1 मे 2020चं राशीफळ, मिथुन राशीसाठी दिवस लाभदायक

1 मे 2020चं राशीफळ, मिथुन राशीसाठी दिवस लाभदायक

मेष -आरोग्य सुधारेल

आज तुमचे बिघडलेले आरोग्य सुधारणार आहे. मानसिक शांतता मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


कुंभ - विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ

आज विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी खर्च करावा लागेल. जोडीदाराचा तणाव वाढणार आहे. परक्या लोकांपासून दूर राहा. घरातून बाहेर पडणे टाळा. 


मीन-  मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता

आज तुमची एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. वाद करणे टाळा. जुन्या मित्रांशी फोनवरून संवाद साधाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक बदल सहन करावे लागतील. वाहन चालवताना सावध राहा. 


वृषभ- सहकारी नाराज होतील

आज तुमच्या मनमानी व्यवहारामुळे सहकारी नाराज होणार आहेत. दुर्लक्षपणा केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होणार आहे. एखादी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. 


मिथुन - दिवस लाभदायक

आज गुंतवणूकीसाठी दिवस लाभदायक आहे. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस वाढेल. घरातून बाहेर जाताना सावध राहा. 

 

कर्क - आईचे आरोग्य बिघडणार आहे

आज तुमच्या आईचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मन अशांत राहील. जुन्या मित्रांची भेट होईल. जोडीदाराची साथ मिळेल. खर्च वाढणार आहे. धार्मिक कार्यातील रस वाढेल. 


सिंह - घरातील समस्या सुटणार आहेत

आज मोठ्यांच्या सल्लाने घरातील समस्या सुटणार आहेत. घरातील सजावटीत वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी तणाव कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत फोनवर संवाद साधाल.


कन्या -  खर्च अचानक वाढेल

आज ऑफिसमधील काम बिघडण्याची शक्यता आहे. पैशांबाबत समस्या येतील. कामाच्या ठिकाणी विरोध सहन करावा लागेल. जोडीदारासोबत मंगल कार्यक्रमाची योजना आखाल.


तूळ -  उत्पन्नाचे साधन मिळेल

आज तुम्हाला उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. विनाकारण खर्च करणे टाळा. बचत करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी वाद करणे टाळा. घरातून बाहेर जाताना सावध राहा. प्रिय व्यक्तीच्या भेटीत अडचणी येतील. 


वृश्चिक - व्यवसायात समस्या 

आज तुमच्या व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद होतील. जोडीदाराची काळजी घ्यावी लागेल. मुलांसोबत मनोरंजनात्मक गोष्टींमध्ये वेळ जाईल. 


धनु - अशक्तपणा आणि थकवा
आज तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवणार आहे. पैशांबाबत आनंदाची बातमी मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहा. घरात आनंदाचे वातावरण असेल. 


मकर -  मैत्री प्रेमामध्ये बदलेल

तुमची मैत्री आज प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीसोबत भेट होईल. ज्यामुळे फायदा होणार आहे. व्यवसायासाठी परदेशी जाणे टाळा. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराशी नाते मजबूत होईल.