ADVERTISEMENT
home / Recipes
घरी लोणी काढण्याची ही आहे एकदम सोपी ट्रिक

घरी लोणी काढण्याची ही आहे एकदम सोपी ट्रिक

गरमा गरम थालिपीठ किंवा पराठा आणि त्यावर मस्त लोणी खायला अनेकांना आवडते. बाजारात हल्ली सर्रास सगळीकडे लोणी अगदी सहज मिळते. पण तरीही काहींनी घरी केलेलं लोणी हे फार आवडतं. घरी लोणी करायचं म्हणजे केवढा तो घाट असे अनेकांना वाटते. कारण लोणी तयार करायचे म्हणजे रोज दुधावरची साय जमा करुन ठेवायची आणि साधारण महिनाभर किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ वाट पाहिल्यानंतर लोणी करायला घ्यायचे म्हणजे अनेकांसाठी डोक्याला ताप असतो. पण तुम्ही काही शॉर्टकट ट्रीक वापरुनही उत्तम लोणी घरीच तयार करु शकता. पाहूया लोणी करण्याची ही सोपी ट्रिक

स्वयंपाकानंतर हाताला येणारा लसूण-कांद्याचा वास असा करा दूर

असे तयार होते मस्त लोणी

लोणी

Instagram

ADVERTISEMENT

आता लोणी काढण्याची पद्धत सगळ्यांनाच सर्वसाधारणपणे माहीत असेल. पण तरीही अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर साय साठवून मग त्याचे दही तयार केले जाते. आणि मग दह्याचे लोणी काढले जाते. तर असे होते लोणी तयार. आता लोणी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला फार सोपी वाटत असली तरी देखील यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात.

फक्त केळी आणि चॉकलेटपासून बनवा हेल्दी आईस्क्रिम

शॉर्टकट पद्धतीने असे करा लोणी तयार

असे करा लोणी तयार

Instagram

ADVERTISEMENT

आता जर तुम्हाला लोणी तयार करण्यासाठी साय साठवण्यासाठी तितकासा वेळ नाही. किंवा तुमच्याकडे फुल फॅट असलेले दूध मिळत नसेल तर तुम्ही थेट दह्यापासून लोणी काढू शकता.

  • जर तुम्ही साय न साचवता थेट दह्यापासून लोणी काढण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे दही देखील चांगल्या दर्जाचे हवे. हल्ली बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे दही विकत मिळते. पण हे दही छान घट्ट असतेच असे नाही. त्यामुळे चांगल्या ब्रँडचे किंवा घरी दही घालत असाल तर दही चांगले लागू द्या. त्यासाठी घाई करु नका. 
  • घरी छान घट्ट दही करायचे असेल तर तुम्ही म्हशीचे किंवा गायीचे फुल क्रिम दूध घ्या. आपल्याकडे पिशवीचे येणारे दूध हे पाश्चराईज असते. त्याचे फॅट काढलेले असते. पण बाजारात तुम्हाला फुल क्रिम दूध मिळू शकते. त्याचा वापर तुम्ही दही विरजत घालायला करु शकता. 
  • सायीपासून जास्त लोणी तयार होऊ शकते. पण दह्यापासून लोणी बनवताना तुम्हाला दही थोडे जास्त हवे. 
  • तुमच्याकडे हँड मिक्सी असेल तर तुम्ही त्याचा उपयोग करुन लोणी काढायला सुरुवात करा.दही छान घट्ट असेल तर तुम्हाला लोणी काढणे फार सोपे जाईल. तुम्हाला अगदी छान आणि योग्य प्रमाणात लोणी मिळेल.  लोणीनंतर उरलेल्या ताकाचे सेवनही तुम्ही करु शकता.  आता या लोण्यापासून तुम्ही तूप काढण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त लोणी काढावे लागेल. पण हे तूप पराठा आणि थालिपीठासाठी पुरेसे असेल. 
  • जर तुम्ही उन्हाळ्यात लोणी काढत असाल तर लोणी एकत्र आणि लवकर जवळ येण्यासाठी तुम्ही त्यामध्ये बर्फाचे खडे घाला. तर थंडीमध्ये तुम्ही त्यात थोडे गरम पाणी  घाला. म्हणजे लोणी पटकन येण्यास मदत मिळेल.

आता तुम्हाला घरीच पटकन लोणी तयार करायचे असेल तर तुम्ही या ट्रिकचा उपयोग करा.

 

चहा, कॉफी ऐवजी सुरु करा या पेयांचे सेवन आणि मिळवा फायदेच फायदे

ADVERTISEMENT
03 May 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT