4 मे 2020 चं राशीफळ, वृश्चिक राशीसाठी दिवस प्रेमाचा

 4 मे 2020 चं राशीफळ, वृश्चिक राशीसाठी दिवस प्रेमाचा

मेष - आईवडीलांची साथ मिळेल

आज तुमच्या चांगल्या व्यवहारामुळे लोक प्रभावित होतील. आईवडीलांची भावनिक साथ मिळेल. पैशांबाबत चांगली बातमी मिळेल. धार्मिक आणि अध्यात्मिक रस वाढणार आहे. 


कुंभ -दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमवाल

आज आळस आणि दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमवण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी प्रशंसा करतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक समस्या येण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल. 


मीन- हातपाय दुखण्याची शक्यता आहे

आज तुमच्या हातपायाचे दुखणे वाढू शकते. दिवसभर थकवा जाणवेल, आहाराची काळजी घ्या. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. पैशांबाबत व्यवहार करताना सावध राहा. 

 

वृषभ - करिअरमध्ये यश

आज तुम्हाला इंटरनेटवरून चांगली नोकरी मिळेल. घरातील कामांमध्ये तुमच्या कुटुंबियांची साथ मिळेल. नवीन ओळखींपासून सावध राहा. आत्मविश्वास वाढणार आहे. वाहन चालवताना सावध राहा. 


मिथुन - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

आज तुमचा वाहनखर्च वाढणार आहे. व्यवसायातील नवीन कामे रखडण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होऊ शकते. कर्ज घेणे टाळलेलेच बरे राहील. कुटुंबाची भावनिक साथ मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. 

 

कर्क - आईचे आरोग्य सुधारेल

आज तुमच्या आईचे आरोग्य चांगले राहणार आहे. इतरांकडून मदत मिळेल. व्यवसायात सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कामातील अडचणी दूर होतील. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. 


सिंह - नातेसंबंध बिघडतील

आज तुमच्या शंकामुळे तुमचे नाते बिघडण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी वाद करणे टाळा. आनंदाची बातमी मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. 


कन्या - कामाच्या ठिकाणी प्रगती होईल

आज रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. व्यवसायात वाढ होईल. कोणालाही पैसे उधार देऊ नका. जोडीदाराची साथ मिळेल. 


तूळ -  आरोग्य बिघडणार आहे

आज तुमचे आरोग्य बिघडणार आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. जोडीदाराची साथ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. लहान सहान गोष्टींवरून चिडचिड करू नका. 


वृश्चिक - प्रेमसंबंध सुधारतील

आज तुमच्या प्रेमसंबंधांमधील गोडवा वाढेल. कठीण काळ दूर होऊन चांगला काळ येईल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कामाच्या ठिकाणी अधिकारी साथ देतील. राजकारणातून लाभ मिळणार आहे. 


धनु - विद्यार्थ्यांचे मन अशांत राहील

आज विद्यार्थ्यांचे मन अशांत राहणार आहे. अभ्यासात जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी समस्या जाणवतील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


मकर - व्यापारात नफा होणार आहे

आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळणार आहे. मानसिक शांतता मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराची काळजी घ्या. मित्र आणि व्यवसायासाठी प्रवास करणे टाळावे लागेल.