उन्हाळ्यात वेटलॉस करणे खरचं असते का सोपे?, जाणून घ्या कारण

उन्हाळ्यात वेटलॉस करणे खरचं असते का सोपे?, जाणून घ्या कारण

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयोग करतो. काही प्रयोग यशस्वी होतात. तर काही प्रयोग फसतात. जर तुम्ही आता पुन्हा एकदा वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुमच्यासाठी उन्हाळ्याचा कालावधी ही अगदी योग्य आहे. अनेक अभ्यासाअंती हे सिद्ध झाले आहे की, उन्हाळ्यात वजन कमी करण्यास मदत होते. आता उन्हाळ्यात वजन कमी करणे का सोपे आहे या मागचे कारण देखील जाणून घेऊया.

गरोदरपणात तूप खाण्याचे काय होतात फायदे

खाण्याची इच्छा असते कमी

shutterstock

उन्हाळ्यामध्ये तुम्हाला खाण्याची इच्छा फारत कमी असते. कितीही भूक लागली तरी वातावरणामुळे आपल्याला जास्त खावेसे वाटत नाही. तळलेले किंवा गरम पदार्थ खाण्याची इच्छा अजिबात होत नाही. उन्हाळ्यामध्ये आपली पचनशक्ती इतकी मंंदावते की,आपल्याला पटकन भूक लागत नाही आणि भूक लागली तरी आपल्याला साधा आणि सात्विक आहार घ्यावासा वाटतो. त्यामुळे तुम्ही फास्ट फुड किंवा वजन वाढवणाऱ्या पदार्थांपासून तसेही दूर होता. उन्हाळ्यात वजन तुमच्या मनाप्रमाणे कमी होण्यामागे हे एक कारण असते. जर तुम्ही उन्हाळ्यातील तुमचा आहार तपासला तर तुम्हाला ही गोष्ट हमखास लक्षात येईल. पण असे करत असताना उपासमार करु नका. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचे जेवण असा आहार असू द्या. 

महिलांसाठी वरदान आहे ज्येष्ठमध, जाणून घ्या फायदे (Jeshthamadh Benefits In Marathi)

द्रव्याचे सेवन होते जास्त

Instagram

उन्हळ्यात आपण सतत पाणी पितो. इतरवेळी पाणी पिण्यास सांगितले तर पाणी पित नाही. पण उन्हाळ्यात शरीर इतक्या पटकन डिहायड्रेट होते की, आपल्याला पाणी प्यायल्यावाचून पर्याय नसतो. आता सतत पाणी पिऊन तोंडाला चव कशी येणार? म्हणूनच या दिवसात आपण ताक,फळांचा रस याचे सेवन अधिक करतो. द्रव्य पदार्थ पोटात गेले की, आपले पोट काही काळासाठी एकदम गच्च वाटायला लागते. काही वेळ तरी आपल्याला काहीच खावे असे वाटत नाही. त्यामुळे डाएटचे उद्दिष्ट्य या ठिकाणी सफल होते. आपण अरबटचरबट काहीच खात नाही.

आश्चर्यकारक! डान्स वर्कआऊट करुन तुमचे वजन होऊ शकते कमी (Dance Workout For Weight Loss)

कॅलरीज होतात बर्न

Instagram

उन्हाळ्यात अॅक्टीव्हिटी अशा फार काही कराव्याशा वाटत नाही. म्हणजे हार्डकोअर जीम करण्याचा अगदी कंटाळा येऊ लागतो. अशावेळी चालणे किंवा धावणे हे व्यायाम प्रकारच तुम्हाला थकवून टाकतात. त्यामुळे आवश्यक असलेल्या कॅलरीज बर्न व्हायला मदत मिळते. त्यामुळे तुम्ही विशेष मेहनत या काळात घेतली नाही तरी चालते. फक्त एक गोष्ट तुम्हाला करायला हवी ती म्हणजे थकवा आल्यानंतर हाडड्रेट राहण्याची. 

उन्हाळ्यात या पदार्थांचे सेवन ठरते फायदेशीर

आता वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जशी डाएटची यादी दिली जाते.तशी ही यादी नाही. तर तुम्ही या दिवसात अगदी आवर्जून खायला हव्यात अशा गोष्टी म्हणजे दही, ताक, काकडी, लिंबाचा रस,कलिंगड या काही पदार्थांमुळे तुम्हाला वजन कमी करण्यास हमखास मदत मिळेल. 


वजन कमी करण्याचा योग्य काळ आला आहे.तुम्हीही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आताच तयारीला लागला. कारण तुमच्याकडे आता एक संपूर्ण महिना आहे.