साधा सोपा अपचनावरील घरगुती उपचार आहे. तसंच यामुळे तुमचे अपचन त्वरीत कमी होते.
जिऱ्याचा चहा वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर, शरीरासाठी आहे डिटॉक्स
ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांना सर्वात जास्त अपचनाचा त्रास होत असतो. तुम्हाला जर असा त्रास असेल तर त्यावर अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. मात्र तुम्ही हा उपाय नियमित करणे गरजेचे आहे. एका ग्लासामध्ये कोमट पाणी करून घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर घालून नीट मिक्स करा आणि ते प्या. असे केल्याने तुम्हाला असलेला बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि अपचनही कमी होते.
तुम्हाला जर सतत जंत होऊन पोटदुखी होत असेल आणि त्यामुळे अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही दोन चमचे दही आणि त्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे आणि जिरे मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही दिवसातून साधारण दोन ते तीन वेळा चाऊन खा. असेल केल्याने तुम्हाला त्वरीत आराम मिळतो आणि खाल्लेले पचणे सोपे जाते. तुम्हाला अपचनापासून त्वरीत सुटका मिळते.
तुम्हाला अपचनाने पोटदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही घरच्या घरी यावर पटकन उपाय करू शकता. त्यासाठी तुम्ही एक ग्लास गरम पाणी घ्या. त्यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घाला आणि चिमूटभर काळं मीठ घालून हे नीट मिक्स करा. त्यानंतर दिवसातून दोन ते तीन वेळा हे पाणी प्या. यामुळे तुम्हाला पटकन आराम मिळेल.
आरोग्यासाठी रोज दही भात खाणं ठरतं सर्वोत्तम, वजन नियंत्रणात राखण्यास मदत
अपचनामुळे बऱ्याचदा खाल्लेलं सतत घशात येऊन जळजळ होत राहते. अथवा तुम्हाला सतत उलटी होणार असं वाटत राहतं. अशावेळी नक्की काय करायचं ते कळत नाही. असा अपचनाचा त्रास तुम्हाला होत असेल तर 1-1 चमचा आल्याचा रस आणि लिंबाचा रस घ्या आणि नीट मिक्स करून दिवसातून तुम्ही 2-3 वेळा घेतल्यास तुमचा हा त्रास कमी होईल. तुम्हाला उलटी होण्यापासूनही आराम मिळेल.